राज्यातील सरकार अस्थिर करुन फायदा होईल, या भ्रमात विरोधी पक्षाने राहू नये- संजय राऊत

मुंबई । राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार अस्थिर करुन आपल्याला फायदा होईल, या भ्रमात विरोधी पक्षाने राहू नये. प्रत्येक सरकारमध्ये मग ते एकपक्षीय असले तरी त्यांच्यात कुरबुरी असतातच. त्यामुळे राज्यातील विरोधी पक्षाने कितीही प्रयत्न केले तरी महाविकासआघाडी सरकारला कोणताही धोका नाही, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त करत भाजपाला टोला लगावला. ते शनिवारी ‘झी २४ तास’ … Read more

संजय राऊतांनी काँग्रेसचे प्रवक्तेपद स्वीकारले आहे का? राधाकृष्ण विखे- पाटलांचा पलटवार

नवी दिल्ली । काल शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’तून राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर जळजळीत शब्दांत टीका करण्यात आली होती. विखे-पाटलांसारखी लाचारी अंगात भिनवायला मेहनत करावी लागते, अशी अत्यंत बोचरी भाषा या अग्रलेखात वापरण्यात आली होती. या टीकेला राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मंगळवारी पत्रक प्रसिद्ध करून प्रत्युत्तर दिले. यामध्ये विखे-पाटील यांनी संजय राऊतांचा समाचार घेतला आहे. संजय राऊत यांनी आज … Read more

भविष्यात शिवसैनिकाला पंतप्रधान बनवणार – उद्धव ठाकरे

मुंबई । आज शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा साधेपणाने साजरा करण्यात आला. भविष्यातील देशाचा पंतप्रधान शिवसैनिक असेल असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमा ठाकरे बोलत होते. मुख्यमंत्री ठाकरे यांनी वर्धापन दिनानिमित्त पदाधिकाऱ्यांच्या व्हिडीओ कॉन्फेरंसिंगमध्ये शिवसैनिकांना आज मार्गदर्शन केले. यावेळी आपली वाटचाल योग्य दिशेने सुरु असून एक दिवस या … Read more

उद्धवजी आम्ही तुमच्याकडे उद्याचे पंतप्रधान म्हणून पाहतोय- संजय राऊत

मुंबई । उद्धव ठाकरेंकडे आम्ही उद्याचे देशाचे पंतप्रधान म्हणून पाहतोय. आता राज्याच्या सीमा ओलांडण्याची वेळ आली आहे. आता देशाचं नेतृत्व करण्याची वेळ आली आहे, असं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात संजय राऊत बोलत होते. पक्षाचा विचार आणि सरकार एकत्र चाललं पाहिजे. सत्तेवर असल्याचं भान ठेवून काम करावं लागेल, … Read more

खाटेचं कुरकुरणं ऐकून तर घ्यावं; बाळासाहेब थोरातांचा संजय राऊतांना सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या काँग्रेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बैठकीसाठी मागणी करत आहे. यासंदर्भात सामना मध्ये एक अग्रलेख छापून आला आहे. या अग्रलेखात काँग्रेसला उद्देशून खाट का कुरकुरते आहे? सत्ता स्थापन होत असताना शिवसेनेने देखील त्याग केला आहे. असे लिहण्यात आले आहे. यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी हा अग्रलेख अपूर्ण … Read more

म्हणुन फडणवीसांनी मानले शिवसेनेचे आभार 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संचारबंदीच्या काळात अभिनेता सोनू सूद याने स्थलांतरितांना घरी पोहोचविण्यासाठी गाड्यांची उपलब्धता करून दिली होती. यानंतर माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर त्याचे भरभरून कौतुक झाले होते. मात्र काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी ‘सोनू सूदचा भाजपने प्यादा म्हणून वापर करून त्याला समाजसेवकाचा मुखवटा लावला’ असे विधान केले होते. त्यांच्या या विधानाला उत्तर … Read more

सोनू सूद भाजपचे आहेत असं जर शिवसेना म्हणत असेल तर आम्हाला आनंदच- फडणवीस

मुंबई । अभिनेता सोनू सूद याच्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीका केल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया सुरूच आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही यावर मत मांडलं आहे. ‘सोनू सूद भाजपचे आहेत असं जर शिवसेना म्हणत असेल तर आम्हाला आनंदच आहे. असं असलं तरी सोनू सूद यांच्यावर अन्याय होता कामा नये. त्यांनी स्वत:च्या हिंमतीवर एक … Read more

आपल्या कारकिर्दीतच राम मंदिर निर्माण होवो; संजय राऊतांच्या योगी आदित्यनाथांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आज ४८ वा वाढदिवस आहे. ४२ व्या वर्षापर्यँत सलग ५ वेळा खासदार बनण्यासोबतच वयाच्या २६ व्या वर्षी प्रथम खासदार झालेल्या योगीजींना सर्वात कमी वयात खासदार झाल्याचा सन्मान ही मिळाला आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना त्यांच्या जन्मदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही आपल्या ट्विटर … Read more

राजभवनात येणाऱ्या ‘चक्रम वादळां’पासून सावध राहा! सामनातून राज्यपालांना खोचक सल्ला

मुंबई । शिवसेना आणि राज्यपाल यांच्यातील वाद शमेल, ही अपेक्षा आता पूर्णपणे फोल ठरताना दिसत आहे. कारण शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कारभारावर खोचक टीका करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यपाल आणि शिवसेनेतील शीत युद्ध आणखी पेटण्याचे संकेत दिसत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा धोका लक्षात घेऊन विद्यापीठाच्या अंतिम  परीक्षा … Read more

जवळपास अडीच महिन्यांनी टीव्ही कोरोना मुक्त झाला – संजय राऊत 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  गेले अनेक दिवस देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दररोज रुग्णांच्या वाढणाऱ्या संख्या, कोरोनामुळे होणारे मृत्यू, कोरोना उपचार, कोरोनासंबंधी राजकीय लोकांचे आरोप-प्रत्यारोप, कोरोना बचावासाठीचे उपाय, दक्षता असे अनेक विषय माध्यमांमधून झळकत आहेत. टीव्ही लावला असता टीव्ही वर सतत कोरोनाचे अपडेट्स दिले जात आहेत. आज मात्र या बातम्यांची जागा ‘निसर्ग’ चक्रीवादळाने घेतली आहे. सकाळपासून टीव्हीवर … Read more