T20 World Cup 2024 Squad : T20 वर्ल्डकपसाठी भारताच्या 20 खेळाडूंची संभाव्य नावे समोर; पहा कोणाकोणाला संधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात कोणकोणत्या खेळाडूंची निवड करण्यात येईल याबाबत संभाव्य यादी समोर आली असेल. 1 जूनपासून T20 World Cup 2024 ची सुरुवात होणार आहे. वेस्ट इंडीज व अमेरिका येथे या वर्ल्डकपचे आयोजन करण्यात आलं. त्यासाठी भारतीय संघात कोणाकोणाचा समावेश (T20 World Cup 2024 Squad) होईल त्याबाबत माहिती समोर आली आहे. भारतीय निवड समिती संघ निवड करताना चांगलाच समतोल राखेल. युवा खेळाडू आणि अनुभवी खेळाडू यांची योग्यप्रकारे सांगड घातली जाईल.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळल्या जाणाऱ्या टीम इंडियाच्या मेन स्क्वॉडमध्ये 15 मुख्य आणि 5 राखीव खेळाडू असणार आहेत. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, 20 संभावित खेळाडूंची नावं निश्चित आहेत. यापैकी 15 खेळाडूंना संघात स्थान मिळू शकते आणि 5 खेळाडू स्टँडबाय संघासोबत जाऊ शकतात. सध्या सुरु असलेल्या आयपीएल मध्ये चांगली कामगिरी केल्यास संधी मिळेलच असं नाही हे बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये दमदार कामगिरीमुळे आपली वर्ल्ड कपसाठी निवड होईल ही आशा मावळली आहे.

T20 विश्वचषक स्पर्धेसाठी विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत यांची निवड निश्चित (T20 World Cup 2024 Squad) मानली जात आहे. कोहलीला संघात स्थान मिळू शकत नाही अशा बातम्या मधल्या काही काळात प्रसारित झाल्या होत्या, मात्र विराट कोहलीचा साधायचा फॉर्म आणि आत्तापर्यंतचे संघासाठी दिलेलं योगदान पाहता त्याची निवड होणार हे नक्की आहे. तसेच आयपीएल मध्ये पूर्णपणे अपयशी ठरलेल्या हार्दिक पंड्याचा सुद्धा भारताच्या वर्ल्डकप संघात समावेश केला जाईल. याशिवाय शिवम दुबे, अक्षर पटेल सुद्धा अष्टपैलू खेळाडूंचा स्पर्धेत असतील.

पहा 20 खेळाडूंची संभाव्य नावे – T20 World Cup 2024 Squad

फलंदाज – रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग.

अष्टपैलू – हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, अक्षर पटेल.

फिरकीपटू – कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, रवी बिश्‍नोई.

यष्टिरक्षक – रिषभ पंत, के. एल. राहुल, संजू सॅमसन

जलदगती गोलंदाज – जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, आवेश खान.