फक्त ४९९ रुपयांत ५ लाखांचे इंन्श्योरंस कव्हर; कोरोना संकटात प्रवास करत असाल तर मिळेल फायदा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकार आता देशभरात टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन बंद करत आहे. यासह देशभरातील देशांतर्गत पर्यटन उद्योगही हळूहळू वेग धरू लागलेला आहे. हे लक्षात घेता, डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म असलेल्या ‘PhonePe ‘ने नुकतेच एक विशेष इन्शुरन्स कव्हर सुरू केले आहे. ही योजना एक डोमेस्टिक मल्टी इन्शुरन्स कव्हर आहे, जे PhonePe ने आयसीआयसीआय लोम्बार्ड सह सुरू केलेली … Read more

कच्च्या तेलाच्या किंमती पाण्यापेक्षाही स्वस्त; मग तरीही इंधन दर वाढ का?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या इम्पेक्टमुळे जगभरातील आर्थिक कार्यक्रम थांबल्यानंतर गेल्या महिन्यात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये मोठीच घसरण झाली होती. मात्र ओपेकने (पेट्रोलियम उत्पादन करणार्‍या देशांची संघटना) कच्च्या तेलाचे उत्पादन घटवल्यानंतर,आता कच्च्या तेलाच्या किंमती पुन्हा वाढू लागल्या आहेत. ब्रेंट क्रूडचे दर प्रति बॅरल 39 डॉलर पर्यंत पोहोचले आहेत. त्याचबरोबर भारतात पेट्रोलचे दरही झपाट्याने वाढले आहेत. गेल्या … Read more

लॉकडाऊनमध्ये पुण्याहून औरंगाबादेत घरी आलेल्या विद्यार्थ्याची आत्महत्या

औरंगाबाद प्रतिनिधी | लॉकडाऊनमुळे पुणे येथून औरंगाबादेत घरी आलेल्या प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या 20 वर्षीय विद्यार्थाने घरातील हॉल मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पुंडलीकनगर मधील गजानन कॉलोनी भागात घडली. आत्महत्येचे कारण मात्र समोर आलेले नाही पोलीस पुढील तपास करीत आहेत. विवेक भाऊलाल पांणकडे असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली अधिक … Read more

राज्यात पुन्हा लॉकडाऊनच्या वृत्तावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात..

मुंबई । महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन जाहीर झाल्याच्या चर्चेवर मुख्यमंत्री कार्यालयानं स्पष्टीकरण दिलं आहे. राज्यात पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जनतेला विनंती व आवाहन केले आहे की, कुठेही गर्दी करू नका. शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा आणि स्वतःची काळजी घ्या असं मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे. … Read more

कोरोनाच्या उद्रेकामुळं ‘या’ राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू

नवी दिल्ली । कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आणि संकट पाहून पंजाब सरकारने कडक पाऊल उचलले आहे. पंजाब सरकारने कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात पुन्हा लॉकडाऊन जाहीर केले आहे. परंतु हे लॉकडाऊन-१ या प्रमाणे इतके कठोर असणार नाही. सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार पंजाबमध्ये शनिवार आणि रविवार तसेच सार्वजनिक सुटीच्या दिवशी संपूर्ण लॉकडाऊन असेल. म्हणजेच शनिवार आणि रविवार तर … Read more

दिल्लीत पुन्हा लॉकडाऊन? केजरीवालांची अमित शहांशी चर्चा

नवी दिल्ली । दिल्लीत लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर होणारी गर्दी आणि कोरोनाबाधितांची वाढती संख्या यामुळे सरकारपुढे पुन्हा लॉकडाऊन करण्याशिवाय गत्यंतर नसल्याचं दिसायला लागलं आहे. त्यामुळे दिल्लीतही लॉकडाऊन पुन्हा लागू करण्याचा विचार मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल करत असून त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी त्याबाबत चर्चाही केली आहे. लॉकडाऊन उठवल्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे ३१ जुलैपर्यंत … Read more

लॉकडाऊनमुळे अफगाणिस्तानच्या प्रसिद्ध मशिदीत १००० कबूतरांचा मृत्यू; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसमुळे फक्त माणसांनाच नाही तर प्राणी आणि पक्ष्यांना देखील त्रास होतो आहे. अशाच एका घटनेत, अफगाणिस्तानमधील प्रसिद्ध मजार-शरीफ मशिदीत पाळलेल्या जवळपास हजारो पांढऱ्या कबूतरांचा उपासमारीने मृत्यू झाला आहे. हे कबूतर मशिदीत पाळले गेले होते आणि कोरोना संसर्गामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे त्यांना खायला धान्य मिळाले नाही. लॉकडाऊनमध्ये मशिद उघडण्याची परवानगी नव्हती ज्याची … Read more

अन्यथा..पुन्हा एकदा लॉकडाऊन कठोरपणे लागू करावा लागेल; मुख्यमंत्री ठाकरेंचा कडक इशारा

मुंबई । लॉकडाऊनमधून काहीशी सवलत दिल्यानंतर अचानक रस्त्यांवर गर्दी वाढली आहे. सोशल डिस्टन्सिंगचे निमय मोडून गर्दी केली जात असल्याचे चित्र मुंबईसह अनेक शहरांमध्ये पाहायला मिळत आहे. त्यावर चिंता व्यक्त करतानाच लोकांनी गर्दी टाळली नाही तर नाईलाजाने पुन्हा एकदा कठोरपणे लॉकडाऊनची अंमलबजावणी करावी लागेल, असा इशारा कडक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. राज्यात लॉकडाऊनचा पाचवा … Read more

मुंबईतील लाॅकडाउन नियमावलीत बदल; BMC ने जारी केले ‘हे’ नवे निर्देश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रातील मुंबई शहरात झालेला आहे. येथे कोरोना-संक्रमित रुग्णांची संख्या ही ५० हजारांच्या जवळपास पोहोचली आहे. त्याचबरोबर मृतांचा आकडा ही १७०० वर पोहोचला आहे. या व्हायरसला रोखण्यासाठी इथे लॉकडाऊन नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिकेने लॉकडाऊनशी संबंधित काही सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ज्यामध्ये … Read more

आम्हाला शाळेतच जायचंय; मुलांची मागणी, ऑनलाईन शिक्षण पालक आणि मुलांना रुचेना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे देश जागेवर थांबला. उद्योग, व्यवसाय ठप्प आहे. याबरोबरच शिक्षण क्षेत्रावर देखील याचे दूरगामी परिणाम होताना दिसताहेत. अनेक परिक्षा रद्द झाल्या. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालल्याने जूनमध्ये शाळा सुरु होणार नसल्याचे दिसत आहे. आता ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय पुढे येवू लागलाय. हे … Read more