हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Swiss Bank) स्विस बँकांमधील भारतीय नागरिक आणि कंपन्यांच्या ठेवींमध्ये मोठी घट झाल्याचे समोर आले आहे. भारतीयांनी स्विस बँकांमध्ये केलेल्या ठेवींना गळती लागली असून एकूण जमा रक्कम ही ४ वर्षांच्या नीचांकी पातळीवर घसरल्याचे समजत आहे. याचा संबंध ब्लॅक मनीसोबत जोडला जातोय. काही तज्ञांनी म्हटल्यानुसार, काळा पैसा कमी झाल्यामुळे ही घसरण पहायला मिळते आहे. रोखे, सिक्युरिटीज आणि इतर विविध आर्थिक साधनांद्वारे ठेवलेल्या निधीमधील तीव्र घटदेखील यामागील एक मुख्य कारण असू शकते. याविषयी अधिक सविस्तर माहिती घेऊया.
भारतीयांचा स्विस बँकेतील पैसा झाला कमी (Swiss Bank)
गतवर्षी २०२३ सालामध्ये या फंदात एकूण ७०% घट झाल्याचे समोर आले होते. त्यानुसार, जमा निधी हा १.०४ अब्ज स्विस फ्रँक म्हणजेच भारतीय चलनानुसार अंदाजे ९,७७१ कोटी रुपये इतका राहिल्याचे समजते. ही रक्कम गेल्या ४ वर्षातील सर्वात कमी असल्याचे, सेंट्रल बँक ऑफ स्वित्झर्लंडचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे या बँकांमधील भारतीय ग्राहकांच्या ठेवींमध्ये सलग दुसऱ्या वर्षी ही घट नोंदवण्यात आली आहे. याचा स्पष्ट अर्थ असा होतो की, आता भारतीय या बँकांमध्ये पैसे जमा करत नाहीत. तर, इतरत्र गुंतवणूक करत आहेत.
ठेवींमध्ये घट होण्याचे कारण
समोर आलेल्या आकडेवारीनुसार समजते की, भारतीय किंवा अनिवासी भारतीयांनी स्विस बँकांमध्ये गुंतवणूक करणे पूर्ण बंद केले आहे. (Swiss Bank) शिवाय आता या बँकांमध्ये संस्थांमार्फत गुंतवलेल्या पैशांचादेखील समावेश नाही. त्यामुळे स्विस बँकेत भारतीयांचा पैसा हा आत्ताच्या घडीला केवळ १०३.९८ कोटी स्विस फ्रँक इतका शिल्ल्क आहे. यातील बँक खात्यांमध्ये जमा झालेली एकूण रोकड ही ३१ कोटी स्विस फ्रँक एवढी आहे. ही रक्कम २०२२ वर्षाच्या शेवटी ३९४ दशलक्ष स्विस फ्रँक इतकी होती.
याशिवाय स्विस बँकेत भारतीयांनी इतर बँकांच्या माध्यमातून जमा केलेले ४२७ दशलक्ष स्विस फ्रँक वर्षभरापूर्वी १११ कोटी स्विस फ्रँक इतके होते. मात्र, आता भारतीयांनी ट्रस्टच्या माध्यमातून या बँकांमध्ये जमा केलेली एकूण रक्कम फक्त १ कोटी स्विस फ्रँक इतकी राहिली आहे. जी वर्षभरापूर्वी २४ दशलक्ष स्विस फ्रँक इतकी होती. (Swiss Bank) तसेच भारतीय नागरिकांनी रोखे आणि इतर माध्यमातून एकूण ३०२ दशलक्ष स्विस फ्रँक इतकी गुंतवणूक केली होती. जी २०२१ नंतर लक्षणीयरीत्या कमी होताना दिसल्याचे, बँकेने म्हटले आहे.