पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिक मध्ये

नाशिक प्रतिनिधी। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभर काढण्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. या वेळी भाजपकडून शक्तिप्रदर्शन केले जाणार असून, सभेची तयारी पूर्ण झाली आहे. मोदी आणि फडणवीस यांच्यासह अर्ध्या मंत्रिमंडळाच्या उपस्थितीत होत असलेल्या या जाहीर सभेच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे. … Read more

आमदार सिद्धाराम म्हेत्रेंची भाजपा नेत्यांसोबत ‘चाय पे चर्चा’

सोलापूर प्रतिनिधी। सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या काँग्रेस राष्ट्रवादीमधून सेना भाजपामध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे अन त्यात सर्वात आघाडीवर असणार नाव म्हणजे काँग्रेसचे अक्कलकोटचे विद्यमान आमदार सिद्धराम म्हेत्रे. स्थानिक भाजपा नेत्यांच्या विरोधामुळे या प्रवेश लांबणीवर पडला होता. मात्र, आज आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी बोलाविलेल्या ‘चाय पे चर्चा’ला तालुक्यातील भाजपा नेते उपस्थित होते. यामध्ये शिवशरण खेडगी, दत्ता तानवडे, … Read more

बेलापूर विधानसभेची जागा शिवसेना लढणार, आदित्य ठाकरेंचे संकेत

ठाणे प्रतिनिधी | युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रा आज नवी मुंबईत दाखल झाली. बेलापूर आणि ऐरोली विधान सभेत यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले होते. यावेळी आदित्य ठाकरे यांनी भाषण करताना बेलापूर विधानसभा मतदार संघात मी परत सभेसाठी येणार असून निवडणुकी नंतर विजयी मेळावा घेणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे अप्रत्यक्षरीत्या नवी मुंबईत … Read more

विजयराज खुळे शिवसेनेत, सुनील तटकरे यांना मोठा धक्का

रायगड प्रतिनिधी | रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती थांबायचं नाव घेत नाही. राष्ट्रवादीचे जिल्हा प्रवक्ते विजयराज खुळे यांनी सोमवारी शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधले. यावेळी आमदार भरत गोगावले, माजी आमदार तुकाराम सुर्वे, जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, प्रमोद घोसाळकर उपस्थित होते. अलीकडेच सुनील तटकरे यांचे पुतणे अवधूत तटकरे, भाऊ … Read more

सांगली, मिरज विधानसभेच्या जागेसाठी शिवसेनेचा आग्रह

सांगली प्रतिनिधी। प्रथमेश गोंधळे मागील काही वर्षात जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढली आहे. विधानसभेच्या निवडणुका आठवडा भरात जाहीर होणार असून सांगली, मिरज आणि तासगाव-कवठेमंकाळ या विधानसभेच्या जागा सेनेला मिळाव्या म्हणून जिल्हा शिवसेना संघटन आग्रह धरत आहेत. याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली जाणार असल्याचे जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी सांगितले. जिल्ह्यातील माजी आमदार सेनेच्या संपर्कात असून … Read more

संजय काकांकडून घराणेशाहीचा आरोप म्हणजे विनोद- विशाल पाटील

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे ‘लोकसभा निवडणुका होवून पाच महिने होत आले असले तरी खा. संजयकाका पाटील हे निवडणुकीमधून बाहेर आलेले नाहीत. तासगाव व कवठेमहांकाळ येथे बोलताना त्यांनी आमच्यावर घराणेशाहीचा आरोप केला. जे स्वत:च्या पत्नीला विधानसभेची उमेदवारी मागतात, ज्यांचे संपूर्ण राजकारण घराणेशाहीवर अवलंबून आहे, अनेक घराण्यांनी त्यांना मदत केलेली आहे असे असताना त्यांच्याकडून आमच्यावर होणारा … Read more

सांगली आणि जत मध्ये भाजपात बंडखोरी ?

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे  सत्ताधारी व विजयाची सर्वाधिक संधी म्हणून भाजपकडे इच्छुकांचा मोठा प्रवाह येत असून सांगली व जत मतदार संघात बलाढ्य इच्छुकांनी आपल्या मुलाखती दिल्यामुळे या ठिकाणी जोरदार चुरस निर्माण झाल्याचे चित्र आहे. या दोन्ही ठिकाणी बंडखोरी होण्याचे संकेत आतापासूनच प्राप्त होऊ लागले आहेत. आ.विलासराव जगताप यांच्या विरोधात सभापती तम्मनगौडा रवी, डॉ.रविंद्र आरळी … Read more