म्हणून.. शरद पवार ‘ईडी’च्या कार्यालयात जाणार नाहीत!

मुंबई प्रतिनिधी। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे राज्य सहकारी बँकेच्या २५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे मास्टर माईंड असल्याचा ठपका ठेऊन त्यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर स्वतः जाऊन आपल्या गुन्ह्या बद्दल ईडीला माहिती देऊन तपासात सहकार्य करणार असे शरद पवार यांनी म्हणले होते. त्यानुसार ते आज दुपारी दोन वाजता ईडीच्या कार्यालयात जाणार … Read more

‘ईडी’ चा शरद पवार यांना;मेल तूर्तास चौकशीची गरज नाही

मुंबई प्रतिनिधी। राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) मेल पाठवण्यात आला असून तूर्तास चौकशीची गरज नसल्याचं सांगण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर शरद पवार स्वत: ईडीच्या कार्यालयात जाणार आहेत. दुपारी एक वाजता शरद पवार ईडीच्या कार्यालयात हजर राहणार आहेत. शरद पवार यांनी आपल्या वकिलाच्या माध्यमातून मेल … Read more

‘माफ करा साहेब, पहिल्यांदाच तुमचं ऐकणार नाही’ – जितेंद्र आव्हाड

मुंबई प्रतिनिधी। आज दुपारी दोनच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार हे मुंबईतील ईडीच्या कार्यालयात येणार आहेत. त्यामुळे ईडीसमोरच मोठा पेच निर्माण झाला आहे. तसंच “मी शुक्रवारी दुपारी २ वाजता ‘ईडी’ कार्यालयात उपस्थित राहणार आहे. मात्र, पक्ष कार्यकर्ते आणि समर्थकांनी या कार्यालयाबाहेर उपस्थित राहू नये. राज्यघटना आणि संस्थांचा आदर करण्याची आपली परंपरा कायम राखत … Read more

अण्णा हजारेंची शरद पवारांना क्लीन चीट, चौकशी करणार्‍यांची चौकशी करा

अहमदनगर प्रतिनिधी | सुशिल थोरात राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी आपल्याकडे जे पुरावे आले आहेत, त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव नाही. त्यांचा संबंध नसेल तर त्यांचे नाव आता कसे पुढे आले, याची चौकशी झाली पाहिजे, असे सांगत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पवारांना क्लीन चीट दिली आहे. अण्णा हजारे म्हणाले, शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी … Read more

मग… मुख्यमंत्र्यांवर सुद्धा गुन्हे दाखल करा – राजू शेट्टी

कोल्हापूर प्रतिनिधी। ‘शरद पवार यांच्यावर झालेल्या ईडी च्या कारवाईचे आम्ही स्वागत करतो. राज्य बँकेत झालेल्या घोटाळ्याबद्दल नक्की कारवाई झाली पाहिजे या मताशी मी सहमत आहे. त्यामुळे जसा पवारांवर गुन्हा दाखल झाला तसाच चार कारखान्यांना 200 कोटींचा पतपुरवठा करण्यासाठी हमी देणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे.’ असे मत माजी खासदार राजू शेट्टी यांनी शरद यांच्यावर … Read more

लोकसभेसाठी शरद पवार उभे राहिले तर मी लढणार नाही, उदयनराजेंच्या डोळ्यात पाणी

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातार्‍याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपात प्रवेश केल्याने जिल्ह्यातील राजकीय समिकरणे बदलली असल्यचे बोलले जात आहे. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची तारिखही पक्की झाली असून विधानसभेसोबतच होणार्‍या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडून उदयनराजेंविरोधात कोण निवडणुक लढणार हे अजून गुलदस्त्यात आहे. अशात आता शरद पवार जर लोकसभेसाठी उभे राहिले तर मी निवडणुक … Read more

आता साताऱ्यात गुलाल उधळायला बोलवा- शरद पवार

सातारा प्रतिनिधी। साताऱ्याचे खासदार उदयनराजे भाजपात गेल्यानंतर राष्ट्रवादीचा गड सावरण्यासाठी साता-यात कार्यकर्ता मेळाव्याच्या आयोजन करण्यात आल होतं. या निमित्ताने शरद पवार रविवारी साता-यात आले होते.  यावेळी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीने शहरातुन भव्य र‌ॅली काढत पक्षाची ताकद दाखवुन दिली, तर यानंतर झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात शरद पवार यांनी “सरकार किल्ले पर्यटणासाठी देते परंतू छत्रपतीच्या पराक्रमाची ही प्रतिकं … Read more

Big breaking | राष्ट्रवादीचं ठरलं, उदयनराजेंविरोधात श्रीनिवास पाटील लोकसभा लढणार

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून श्रीनिवास पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आह. राष्ट्रवादीच्या एक बैठकीत सदर निर्णय घेण्यात आल्याची माहिती विश्वसनिय सुत्रांकडून समजत आहे. त्यामुळे आता उदयनराजे भोसले यांच्या विरोधात श्रीनिवास पाटील लढणार असल्याचे निश्चित झाले आहे. श्रीनिवास पाटील दोन वेळा जुन्या कराड लोकसभा मतदारसंघातून खासदार होते. शरद … Read more

उदयनराजेंच्या विरोधात राष्ट्रवादीतर्फे ‘हे’ नाव चर्चेत, शरद पवार करणार शिक्कामोर्तब?

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा लोकसभेच्या पोटनिवडणूकीसाठी उदयनराजे भोसले यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून नवीन चेहऱ्याला संधी देण्याची तयारी सुरू आहे. यासाठी सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचे सुपुत्र सांरग पाटील यांना लोकसभेच्या मैदानात उतरवण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या २२ सप्टेंबरला पक्ष्याध्यक्ष खासदार शरद पवार सातारा दौऱ्यात सांरग पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करणार असल्याचे … Read more

विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे पहिले पाच उमेदवार जाहीर, तरुणांना संधी

बीड प्रतिनिधी। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बुधवारी बीड येथील कार्यकर्ता मेळाव्यात बीड मधील पाच विधानसभांसाठी उमेदवारांची घोषणा केली. विशेष म्हणजे उमेदवारी देताना तरुण चेहऱ्यांना संधी दिली गेली आहे. उमेदवारी जाहीर झालेल्यांमध्ये अनुक्रमे बीड मधून संदीप क्षिरसागर, गेवराई मधून विजयसिंह पंडित, केज मधून नमिता मुंदडा, परळी मधून धनंजय मुंडे, तर माजलगाव मधून माजी मंत्री … Read more