गुड न्यूज! महाराष्ट्रातील पहिल्या करोनाग्रस्ताला डिस्चार्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात करोनाग्रस्त म्हणून नोंद झालेल्या पुण्यातील पहिल्या दोन करोनाग्रस्त रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. कोरोनाची लागण झालेल्या दाम्पत्याची करोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर पुण्यातील नायडू रुग्णालयातून त्यांना सोडण्यात आलं आहे. दुबईहून आलेल्या या दाम्पत्याला ९ मार्च रोजी नायडू रुग्णालयात आणलं होतं. त्यांची चाचणी केली असता त्यांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र, … Read more

मी घरात मिसेस मुख्यमंत्र्यांच ऐकतोय तुम्ही तुमच्या मिसेसचं ऐका ; मुख्यमंत्र्यांचा जनतेशी संवाद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज गुढीपाडव्यानिम्मित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. हा शिवरायांचा लढवय्या महाराष्ट्र आहे. गनिमी काव्यानं तो करोनाच्या संकटावर मात करणारच. तेव्हा सर्वानी सरकारच्या सूचनांचे पालन करून करोनाच्या संकटावर मात करून विजयाची गुढी उभारा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. आता जरी आपण शांततेत गुढीपाडवा साजरा करत असलो तरी ही … Read more

जीवनावश्यक सेवा मिळणारच, हातावरचं पोट असणाऱ्यांना जपूया – उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज गुढीपाडव्यानिमित्त राज्यातील जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. आता जरी आपण शांततेत गुढीपाडवा साजरा करत असलो तरी ही शांतता काही दिवसांनी जल्लोषात बदलेल असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला यावेळी दिला. हातावरचं पोट असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करु नका असं कळकळीचं आवाहन यावेळी उद्धव ठाकरे … Read more

लॉकडाऊन तोडणाऱ्यांना काश्मीरमध्ये अशी करत आहेत शिक्षा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात २१ दिवस लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र, लॉकडाऊन असतानाही लोक बाहेर पडत आहेत. बंदचे नियम पळतांना दिसत नाही आहेत. वारंवार घराबाहेर पडू नका असं आवाहन करून सुद्धा लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. शेवटी लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी पोलीस आता पोलीस वेगळ्यावेगळ्या शक्कली शोधून काढत … Read more

लॉकडाऊनचे पालन करा, अन्यथा दिसता क्षणी गोळ्या घालाव्या लागतील- चंद्रेशेखर राव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात २१ दिवस लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊन असतानाही सोमवार आणि मंगळवारी लोक बाहेर आल्याचे पाहून तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रेशेखर राव हे कमालीचे नाराज झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री चंद्रेशेखर राव यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. “नागरिक घराबाहेर पडल्यास त्यांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देऊ,” असा … Read more

१७ वर्षांची ग्रेटा थंबर्ग कोरोनामधून झाली बरी?

घरात राहू, कोरोनाशी लढू | जागतिक किर्तीची पर्यावरण कार्यकर्ता आणि मागच्या वर्षीची ‘टाईम्स पर्सन ऑफ द इयर” ठरलेली ग्रेटा थनबर्ग हीने तिला नोव्हेल कोरोना व्हायरसची बाधा होऊन त्यामधून ती बरी झाल्याचं म्हटलं आहे. ती १७ वर्षांची असून स्वीडन या देशामधे रहाते. मागच्या पंधरा दिवसांपूर्वी ती कोरोनाचा संसर्ग असलेल्या काही देशांच्या दौऱ्यावरून परत आल्यानंतर तिच्या घरच्यांपासून … Read more

देशात करोना व्हायरसमुळे ११वा बळी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसमुळे देशात आणखी एकाच बळी गेला आहे. तामिळनाडूमधील मदुराईमध्ये बुधवारी सकाळी एका ५४ वर्षीय व्यक्तीचा करोनामुळे मृत्यू झाला. मदुराईमधील राजाजी हॉस्पिटलमध्ये या करोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. करोना व्हायरसमुळे तामिळनाडूत झालेला हा पहिला मृत्यू आहे. अशी माहिती तामिळनाडू राज्याचे आरोग्य मंत्री सी. विजयभास्कर यांनी दिली. मदुराईच्या नागरिकांच्या मृत्यूनंतर देशातील करोना व्हायरसमुळे … Read more

धक्कादायक! कस्तुरबा रुग्णालयातील ५ डाॅक्टर कोरोना संशयित

मुंबई प्रतिनिधी | कस्तुरबा रुग्णालयातील कोरोना रुग्णांवर उपचार करत असलेले पाच डाॅक्टर कोरोना संशयित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करत असताना सदर डाॅक्टरांना कोरोनाची लागन झाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या राज्यातील डाॅक्टरांना वैद्यकिय साधनांची मोठ्या प्रमाणावर कमतरता भासत आहे. मार्ड संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून डाॅक्टरांच्या व्यथा … Read more

लाठीला तेल लावून ठेवा! गृहमंत्री अनिल देशमुखांनी दिले पोलिसांना आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील सरकाराने संपूर्ण राज्यात संचारबंदी लावली. लोकांच्या काळजीपोटी सरकारने घरात बसा असं सांगितल्यानंतरही अनेक जण बाहेर फिरतांना दिसत आहेत. गर्दी करताना दिसत आहेत. रस्त्यांवर वाहन घेऊन फिरताना दिसत आहेत. लोकांमध्ये कोरोनाच्या संकटाच्या परिस्थितीचे गांभीर्य दिसत नाही आहे. यावर अखेरचा उपाय म्हणून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांना बळाचा … Read more

संकट गंभीर आहे पण सरकार खंबीर आहे – मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई प्रतिनिधी । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील नागरिकांचे आभार मानले. सर्वजण शासनाच्या सूचनांचे पालन करत आहेत, स्वतःची काळजी घेत आहेत असे म्हणत ठाकरे यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच कोणीही घाबरून जाऊ नये, संकट गंभीर आहे पण सरकार खंबीर आहे असे म्हणत ठाकरे यांनी नागरिकांना विश्वास दिला. पाहुयात मुख्यमंत्री ठाकरे नक्की काय म्हणालेत – … Read more