राजीव सातव यांचे खंदे समर्थक गंगाधर पाटील चाभरेकर शिवबंधनात

काँग्रेसचे नेते राजीव सातव यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेले राजीव सातव यांना मोठा धक्का बसलाय. नांदेड जिल्ह्यातील हदगाव मतदार संघातून विधानसभेसाठी ईच्छुक असलेले गंगाधर पाटील चाभरेकर यांनी आज शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून घेतले.

काँग्रेसला धुळ्यात मोठा धक्का; अमरीश पटेल भाजपा मध्ये प्रवेश करणार

विधानसभा निवडणुकीसाठीचे उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतरही काँग्रेसला लागलेली गळती थांबलेली नाही. धुळे जिल्ह्यातील शिरपूरचे काँग्रेसचे आमदार अमरिश पटेल हे भाजपात प्रवेश करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज (९ ऑक्टोबर) शिरपूरमध्ये सभा होत आहे. या सभेतच ते भाजपात प्रवेश करणार आहे.

काश्मीरचं वादळ आज महाराष्ट्राला धडकणार; नामग्याल विरुद्ध ठाकरे जुगलबंदी रंगणार

पुण्यात आज राजकीय धुमश्चक्री होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी राज ठाकरे मंगळवारीच पुण्यात दाखल झाले आहेत. उमेदवारांच्या प्रचार कार्यालयांचं उद्घाटन केल्यानंतर आज राज ठाकरेंची सभा आज पुण्यात होत आहे. दुसरीकडे चंद्रकांतदादा पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत ज्यापद्धतीने भाजपने बालाकोट मुद्दा उपस्थित केला होता, त्याच धरतीवर विधानसभा निवडणुकीत काश्मीरमधील ३७० कलम रद्द करण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. लडाखमधील जामयंग त्सेरिंग नामग्याल या खासदाराला सोबत घेत भाजपच्या वतीने पुण्यात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. 

बंडखोरीचा फटका अदिती तटकरेंना बसणार? श्रीवर्धन मध्ये काँग्रेसच्या ३ बंडखोरांचे अर्ज कायम

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आदिती तटकरे यांच्या विरोधात काँग्रेसच्या तीन बंडखोर उमेदवारांनी आपले अर्ज कायम ठेवले आहेत. त्यामुळे तटकरे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. शिवसेनेबरोबर आता काँग्रेसच्या बंडखोरांना थोपविण्याचे मोठे आव्हान त्यांच्या समोर असणार आहे.

कोथरूडची लढाई ही नेता विरुद्ध कार्यकर्ता अशीच; इथल्या निवडणुकीत काश्मीर कशाला पाहिजे? – किशोर शिंदे

कोथरुडची निवडणूक ही स्थानिक विरुद्ध बाहेरचा अशीच असणार आहे. भाजपचा उमेदवार आजही कोथरूडमध्ये घर घेण्यासाठी धडपडत आहे. अशा परिस्थितीत ज्या माणसाला कोथरुड नक्की काय आहे हेच माहीत नसेल तो इथल्या लोकांमध्ये कसा मिसळणार असा सवाल करत – यंदा कोथरूडमध्ये १०० टक्के परिवर्तन होणार असा विश्वास मनसेचे कोथरुड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार किशोर शिंदे यांनी व्यक्त केला. हॅलो महाराष्ट्राला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.

गोपीनाथ मुंडेना पाडणारा ८२ वर्षांचा कार्यकर्ता संभाळतोय धनंजय मुंडेच्या प्रचाराची धुरा..!!

परळी रेणापूर मतदारसंघात गोपीनाथ मुंडे यांचा पराभव करणारी व्यक्ती आज धनंजय मुंडेच्या प्रचाराची धुरा आहात घेवून मतदारसंघ पिंजून काढत आहे. वयाच्या ८२ व्या वर्षी परळी मतदारसंघात फिरणारे माजी आमदार पंडितराव दौंड यांची परळी मतदारसंघात वेगळी ओळख आहे. १९८५ साली परळी रेणापूर मतदारसंघात गोपीनाथ मुंडे याना ३५०० एवढ्या मताधिक्याने पराभूत करून विजय खेचून आणला होता. त्यावेळी महाराष्ट्रातही याच निवडणुकीची चर्चा झाली होती. तेच पंडितराव दौंड आज धनंजय मुंडेच्या सोबत लढत आहेत.

अंबरनाथमधील बंड शमले; राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवाराचा काँग्रेसला पाठिंबा

अंबरनाथ मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने काँग्रेस उमेदवाराला समर्थन जाहीर केल्याने काँग्रेस राष्ट्रवादीत निर्माण झालेला तिढा अखेर सुटला. दोन्ही पक्षाच्या वतीने संयुक्त पत्रकार परिषद घेत या वादावर पडदा टाकण्यात आला.

मोदींची स्तुती करता आणि आमच्या भावना दुखावता; मुस्लीम नागरिकांचा आमदार रवी राणांना सवाल

मुस्लीम समुदायाच्या भावना दुखावणाऱ्या तीन तलाक तसेच आर्टिकल ३७० हटवण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाचे खासदार नवनीत राणा यांनी संसदेत समर्थन करणे आम्हाला पटले नसून, विधानसभा निवडणुकीत आम्ही तुमच्यासोबत असणार नाही, या शब्दांत आमदार रवी राणा यांच्या विरोधात स्थानिक मुस्लीम समुदायाने रोष व्यक्त केला आहे.

सेना-भाजपाला बंडखोरांचा फटका? ३० जागांवर विरोधकांना फायद्याची शक्यता!

सत्ता स्थापनेसाठी पुन्हा एकदा मैदानात उतरललेल्या शिवसेना-भाजपा महायुतीला बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता आहे. अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत बंड शमवण्यात महायुतीला यश आले नाही. काही नेत्यांनी आपली तलवार म्यान केली. मात्र, काही नेत्यांनी बंडाचा झेंडा उचलला. या बंडखोरीमुळे शिवसेना-भाजपाची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. महायुतीमधील या बंडखोरीचा आघाडीला तब्बल ३० जागांवर फायदा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

‘सुरेश खाडेंना पाला पाचोळ्यासारखे मतदार उडवून लावतील’- राजू शेट्टी

‘भाजपच्या आमदारांना सत्तेचा माज आला आहे. विरोधकांना पालापाचोळा व कचरा म्हणणाऱ्या सुरेश खाडेंना मतदारच पालापाचोळ्यासारखे उडवून लावतील. त्यांची सत्तेची मस्तीच मतदारच उतरवतील’ अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मिरजेतील पत्रकार परिषदेत केली. यावेेळी विशाल पाटील, जयश्रीताई पाटील, महेश खराडे, संदीप राजोबा, तसेच शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.