येथे 5 वर्षांत 1 लाख रुपयांचे होतील 1.46 लाख रुपये तसेच पैसेही राहतील सुरक्षित; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्येष्ठ नागरिकांना निश्चित-उत्पन्नाच्या साधनांच्या आघाडीवर दुहेरी त्रास सहन करावा लागत आहे. छोट्या बचत योजनांसह, गेल्या एका वर्षात मुदत ठेवींवरील व्याजदर बरेच खाली आले आहेत. आरबीआयने आपल्या रेपो दरात सातत्याने कपात केली आहे. यानंतर बँका आणि छोट्या बचत योजनांच्याही व्याजदरात घट झाली. मात्र, अशाही काही बँका आहेत ज्या ज्येष्ठ नागरिकांसाठी 5 वर्षांच्या … Read more

आता मोदी सरकारच्या ‘या’ योजनेतून मिळेल गॅरेंटेड नफा, LIC मार्फत मिळू शकेल लाभ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अलीकडेच केंद्र सरकारने पंतप्रधान वंदना योजनेचा कालावधी (पीएमव्हीव्हीवाय) हा 3 वर्षांसाठी वाढविला होता. या मंजुरीनंतर आता पंतप्रधान व्यय वंदना योजनेची अंतिम तारीख ही 31 मार्च 2023 पर्यंत वाढविण्यात आली आहे. प्रधानमंत्री खर्च वंदना योजना ही ज्येष्ठ नागरिकांसाठीची योजना असून त्या अंतर्गत मासिक पेन्शनचा पर्याय उपलब्ध करण्यात आलेला आहे. या योजनेंतर्गत ज्येष्ठ … Read more

पुणेकरांनो लाॅकडाउनमध्ये घरमालकांवर गुन्हे दाखल करताय? हे वाचा

पुणे । कोरोना संसर्गामुळे देशव्यापी संचारबंदी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे देशातील अनेक उद्योग व्यवसाय बंद होते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने भाडेतत्वावर राहणाऱ्या लोकांना सूट दिली होती. मात्र आता घरमालकांनी थकीत भाड्यासाठी मागणी सुरु केली आहे. यावरून मालक व भाडेकरू यांच्यामध्ये वाद होत आहेत. घरमालक आणि भाडेकरू यांच्यातील हे वाद सामंजस्याने सोडविण्याची गरज असल्याचे असोसिएशन … Read more

प्रधानमंत्री वय वंदन योजनेचा विस्तार, जाणून घ्या गुंतवणूक आणि पेंशनचे नवीन नियम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्येष्ठ नागरिक आणि वृद्धापकाळातील उत्पन्नाच्या सुरक्षिततेसाठी पंतप्रधान वय वंदना योजना किंवा पीएमव्हीव्हीवायची मुदत ही पुढील ३ वर्षांसाठी वाढविण्यात आलेली आहे. ही योजना आता ३१ मार्च २०२३ पर्यंत सुरू राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट समितीने नुकताच हा निर्णय घेतला आहे. पीएमव्हीव्हीवाय ही ज्येष्ठ नागरिकांसाठीची एक सामाजिक सुरक्षा योजना आहे … Read more

ज्येष्ठांची काळजी घेण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारने घेतला हा मोठा निर्णय

कौटुंबिक कलहामधून वृद्ध आई वडिलांना वृध्दाश्रमामध्ये जाऊन राहावे लागत असल्याची बरीच प्रकरणे सर्वांना माहीतच असतील. आपल्या उतरत्या वयामध्ये जेष्ठांना अश्या प्रकारे वागणूक मिळाल्यामुळे त्यांना पुढील आयुष्य अत्यंत हलाखीचे जगावे लागते. याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नागरिक कल्याण आणि देखभाल कायदा २००७ हा कायदा आला होता. त्याच्या परिभाषेमध्ये बदल करत आता केंद्र सरकारने एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यानुसार कायदाबदल करत घरातल्या बुजुर्गांची काळजी घेण्याची जबाबदारी मुलांबरोबरच जावई आणि सुनांवरही असेल, असा प्रस्ताव आहे. सरकार Maintenance and Welfare Senior Citizens Act 2007 मध्ये असलेल्या ज्येष्ठांची काळजी घेण्याच्या परिभाषेत बदल करणार आहे. ही परिभाषा अधिक विस्तारित करायचा सरकारचा विचार आहे.