SwaRail App : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे! भारतीय रेल्वे मंत्रालयाने ‘SwaRail App’ नावचा एक ऑल-इन-वन सुपर अॅप सादर केला आहे, जो प्रवाशांना विविध रेल्वे सेवा एका ठिकाणी उपलब्ध करून देतो. हे अॅप IRCTC (भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन निगम) तर्फे तयार करण्यात आले आहे आणि जून 2025 अखेर हे अधिकृतरीत्या सर्वांसाठी लॉन्च होणार आहे.
SwaRail App आता उपलब्ध
रेल्वे माहिती प्रणाली केंद्र (CRIS) ने हे अॅप विकसित केले असून ते आता Google Play Store आणि Apple App Store वर बीटा व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. Android आणि iOS वापरकर्ते त्यांच्या IRCTC Rail Connect खात्याने लॉगिन करू शकतात. नवीन वापरकर्त्यांना सोपी नोंदणी प्रक्रिया देखील यात देण्यात आली आहे.
या अॅपमध्ये काय मिळणार? (मुख्य वैशिष्ट्ये)
- सिंगल साइन-ऑन सुविधा – एकच लॉगिन वापरून सर्व रेल्वे सेवा वापरता येणार.
- आरक्षित व अनारक्षित तिकिटांची बुकिंग – आता वेगवेगळ्या अॅप्सची गरज नाही.
- पीएनआर स्टेटस व ट्रेन माहिती – एका क्लिकवर संपूर्ण अपडेट.
- ट्रेनमध्ये अन्न ऑर्डर करण्याची सुविधा – IRCTC कॅटरिंगच्या माध्यमातून.
- प्लॅटफॉर्म तिकीट बुकिंग आणि पार्सल चौकशी – एकाच ठिकाणी.
- रेल मदत सेवा – प्रवाशांच्या तक्रारी व मदतीसाठी.
- सुरक्षित लॉगिन – m-PIN किंवा बायोमेट्रिक वापरून.
सुरक्षा आणि वापर सुलभता यावर भर
- प्रथम लॉगिननंतर आर-वॉलेट ऑटोमॅटिक तयार होतं.
- UTS ऑन मोबाइल अॅपशी विद्यमान वॉलेट लिंक करता येतो.
- मोबाईल नंबर आणि OTP च्या आधारे अतिथी लॉगिन पर्यायही उपलब्ध आहे.
- अॅपचा इंटरफेस वापरायला खूप सोपा आणि स्वच्छ ठेवण्यात आला आहे.
सर्व रेल्वे अॅप्स एका ठिकाणी
IRCTC ने याआधी विविध सेवा वेगवेगळ्या अॅप्समध्ये पुरवल्या होत्या – जसे की IRCTC RailConnect, UTS, NTES, आणि Food on Track. मात्र आता या सर्व सेवा ‘SwaRail SuperApp’ मध्ये एकत्र करण्यात आल्या आहेत, जेणेकरून प्रवाशाला एका क्लिकमध्ये सर्व माहिती व सेवा सहज मिळू शकतील.
रेल्वे प्रवास आता अधिक स्मार्ट
‘SwaRail’ अॅपच्या माध्यमातून भारतीय रेल्वेने डिजिटल युगात एक नवा अध्याय सुरू केला आहे. प्रवाशांसाठी ही एक क्रांतिकारी सुविधा असून, एकाच अॅपमध्ये प्रवास, खानपान, तिकीट, तक्रारी अशा सर्व गोष्टींचं समाधान मिळणार आहे. आत्ताच Google Play Store किंवा Appe App Store वर जाऊन SwaRail App डाउनलोड करा आणि रेल्वे प्रवासाचा अनुभव आणखी उत्तम बनवा