यवतमाळ जिल्ह्यातील चिंचमंडळ येथे विवाहित महिलेचा विनयभंग

यवतमाळ प्रतिनिधी । मारेगाव तालुक्यातील चिंचमंडळ येथील एका ३२ वर्षीय विवाहित महिलेचा येथीलच एका ३१ वर्षीय युवकाने विनयभंग केल्याची तक्रार मारेगाव पोलीसात दाखल करण्यात आली आहे. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून या घटनेतील संशयीतास अटक करण्यात आली. मारेगाव पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या चिंचमंडळ येथील एका ३२ वर्षीय विवाहितेचा गावातीलच मनोज चौधरी या ३१ वर्षीय युवकाने शौचास … Read more

कोण मारणार ‘वणी विधानसभा’ क्षेत्रात बाजी; निवडणूक स्पेशल

यवतमाळ प्रतिनिधी । स्पेशल स्टोरी यवतमाळ पासून 107 किमी दूर असलेले जिल्ह्याचे शेवटच्या टोकाचे विधानसभा क्षेत्र म्हणजे वणी. वणी शहराला “ब्लॅक डायमंड सिटी” नावाने ओळखल जातं, कारण या क्षेत्रात खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणात आहे. वणी, मारेगाव, झरी असे तीन तालुके या विधानसभेच्या क्षेत्रात येतात. आता निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागलेत. प्रत्येक जण … Read more

यवतमाळ जिल्ह्यातील बीबीत महिलांनी गावठी हातभट्टीवर केला हाथ साफ

यवतमाळ प्रतिनिधी। यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील पोफाळी पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बिबी इथं मागील अनेक दिवसापासून गावठी दारू विक्री  सुरू होती. या गावठी दारूच्या हातभटीवर बीबीच्या महिलांनी धाड टाकली. या महिलांनी पोलिसांच्या मदतीनं हातभट्टी उद्धवस्त केली. दारुमुळ अनेकांचा संसार उध्वस्त होत असून भांडण-तंटे मोठ्या प्रमाणात सुरु होते.  दारू बंद करण्यासाठी बिबी येथील महिलांनी पुढाकार … Read more

नामुष्की…शेतकऱ्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालायावरच जप्तीची कारवाई

यवतमाळ प्रतिनिधी। आजपर्यंत आपण सरकारी अधिकाऱ्यांनी सामान्यांची मालमत्ता जप्त करताना पहिले असेल पण यवतमाळ जिल्ह्यात जी घटना घडली ती सर्वांच्या भुवया उंचावणारी आहे. कारण या घटनेत जप्तीची कारवाई दुसऱ्या एखाद्या कुणावर नाही तर थेट जिल्हाधिकारी कार्यालयावरच होणार होती. आणि जप्ती करणारे होते शेतकरी. अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा वाढीव मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्यांकडून … Read more

यवतमाळ जिल्ह्यातील जि. प.शाळेची इमारत बनली धोकादायक, पालक उपोषणाच्या पवित्र्यात

यवतमाळ प्रतिनिधी। यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील बोरी अरब येथून जवळच असलेल्या बोद गव्हाण येथील जि. प. शाळेची इमारत व व्हरांडा जीर्ण झालेला असून वर्ग खोल्यांच्या आतील छताचे तुकडे खाली पडत आहेत. त्यातच पावसाळा अजून असून छतातून पाणी गळत असल्यामुळे विद्यार्थाना शाळेच्या बाहेर बसून किंवा वर्गात बसून आपला जीव मुठीत धरून शिक्षण घ्यावं लागतं आहे. त्यामुळं … Read more

शेतकरी आत्महत्येला शेतकरीच जबाबदार- प्रकाश आंबेडकर

यवतमाळ प्रतिनिधी। शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी शेतकरीच जबाबदार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी विवादास्पद वक्तव्य केलं आहे. यवतमाळ इथं बोलतांना त्यांनी ही मुक्ताफळं उधळली. शेतकरी जात पाहून मतदान करतो. त्यामुळं शेतकऱ्याची ही अवस्था आहे. वंचित बहुजन आघाडीला मतदान केल्यास कापसाला हमी भावाप्रमाणे पैसे मिळतील. तर जात पाहून मतदान केल्यास 3500 रु प्रति क्विंटल प्रमाणे भाव मिळणार. असं म्हणून … Read more

आदर्श गावातील गावकऱ्यांनी केले ताट-वाटी वाजवीत आंदोलन

यवतमाळ प्रतिनिधी । यवतमाळ जिल्हयाच्या बोरी अरब क्षेत्रातील आदर्श ग्रामपंचायत असलेल्या पांढुर्णा बोद गव्हाण येथील नागरिकांत ग्रामपंचायतीच्या अनागोंदी कारभाराबद्दल असंतोष खदखदत आहे. या ग्रामपंचायतीन भ्रष्ट व अनियमित कारभाराचा कळस गाठल्यामुळ शेवटी जनतेला उठाव करावा लागला. याकरिता आवाज उठवून गावकऱ्यांनी ताट-वाटी वाजवीत ग्रामपंचायतीला विविध विकास कामाकरिता मिळालेला निधी व केलेल्या खर्चात झालेला भ्रष्टाचार गटविकास अधिकारी यांच्या … Read more

भर रस्त्यात तस्करीची वाळू ओतून अधिकाऱ्यांना शिवीगाळ

  यवतमाळ प्रतिनिधी | वाळू तस्कर किती बेलगाम झाले आहेत याचा प्रत्यय यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे आला. वाळूची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच घाटंजी तहसीलचे तलाठी अनंत चवडे आणि नायब तहसीलदार मिरगणे आदी कर्मचाऱ्यांनी धाव घेत वाळूचा ट्रॅक्टर अडवून वाळू वाहतूक करणाऱ्यांना वाहतुकीचा परवाना मागितला. अधिकाऱ्यांच्या विचारणेला प्रतिसाद न देता वाळूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांनी भर … Read more