बीड मधील लढतींचे चित्र स्पष्ट, महायुती मधील गेवराईची बंडखोरी वगळता ‘बंड थंड’

गेवराई वगळता बीड जिल्ह्यात ‘महायुती’मधील सर्व बंडखोर नेत्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. यामुळे बीड मधील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बंडखोरांनी आपली तलवार म्यान केल्यामुळे पाच मतदार संघात दुरंगी लढत होणार असे चित्र स्पष्ट झाले आहे. तर गेवराई मतदारसंघात शिवसेनेचे माजी मंत्री बदामराव पंडित यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यामुळे या ठिकाणी भाजपचे विद्यमान आमदार लक्ष्मण पवार यांच्या अडचणीत वाढल्या आहेत. या मतदारसंघात भाजप – राष्ट्रवादी आणि अपक्ष अशी तिरंगी लढत होईल

कराड मध्ये पृथ्वीराज चव्हाणांना धक्का! १४ नगरसेवकांनी दिला भाजपला पाठींबा

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का बसला आहे. कराड नगरपालिकेच्या १४ नगरसेवकांनी पृथ्वीराज चव्हाणांची साथ सोडत भाजप उमेदवार अतुल भोसले यांना पाठिंबा दिला आहे. कराड दक्षिण मतदारसंघातून पृथ्वीराज चव्हाण निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

संग्राम देशमुखांची निवडणुकीच्या रिंगणातून पुन्हा एकदा माघार, राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह

सांगली प्रतिनिधी। जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी विधानसभा निवडणुकीतून दुसऱ्यांदा माघार घेतल्यामुळे कार्यकर्ते कमालीचे निराश व संतप्त झाले आहेत. सलग दुसऱ्यांदा त्यांनी तयारी करुन रिंगणातून माघार घेतल्यामुळे त्यांच्या पुढील राजकीय भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुढील विधानसभा निवडणुकीपर्यंत म्हणजे सन २०२४ पर्यंत कार्यकर्त्यांचे मनोबल टिकवून ठेवण्याचे आव्हान ते कसे पेलणार? यावरच त्यांचे पुढील राजकारण … Read more

बंडखोर भाजप आमदाराने काढली आक्रोश रॅली, तिकीट वाटपात दलाली झाल्याचा केला आरोप

उदगीर विधानसभा मतदारसंघातून तब्बल दोन वेळा निवडून आलेल्या आमदार भालेराव यांचा पत्ता भाजपनं कापल्यानंतर चिडून बंडखोरी करत त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. तसेच आपले अस्तित्व नमूद करण्यासाठी पहिल्यांदाच भालेरावांनी उदगीर शहरात आक्रोश रॅली काढत आपलं आव्हान कायम असल्याचं सांगितलं.

मत मिळत नाहीत म्हणून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला अश्रू अनावर

जालना जिल्ह्यातील बदनापूर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार बबलू चौधरी यांना अकोला निकळक गावातील भर सभेत अश्रू अनावर झालेत. ‘गेली १५ वर्ष बदनापूर मतदार संघात लोकांची सर्व कामे केली. मतदार संघातील जनतेच्या सोडवता आल्या तेवढ्या समस्या सोडवल्या. लोकांच्या सुख आणि दुःखात सहभागी होऊनही या मतदार संघातून कमी मतदान पडतं’ असं सांगत चौधरी यांनी यावेळी मला मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असं आवाहन उपस्थित गावकऱ्यांना केलं.

महाराष्ट्रात शत्रुघ्न सिन्हा करणार विरोधकांना ‘खामोश’

एकेकाळी भाजपची स्टार शॉटगन असणारे शत्रुघ्न सिन्हा आता काँग्रेसच्या बाजूने विरोधकांना खामोश करण्यासाठी सज्ज झाले आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुक प्रचाराच्या राजकीय शिमग्यात विरोधाकांना प्रचारात नामोहरम करण्यासाठी शत्रुघ्न सिन्हांच्या रूपाने काँग्रेसला त्याच्यासाठी नवा चेहरा मिळाला आहे.

टी.पी मुंडे यांचा भाजपमध्ये प्रवेश, धनंजय मुंडे यांना मोठा धक्का

काँगेसचे प्रदेश सरचिटणीस टी. पी मुंडेनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने धनंजय मुंडे यांना ही निवडणूक अवघड जाणार असल्याचे चित्र दिसत आहे

शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले अमित घोडा अर्ज मागे घेण्याच्या तयारीत

मुंबई प्रतिनिधी । पालघर शिवसेनेचे बंडखोर आमदार अमित घोडा यांनी तीन दिवसापूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र तीनच दिवसांत ते राष्ट्रवादी सोडणार असल्याची माहिती समोर येत आहे. पुन्हा एकदा ते स्वगृही परतणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सोमवारी अमित घोडा आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता असल्याने आता राष्ट्रवादीसमोर घोडा यांची मनधरणी करण्याचं मोठं आव्हान असणार … Read more

प्रणिती शिंदे यांचे ‘रुपाभवानी’च्या चरणी विजयासाठी साकडे

सोलापूर प्रतिनिधी । राज्यात सध्या नवरात्रीचा उत्सव सुरु आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने देवीची उपासना करत आहे. काँग्रेसच्या सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार प्रणिती शिंदे यांनी तब्बल ५ किलोमीटर चालत जाऊन रुपभावानी मातेचे दर्शन घेतलं. रविवारी पहाटे पाच वाजताच आमदार प्रणिती शिंदे आपल्या सातरस्ता येथील निवासस्थानापासून तुळजापूर रस्त्यावरील रुपभवानी मंदिरात जाण्यासाठी कार्यकर्त्यांसह बाहेर पडल्या. … Read more

परभणी जिल्ह्यात ‘युती’ पाठोपाठ ‘आघाडी’ला देखील बंडखोरीची लागण

परभणी प्रतिनिधी। परभणी जिल्ह्यामध्ये शिवसेना आणि भाजपा ‘युती’ला बंडखोरीचा मोठा फटका बसला आहे. युतीच्या बंडखोरांनी बंडाचा झेंडा उगारल्यानंतर आता याच बंडखोरीची लागण ‘आघाडी’तील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला देखील लागलेली दिसत आहे. परभणी विधानसभेसाठी रविराज देशमुख यांचे नाव घोषित झाल्यानंतर, काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या सुरेश नागरे यांनी आता बंडाचा पवित्रा घेतला आहे. मागील अनेक दिवसांपासून परभणी … Read more