T20 World Cup 2024 Squad : मोठी बातमी!! T20 वर्ल्डकपसाठी भारताचा संघ ‘या’ तारखेला जाहीर होणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येत्या १ जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत T20 विश्वचषक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या वर्ल्डकप साठी भारतीय संघ (T20 World Cup 2024 Squad) कधी जाहीर होणार याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष्य लागलं आहे. आयसीसीच्या नियमानुसार सर्व संघांना आपापल्या टीमची घोषणा 1 मेपर्यंत करायची आहे. त्यानुसार भारतीय निवेदन समिती सुद्धा लवकरच आपला संघ जाहीर करेल. मीडिया रिपोर्ट नुसार, येत्या 27 आणि 28 एप्रिलला याबाबत बैठक होऊन अधिकृत घोषणा केली जाईल.

27 एप्रिलला दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यासाठी भारताचा कर्णधार रोहित शर्मा दिल्लीत असेल. त्यामुळं हीच वेळ साधून निवड समितीचे सर्व सदस्य आणि प्रशिक्षक रोहित शर्मासोबत संघ निवडीबाबत चर्चा करतील. कोणकोणत्या खेळाडूचा संघात समावेश करण्यात यावा यावर विचार विनिमय होईल आणि मग वर्ल्डकपच्या अंतिम संघावर शिक्कामोर्तब होईल. निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर सध्या स्पेनमध्ये आहे. स्पेनवरुन दिल्लीला येऊन तो संघ निवडीच्या बैठकीत सहभागी होऊ शकतो.

या खेळाडूंचा सहभाग जवळपास निश्चित – T20 World Cup 2024 Squad

पीटीआयच्या वृत्तानुसार, T20 विश्वचषक स्पर्धेसाठी कर्णधार रोहित शर्मा व्यतिरिक्त, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, ऋषभ पंत, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव या खेळाडूंनी संघात (T20 World Cup 2024 Squad) आपली जागा निश्चित केली आहे. तर बाकी काही खेळाडूंच्या नावावर चर्चा सुरु आहे.

यंदाच्या T20 वर्ल्डकपमध्ये एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. त्यानुसार, प्रत्येकी पाच संघांचा चार ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला आहे.भारतीय संघ ए ग्रुपमध्ये असेल. या ग्रुपमध्ये भारताशिवाय पाकिस्तान, यूएसए, कॅनडा आणि आयरलँड आहे. भारताची पहिली मॅच 5 जूनला होणार आहे.