नगराध्यक्षाची निवड थेट जनतेतून; विधानसभेत विधेयक मंजूर

eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नगराध्यक्ष निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारने घेतला आहे. त्यासंदर्भातील विधेयक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत मंजूर करून घेतले. तसेच जनतेचं मत जाणूनच आम्ही हा निर्णय घेतला आहे असंही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. या विधेकाला विरोधकांनी कडाडून विरोध केला. मात्र, सरपंच आणि नगराध्यक्ष यांची निवड जनतेतूनच व्हावी … Read more

50 थरांची हंडी दीड महिन्यांपूर्वी आम्ही फोडली; मुख्यमंत्री शिंदेंची फटकेबाजी

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । सर्वात मोठी हंडी दीड महिन्यांपूर्वी आम्ही फोडली, आम्ही ५० थर लावले असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला लगावला. ठाण्यातील टेंभी नाका दहीहंडी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर,खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासहित अनेक दिग्गज उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेला दहीहंडी उत्सव … Read more

दहीहंडीला खेळाचा दर्जा, गोविंदांना सरकारी नोकरीत 5 टक्के आरक्षण; मुख्यमंत्र्यांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तसेच गोविदांना नोकरीत आरक्षण, तसेच गोविंदा पथकातील खेळाडुचा दहीहंडीच्या थरावरुन पडून मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास 10 लाख रुपयाचे आर्थिक सहाय्य आणि जखमीस 5 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाईल असेही त्यांनी सांगितले. गोविंदांना यापुढे 5 टक्के कोट्यातून सरकारी नोकऱ्या देण्यात … Read more

शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान भरपाई मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना प्रति हेक्टर मिळणारी नुकसान भरपाई आता दुप्पट होणार आहे अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे … Read more

एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ पोस्टरने वेधले लक्ष्य; उद्धव ठाकरे गट म्हणत शिवसेनेला पुन्हा डिवचले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत भाजप आणि शिंदे गटाला मोठं यश मिळाले आहे. भाजपने 82 तर शिंदे गटाने 40 ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकावला आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचे आभार मानणारे 1 पोस्टर शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी स्वतःच्या गटाचा उल्लेख शिवसेना केला असून शिवसेनेला उद्धव … Read more

राज्यात लवकरच 7500 पदांसाठी पोलीस भरती; मुख्यमंत्र्यांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात पुढील काही महिन्यात तब्बल साडेसात हजार पदांसाठी पोलीस भरती केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. एकनाथ शिंदे औरंगाबाद दौऱ्यावर असताना भाषणातून ही घोषणा केली आहे. त्यामुळे पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेल्यांची तयारीला लागावे. औरंगाबाद दौऱ्यावर असलेले शिंदे यांनी टीव्ही सेंटर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन … Read more

शिंदे vs ठाकरे; उद्याची सुनावणी कोर्टाने पुढे ढकलली; ‘या’ दिवशी होणार पुढील सुनावणी

uddhav thackeray eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील सत्तासंघर्ष सुप्रीम कोर्टाच्या दारात असून उद्या होणारी सुनावणी सर्वोच्च न्यायालायने ३ ऑगस्टला ढकलली आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयासह इतर सर्व याचिकांवर सरन्यायाधीश रमणा यांच्या त्रिसदस्यीय पीठासमोर ही सुनावणी होणार आहे. यापूर्वी झालेल्या सुनावणी वेळी उद्धव ठाकरे गटाच्या वतीने वकील कपिल सिब्बल … Read more

शिंदेंकडून शिवसेनेच्या नव्या नियुक्त्या जाहीर; कोणाला कोणती जबाबदारी??

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी नंतर खरी शिवसेना कोणाची हा प्रश्न आता थेट कोर्टात गेला आहे. त्यातच आता शिंदे यांनी शिवसेनेच्या नव्या नियुक्त्या जाहीर करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याना पुन्हा एकदा धक्का दिला आहे. शिंदे यांच्याकडून कोणत्या नेत्याकडे नेमकी कोणती जबाबदारी देण्यात आली आहे हे पाहूया.. दीपक केसरकर – मुख्य प्रवक्ते गुलाबराव … Read more

शेतकऱ्यांना 50 हजारांचे अनुदान ते वीज दरात सवलत; मंत्रिमंडळ बैठकीतील मोठे निर्णय पहाच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. सुमारे 14 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. तसेच यापूर्वीची तीन वर्षाची कर्ज फेडीची मुदत आता दोन वर्ष करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत महत्वाचे … Read more

शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, पण पक्षप्रमुख उल्लेख टाळला

eknath shinde uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज 62 वा वाढदिवस असून देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख मात्र टाळला आहे त्यामुळे पुन्हा एकदा अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत … Read more