‘पर्यावरण पूरक व डॉल्बीडीजे मुक्त’ गणेशोत्सव साजरा करा – विश्वास नांगरे-पाटील

नाशिक प्रतिनिधी । ‘मला डीजे नको, प्रत्येक चौकात सीसीटीवी कॅमेरा हवेत’ अशा प्रबोधनपर घोषवाक्यासह नाशिक पोलीस दल यंदा भर देत आहे. नागरिकांना ‘पर्यावरण पूरक व डीजेडॉल्बी मुक्त’ गणेश उत्सव साजरा करण्याबाबत तसेच महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज लावण्याबाबतचे आवाहन नागरिकांना तसेच मंडळाचे सदस्य यांना पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी केले. गंगापूर पोलीस स्टेशन नाशिक शहर … Read more

केसरीवाडा – विशिष्ट नजरेतून

आनंदोत्सव | प्रतिनिधी पुण्याच्या केसरीवाड्यातील गणपती विसर्जनाची २०१७ मधील विसर्जन मिरवणूक कशी होती? याशिवाय केसरीवाड्याचं अंतरंग कसं आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत – चित्र आणि दृश्यफीतींच्या माध्यमातून व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा विसर्जन मिरवणूक २०१७ केसरीवाडा अंतरंग https://youtu.be/JNA-X0PU6Rg सौजन्य – ABP माझा

स्वराज्य गर्जनेचा प्रतिक – केसरीवाडा गणपती

IMG WA

ज्या लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला, त्यांच्या केसरीवाड्यातील गणपती हा पुण्यातील मानाच्या गणपतींपैकी पाचवा गणपती आहे. त्या गणपतीबद्दल… ………स्नेहा कोंडलकर…….. जनतेने एकत्र यावे या भावनेतून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. आता गणेशोत्सव महाराष्ट्रातील एक सांस्कृतिक सोहळाच बनला आहे. पुणे शहर तर या आपल्या भव्यदिव्य उत्सवासाठी प्रसिद्ध आहे. पुण्यातील गणेशोत्सवातील मानाच्या गणपतींपैकी केसरीवाड्यातील गणपती … Read more

समाजभान जपणारा – दगडूशेठ हलवाई गणपती

Rugna Seva Abhiyan Year

गणेशोत्सव मंडळे ही सामाजिक बदलाची प्रेरक व्हावीत असं लोकमान्य टिळकांना वाटत होतं. त्याचाच आदर्श पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंडळही घेत आहे.

दगडूशेठच्या सजावटीचा गौरवशाली इतिहास

Dagdusheth Ganpati with dagine

आनंदोत्सव | प्रदीप देशमुख यंदाच्या वर्षी (२०१८) साली केरळमधील श्री राजराजेश्वर मंदिराची प्रतिकृती पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीची आरास करण्यासाठी वापरली जात आहे. मागील ३ वर्षांमध्ये (२०१५, २०१६ व २०१७) सुद्धा अशाच प्रकारची सजावट पहायला मिळाली होती. काही कारणाने ती पाहता आली नसेल तर खास तुमच्यासाठी आम्ही ती उपलब्ध करुन देत आहोत. तुम्हाला नक्कीच आवडेल. व्हिडीओ … Read more

दगडूशेठ हलवाई गणपती आणि श्री राजराजेश्वर मंदिर

Dagdusheth Ganpati

आनंदोत्सव | राहुल दळवी पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या दगडूशेठ हलवाई गणपतीची दरवर्षी असणारी आरास ही नयनरम्य अशीच असते. यंदाच्या वर्षीही श्री राजराजेश्वर मंदिराच्या प्रतिकृतीमध्ये दगडूशेठ हलवाई विराजमान होणार आहेत. केरळमधील कन्नूर जिल्ह्यात श्री राजराजेश्वर मंदिर आहे. केरळमधील १०८ प्राचीन शिवमंदिरांपैकी हे एक आहे. भगवान परशुरामाचे संदर्भही याठिकाणी असल्याचं आढळतात. मंदिराच्या उभारणीचा प्रवास जाणून घेऊया खास … Read more

महाराष्ट्राचं आराध्य दैवत – श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

Dagdusheth Halwai

यंदाच्या गणेशोत्सवाची रंजक सफर – घेऊन येतोय आपला चिन्मय साळवी – आनंदोत्सव – या विशेष सदरातून

उकडीचे मोदक

मोदक

खाद्यभ्रमंती | अमृता जाधव

साहित्य :
1 मोठा नारळ, किसलेला गूळ, 2 कप तांदूळाचे पिठ, वेलचीपूड, मिठ, तांदूळाच्या उकडीत घालण्यासाठी तेल, तूप

कृती :
▪ सारण बनवण्यासाठी नारळ खवून घ्यावा. प्रमाणासाठी एक स्टीलची वाटी घ्यावी. जितकया वाट्या खवलेला नारळ असेल त्याच्या निमपट किसलेला गूळ घ्यावा.पातेल्यात खवलेला नारळ आणि गूळ एकत्र करून मंद आचेवर ढवळत राहावे. गूळ वितळला कि वेलची पूड घालावी.

▪ आवरणासाठी तांदूळाची उकड करण्यासाठी नेहमी जितके पिठ तितके पाणी असे प्रमाण घ्यावे. 2 कप तांदूळ पिठासाठी 2 कप पाणी गरजेचे असते. जाड पातेल्यात 2 कप पाणी उकळवत ठेवावे. त्यात 1 चमचा तेल किंवा तूप घालावे. चवीसाठी थोडे मिठ घालावे. गॅस बारीक करून पिठ घालावे, ढवळावे. मध्यम आचेवर 2-2 मिनीटे 2-3 वेळा वरती झाकण ठेवून वाफ काढावी. गॅसवरून उतरवून 5 मिनीटे झाकून ठेवावे.

▪ परातीत तयार उकड काढून घ्यावी. हि उकड व्यवस्थित मळून घ्यावी लागते. उकड मळताना तेल आणि थोडे पाणी लावून मऊसर मळून घ्यावी.

▪ उकड व्यवस्थित मळून झाली कि त्याचे सुपारीपेक्षा थोडे मोठे गोळे करून त्याची पारी तयार करावी. त्यात एक चमचाभर सारण भरून बोटाने पारीच्या चुण्या कराव्यात आणि सर्व चुण्या एकत्र आणून मोदक बंद करावा.

▪ मोदकांना वाफवण्यासाठी चाळणीपेक्षा मोठ्या तोंडाचे जाड बुडाचे पातेले घ्यावे. त्यात 3-4 भांडी पाणी उकळावे. चाळणीत स्वच्छ सुती कापड ठेवून त्यावर जेवढे मावतील तेवढेच मोदक ठेवावेत. पातेल्यातील पाणी उकळले कि मिडीयम हाय गॅसवर पातेल्यात कूकरचा डबा ठेवावा त्यावर मोदकांची चाळण ठेवावी. पाणी मोदकांच्या तळाला स्पर्शेल एवढे असले पाहिजे. वरून झाकण ठेवून 12-15 मिनीटे वाफ काढावी.


मोदकाची उकड झाली सोप्पी

नमस्ते दोस्तहो, मोदकाची उकड कशी सोप्पी करता येईल त्यावर महिनाभर प्रयोग करत होतो. आता सर्वाना सहज करता येईल अशी उकडीची पध्दत सापडली. नक्कीच करुन पहा

१. पाव कीलो मोदकाच पिठ घेवून त्यात चवीपुरते मिठ व १ चमचा तूप घालून ते साध्या पाण्याने भाकरी सारख सॉफ्ट मळून घ्यायचे

२. कुकरची शिट्टी काढून अळुवड्या लावतो तस डब्यात हा मळलेला गोळा ठेवून कुकरमधून वाफ यायला लागल्यावर ६ ते ७ मिऩिटांनी गँस बंद करावा

३. वाफवलेला गोळा परातीत घेवून साध्या पाण्याने पुन्हा सॉफ्ट मळून घ्यायचा व त्याचे मोदक बनवावेत हवे तसे मोदक बनवता येतात लाती न फाटता
मोदक तयार झाल्यावर नेहमीप्रमाणे कुकरची शिट्टी काढून वाफवून घ्यायचे
मोदकाचे सारण
सारणासाठी मोठ्या नारळाची १ कवड ,२००ग्रँम गुळ, १ चमचा तूप, १चमचा वेलची पावडर