मध्यरात्रीच देवांना दुधाचा अभिषेक, राजु शेट्टींनी केली पंढरपूरातून आंदोलनाची सुरवात

thumbnail 1531714590686

पंढरपूर | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खाजदार राजू शेट्टी रात्री बारा वाजता पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दाखल झाले आणि त्यांनी विठ्ठलास अभिषेक घालण्यासाठी मागणी केली. परंतु वारकऱ्यांची दर्शनाची गर्दी पाहता हा अभिषेक नाकारण्यात आला. राजू शेट्टी यांनी नामदेव पायरीवर प्रतिकात्मक विठ्ठल रुक्मिणी च्या मूर्तीला दुधाचा अभिषेक घालून आंदोलनाचा श्रीगणेशा केला आहे. शिर्डीमध्ये मारुतीच्या मूर्तीला रात्री बारा … Read more

तिरुपती बालाजीला जाताय तर थांबा!

thumbnail 1531712823674

हैद्राबाद | तिरुपती बालाजीला जाताय तर थांबा!कारण बालाजीचे मंदिर इतिहासात पहिल्यांदाच बंद राहणार आहे. या संबंधी मंदिर समितीने सूचना प्रसिद्ध केली आहे. महा समरेशन अधिष्ठान या महापूजे साठी मंदिर ११ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट या कालावधीत बंद राहणार आहे. या काळात फक्त पुजारी आत जाऊन या महापूजेचा विधी पार पडणार आहेत. तिरुपती बालाजी हे देशातील … Read more

पुण्या-मुंबईचा दुध पुरवठा होणार खंडीत, दुध आंदोलकांचा आक्रमक पवित्रा

thumbnail 1531711946024

पुणे | दुधाला पाच रूपये दर वाढ देण्यात यावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी छेडलेल्या आंदोनलनाचा आज दुसरा दिवस आहे. दुध दरवाढीच्या मुद्द्यावरुन आंदोलक आक्रमक झाले असून पुण्या-मुंबई आदी शहरी भागातील दुध पुरवठा खंडीत करण्या पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. राज्यात ठीक ठिकाणी दुधाची रसद तोडली जात असून येत्या दोन दिवसात शहरी भागात … Read more

दुधाचे आंदोलन पेटले, अमरावतीमध्ये पेटवला टॅन्कर

thumbnail 1531659688837

अमरावती | सरकारला वारंवार इशारा देऊन ही सरकारने दूध आंदोलकांच्या इशाऱ्याची दखल घेतली नाही म्हणून राज्यातील प्रमुख शहरांना होणारा दुधाचा पुरवठा रोखण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. काल मध्यरात्रीपासून दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध पुरवठा रोखण्यासाठी विविध क्लुत्या राबवल्या आहेत.अमरावती आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे समजते या ठिकाणी दुधाचा टॅन्कर पेटवून दिला आहे. पोलिसांनी ठीक … Read more

धनगरांना आरक्षण देण्याची सरकारची इच्छा नाही – अजित पवार

thumbnail 1531622992908

बारामती | ‘धनगर समाजाला आरक्षण देण्याची राज्यातील सरकारची इच्छा नाही. वेगवेगळ्या चौकशी समित्या नेमून सरकार धनगर आरक्षणासंदर्भात चालढकलपणा करत आहे.’ असे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काल सत्ताधारी भाजपवर निशाना साधला. ‘या सरकारला धनगरांना आरक्षण द्यायचेच नाही. जर द्यायचे असते तर धनगरांचे सर्वेक्षण आणि संशोधन टाटा इन्स्टिट्यूट ला का दिले ? असा सवाल … Read more

तर मी विधान परिषदेच्या सभागृहात विष घेऊन आत्महत्या करेल – सुनिल तटकरे

thumbnail 1531501710143

नागपूर | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनिल तटकरे यांनी आज विधान परिषेदेत ‘..तर मी आत्महत्या करेन’ असे विधान केल्याने सभागृहात एकच गदारोळ उठला. सहावीच्या भूगोलाच्या पुस्तकाला गुजराती भाषेतील पाने जोडली गेल्याचा आरोप तटकरे यांनी सत्त‍ाधारी भाजपवर केला होता. परंतु चंद्रकांत पाटलांनी तो फेटाळून लावला. त्यावर बोलताना ‘मी सरकारवर केलेला आरोप खोटा निघाला तर मी विधान परिषदेच्या … Read more

शरद पवारांच्या बारामतीत तुकोबांचा मुक्काम, माऊलींनी नीरास्नान घेऊन गाठला लोणंद मुक्काम

thumbnail 15314926683111

बारामती | ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने आज निरास्नान घेऊन लोणंद गाठले आहे तर संत तुकाराम महाराजांची पालखी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या बारामती मुक्कामी आहे. माऊलींच्या पालखीने दुपारी नीरा-शिवतक्रार गावात नीरा स्नान घेतले. इंद्रायणी स्नाना नंतर नीरा नदीतील स्नान पवित्र स्नान मानले जाते. इंद्रायणी, नीरा,चंद्रभागा हे तिहेरी स्नान वारकऱ्यांसाठी पवित्र स्नान आहे. आज माऊलींची पालखी पुणे … Read more

भाजप झाला विधान परिषदेत सर्वात मोठा पक्ष, करू शकतो सभापती पदावर दावा

thumbnail 1531238213374

नागपूर : भाजप आता विधान परिषदेतील सर्वात मोठा पक्ष झाला आहे. भाजपचे विधान परिषदेत २१ सदस्य झाले आहेत. त्यामुळे भाजपला अाता विधान परिषदेतील सर्वात मोठा पक्ष म्हणून मान्यता मिळणार आहे. भाजपचे सद्याचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना पाय उतार व्हायला लावायची भाजपची योजना असल्याचे बोलले जाते. हल्लाबोल आंदोलन आणि विधी मंडळातील आक्रमकपणा यामुळे भाजप राष्ट्रवादीच्या … Read more

अजितदादांनी विधानसभा अध्यक्षांनाच धरले धारेवर

thumbnail 1531150762725

नागपूर : विधान भवन परिसरात साचलेल्या पाण्याची पहाणी करण्यासाठी गेलेल्या विधानसभा अध्यक्षांचा फोटो काल प्रचंड व्हायरल झाला. नेमका हाच मुद्दा पकडून राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनी अध्यक्षांना धारेवर धरले. अजितदादांनी चक्क अध्यक्षांनाच घेरल्याने सभागृहात हसावं की रडावं अशी स्थिती झाली होती. ‘ कोणीतरी आपला असा फोटो काढेल याचे भान ठेवून तुम्ही वागायला पाहिजे होते. तुमचा … Read more

“पक्ष वेगळे असले तरी पवारांबरोबरचा स्नेह चाळीस वर्षांचा” – वैंकय्या नायडू

thumbnail 1529661064274

बारामती : उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू आज बारामती दौर्यावर आले आहेत. शरद पवारांच्या बारामतीमधे नायडू यांना पाहून अनेकांच्या भुवया उंचावत आहेत. “पक्ष वेगळे असले तरी पवारांबरोबरचा स्नेह चाळीस वर्षांचा आहे” असे वैकय्या नायडू यांनी बारामतीत बोलताना म्हटले आहे. ‘बारामतीचा विकास पाहण्याची माझीच ईच्छा होती’ असेही नायडू म्हणाले आहेत. आज सकाळी ९ वाजता नायडु यांचे बारामतीमधे आगमन … Read more