हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| IPL संपल्यानंतर आता T20 विश्वचषकाची क्रिकेटप्रेमींना उत्सुकता लागली आहे. यात भारतीय संघाची निवड जाहीर झाल्यामुळे तर ही उत्सुकता शिगेला केला पाहिजे. अशातच T20 विश्वचषकासंदर्भात (T20 World Cup 2024) एक मोठी अपडेट समोर आली आहे. आता वेस्ट इंडिज आणि अमेरिकामध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकाचे सामने मोफत पाहता येणार आहेत. होय, ही सुविधा डिज्नी प्लस हॉटस्टार अॅपकडून क्रिकेटप्रेमींना मिळणार आहे.
येत्या दोन जूनपासून टी20 विश्वचषकाला सुरुवात होत आहे. यावेळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया टी20 च्या मैदानात उतरणार आहे. तर टीम इंडियाचा 5 जून रोजी विश्वचषकातील पहिला सामना होईल. त्यानंतर 9 जून रोजी भारत आणि पाकिस्तान याच्यात सामना रंगणार आहे. खास म्हणजे, हे सामने डिज्नी प्लस हॉटस्टार अॅपवर मोफत पाहता येणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिका आणि वेस्ट इंडिजत होणारा टी20 विश्वचषकातील सामना डिज्नी प्लस हॉटस्टार या ॲपवर मोबाईल पाहता येईल.
याकरिता कोणतेही सब्सक्रिप्शन घेण्याची गरज पडणार नाही. म्हणजेच टी20 सामन्यांच मोफत प्रसारण डिज्नी प्लस हॉटस्टार वर पाहता येणार आहे. यापूर्वी 2023 साली झालेल्या वनडे विश्वचषकाचेही मोफत प्रसारण करण्यात आले होते. दरम्यान, ही घोषणा करत डिज्नी प्लस हॉटस्टारचे प्रमुख सजिथ शिवानंदन म्हणाले की, “मोबाइलवर ICC T20 विश्वचषक 2024 विनामूल्य ऑफर देण्यामागचा हेतूच क्रिकेट देशभरातील प्रेक्षकांत पर्यंत पोहोचवण्याचा आहे. आम्ही गेल्या वर्षीचा आशिया चषक आणि ICC क्रिकेट विश्वचषक विनामूल्य दाखवला होता. यामुळे आम्हाला नवीन प्रेक्षकांना सेवा देण्याची परवानगी मिळाली. याचा फायदा आम्हाला आमची दर्शक संख्या वाढवण्यासाठी झाला”