गादीची प्रतिष्ठा नसणाऱ्या राजाला जनता नाकारणारच होती – शरद पवार

प्रत्येकवेळी सत्ता असली की आपल्याला वाटतं तेच खरं असं नाही हे आता भाजपला कळून चुकलं असेल. पक्षांतर केलेल्या लोकांना जनतेने नाकारलं असून लोकांना आता राजकारण कळू लागलं आहे असं म्हणत शरद पवारांनी विधानसभा निवडणूक निकालांचं स्वागत केलं आहे.

कलम ३७० चा प्रचार भाजपवर उलटला

लोकसभा निवडणुकीवेळी पुलवामा हल्ल्याचा वापर करून सत्ता मिळवण्यात भाजपला यश मिळालं खरं. न भूतो न भविष्यती अशा प्रकारे कामगिरी करत भाजपने ३५० जागा काबीज केल्या. परंतु २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मात्र भाजपची ही डाळ शिजली नाही. राज्यात नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांनी जवळपास ७० हुन अधिक सभा घेत काश्मीरचा प्रश्न मांडण्याचा आटोकाट प्रयत्न केला.

मुख्यमंत्री म्हणून आदित्य ठाकरेंना काँग्रेस पाठिंबा देणार?

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या वरळी मतदारसंघामधील प्राथमिक कल हाती आले आहेत. मतमोजणीच्या कलांनुसार भाजपा-शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री युतीचा होणार याबद्दल दुमत नाही. पण प्रचारादरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी मुंबईतील सभेत भाजपाचा मुख्यमंत्री होणार असे म्हटले होते.

जामनेरमध्ये कमळ फुलले! गिरीश महाजन विजयी

राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जामनेर मतदार संघात एकतर्फी विजयी आघाडी घेत ते विजयी झालेत. त्यामुळं जामनेरमध्ये कमळ फुललेलं पाहायला मिळतंय. मंत्री महाजन यांन राष्ट्रवादीचे संजय गरूड यांचा पराभव केलाय.

धनंजय मुंडेंनी निवडणूकीत मारली बाजी!! पंकजा पराभूत

परळीतील धनंजय विरुद्ध पंकजा लढतीवर सर्व राज्याचे लक्ष लागलेले असताना धनंजय यांनी मतमोजणीत मोठी आघाडी घेत विजय मिळवला आहे. आघाडीतून धनंजय मुंडे विजयी झाल्याने राष्ट्रवादी समर्थक विजयाचा जल्लोष साजरा करत आहेत. धनंजय मुंडे यांनी सुरवातीपासूनच मतांची आघाडी घेत पंकजा मुंढेंना पिछाडीवर टाकले होते. त्यामुळे धनंजय मुंडे यांचा विजय निश्चित होता त्यामुळे कार्यकर्त्यांनी सुरवातीपासूनच  विजय साजरा करण्यास सुरवात केली होती.

भाजपचा पहिला उमेदवार विजयी !

नंदुरबार प्रतिनिधी । विधानसभेचा पहिला निकाल जाहिर झाला आहे. नंदुरबारहून भाजपचे उमेदवार विजय कुमार गावित विजय झालेत. तब्बल ९४००० मतांची आघाडी गावित यांनी मिळाली आहे. गावित यांच्या रूपाने भाजपला मिळालेला हा पहिला विजयआहे. राज्यभर आज सकाळपासून मतमोजणीला सुरवात झालीय. सातारा लोकसभेत भाजप धनंजय मुंडे आघाडीवर आहेत. तर सांगलीत आर आर पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील ह्या … Read more

राज्यातील हायव्होल्टेज लढती कोण जिंकलं??

सातारा प्रतिनिधी । २०१९ च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आता जवळपास हाती आले आहेत. निकालानंतर अनेक प्रस्थापितांचं दिवाळ निघाल्याचं पहायला मिळालं आहे. वृत्तवाहिन्यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार महायुतीचं सरकार पुन्हा स्थापन होईल हे खरं ठरलं असलं तरी शिवसेना आता काय विचार करणार याकडे जनतेचं लक्ष लागून राहिलं आहे. शरद पवार या व्यक्तिने ही निवडणूक फिरवली असाच या निकालांचा … Read more

भाजपच्या पहिल्या विद्यमान आमदाराचा पराभव

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून भाजपच्या पहिल्या विद्यमान आमदाराचा पराभव झाला आहे. परभणीतील पाथरी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे सुरेश वरपूडकर विजयी झाले आहेत. वरपूडकर यांनी भाजपचे विद्यमान आमदार विजय फड यांचा पराभव केला केला. आता अंतिम आकडेवारी आणि निवडणूक आयोगाची औपचारिक अधिकृत घोषणाच बाकी आहे. या निकालाने भाजपला मोठा धक्का बसला आहे.

परभणी जिल्ह्यात ‘आघाडी – युती’ मध्ये ‘कडवी झुंज’

जिल्ह्यामध्ये चारही मतदारसंघांमध्ये मतमोजणीस प्रारंभ झाला आहे. या सोबतच हलक्या पावसालाही सुरुवात झाली आहे. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत परभणी विधानसभा मतदार संघ वगळता गंगाखेड, जिंतूर आणि पाथरी विधानसभा मतदारसंघातील कल समोर आले आहेत. यामध्ये आघाडी व पिछाडीवर असणाऱ्या उमेदवारांमध्ये गंगाखेड मधून रासपचे रत्नाकर गुट्टे आघाडीवर आहेत. तर या ठिकाणी शिवसेनेचे विशाल कदम पिछाडीवर पडलेले आहेत. तर पाथरी मधून भाजपाचे मोहन फड आघाडीवर असून काँग्रेसचे सुरेश वरपूडकर दोन हजार मतांनी पिछाडीवर पडलेलं आहेत. सध्या या ठिकाणी दोघांमध्ये काट्याची लढत होत आहे. एका एका मतासाठी कार्यकर्त्यांची चांगलीच धाकधूक वाढत आहे.

आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद फिक्स..!! संजय राऊत यांच्याकडून फिफ्टी-फिफ्टीचा नारा

२०१९ विधानसभा निवडणुकीचा निकाल भल्या भल्यांची झोप उडवणारा ठरला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाने अनपेक्षित मुसंडी मारत युतीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. वरळीतील निकालानंतर संजय राऊत यांनी युती आता फिफ्टी फिफ्टी तत्वावर चालणार असल्याचं सांगत सेनेकडे किमान अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद राहील अशी सूचना केली आहे.