राजू शेट्टींची मोठी घोषणा; लोकसभेला ‘इतक्या’ जागा लढवणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं (Swabhimani Shetkari Sanghatna)आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (lok Sabha 2024) रणशिंग फुंकले असून हातकणंगले सह 5 ते 6 जागांवर स्वाभिमानी निवडणूक लढवणार आहे. संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी याबाबत घोषणा केली आहे. तसेच या सर्वच्या सर्व जागा स्वबळावर लढणार असून त्यासाठी कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच तयारीला लागावे असेही शेट्टी यांनी म्हंटल.

आंबा तालुका शाहूवाडी येथे सुरू असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अभ्यास शिबिराच्या सांगता सभेत कार्यकर्त्यांना संभोधित करताना राजू शेट्टी म्हणाले, आम्ही महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडलो आहोत. भाजपमधून आम्ही यापूर्वीच बाहेर पडलो होतो. राज्यातील शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, महिला वर्ग आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर आमचा सरकारशी सातत्याने संघर्ष चालू आहे. रस्त्यावरची लढाई संपलेली नाही. केंद्र व राज्य सरकारचा कारभार हा लोकशाहीच्या विरोधात आहे असं राजू शेट्टी यांनी यावेळी म्हंटल.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना पूर्ण ताकदीने मैदानात उतरेल. हातकणंगलेसह राज्यातील पाच ते सहा लोकसभेच्या जागा स्वाभिमानी स्वतंत्रपणे लढवणार आहे अशी घोषणा त्यांनी केली. नेमक्या कोणकोणत्या जागा लढवणार याचा निर्णय राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत घेतला जाईल मात्र कार्यकर्त्यांनी आत्तापासून निवडणुकीच्या तयारीला लागावं असं शेट्टी यांनी म्हंटल.