हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील स्वारगेट अत्याचार (Swargate Rape Case) प्रकरण अजूनही चर्चेत असते.दत्ता गाडे नावाच्या नराधमाने २६ वर्षीय तरुणीवर बस मध्येच बलात्कार केल्याने महाराष्टात खळबळ उडाली होती. सध्या दत्ता गाडे हा तुरुंगात आहे, या प्रकरणी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. मात्र त्याच दरम्यान, आता सदर पीडितेने थेट पोलिसांवरच गंभीर आरोप केला आहे. पीडीतेने राज्याच्या प्रधान सचिवांना पत्र पाठवून पोलिसांच्या कामकाजावर ताशेरे ओढले आहे. तसेच पोलिसांनी आपल्याशी कसा व्यवहार केला ते पीडितेने आपल्या पत्रातून व्यक्त केलं आहे. आपली इच्छा नसताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपली वैद्यकीय चाचणी केली, असं या तरूणीने म्हटलं आहे. त्याचबरोबर पुरुष पोलीस अधिकारी देखील आपल्याकडे चौकशी करत होते असं या पीडितेने म्हटलं आहे.
पीडित तरुणीने आपल्या पत्रात म्हंटल कि, काही राजकीय नेत्यांनी माझ्या चारीत्र्यावर संशय व्यक्त करणारी तसेच आरोपीचं समर्थन करणारी वक्तव्य केली. त्याची तक्रार केली असता त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. पुरुष वैद्यकीय अधिकारी माझी इच्छा नसताना सुद्धा संमती घ्यायचे. त्यानंतर माझी वैद्यकीय चाचणी करायचे. अनेक पुरुष पोलीस अधिकाऱ्यांना मी माझ्यावर कसा अत्याचार करण्यात आला ते सांगायचे . मला ३ वकिलांची नावे सुचवली. यातून एक निवडावा, असं सांगण्यात आले. मात्र मी असीम सरोदे यांची नेमणूक करावी अशी मागणी केली असता, तुला यायला एक दिवस उशीर झाला असं पुणे पोलिसांकडून मला सांगण्यात आले, म्हणजे अन्यायग्रस्त मुलगी म्हणून माझ्या म्हणण्याला काहीच महत्त्व नाही असा कायदा आहे का? असा सवाल पीडित मुलीने केला.
रोपी दत्ता गाडेने तिच्यावर दोन वेळा बलात्कार केला . आरोपीने तिसऱ्यांदा अनैसर्गिक बलात्काराचा प्रयत्न केला होता. मात्र तेव्हा मी पूर्ण ताकदीने विरोध केला. त्यानंतर आरोपी दत्ता गाडेने पळ काढला, असे तिने या पत्रात लिहिले आहे. ज्यावेळी माझ्यावर बलात्कार झाला त्यावेळी मी आरडाओरडा केला परंतु नंतर माझा आवाज खोल गेला, माझा आवाजच निघत नव्हता व त्याचवेळी माझ्या मनात बलात्काराच्या विविध घटनांमध्ये विरोध केल्याने मारून टाकण्यात आलेल्या मुलींच्या गोष्टी आल्या. त्यावेळी मी जीव वाचवणे महत्त्वाचे मानले असं पीडित तरुणीने म्हंटल.