कोरोना: लॉकडाऊन दरम्यान नियम तोडणाऱ्यांना दोन वर्षापर्यंत तुरूंगवास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देश तीन आठवड्यांपर्यंत लॉकडाऊनमध्ये आहे. देशातील लोकांना पुढील २१ दिवस घर सोडू नका असे सांगण्यात आले आहे.फार महत्वाच काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नका, कारण असे आढळल्यास शिक्षेची तर दंड अशी तरतूद आहे. यामध्ये शिक्षा एका महिन्यापासून दोन वर्षांपर्यंत वाढविण्यात येऊ शकते. जे लोक २१ दिवसांच्या लॉकडाऊन दरम्यान नियम … Read more

रेशन आणि औषध स्टोअरसह या अत्यावश्यक सेवा राहणार सुरू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेता, केंद्रीय गृह मंत्रालयाने देशभरात येत्या २१ दिवसांपासून राबविण्यात येणाऱ्या लॉकडाऊन दरम्यान आवश्यक सेवा, प्रभावी उपाय आणि अपवाद या संदर्भात एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. या मार्गदर्शक तत्त्वामध्ये असे नमूद केले आहे की या सेवा २१ दिवसात कार्यरत राहतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी कोरोना विषाणूपासून … Read more

..जेव्हा ममता आणि शहा जेवणाच्या टेबलवर येतात आमने-सामने; फोटो व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ओडिशाच्या भुवनेश्वर येथे एकत्र जेवण केल्याचे छायाचित्र समोर आलं आहे. या छायाचित्रात त्यांच्यासोबत ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान सुद्धा जेवताना दिसत आहेत. मिळालेल्या वृत्तानुसार या सर्व नेत्यांनी पटनाईक यांच्या निवासस्थानी जेवण केले. … Read more

नरेंद्र मोदी हे भगवान ‘राम’ तर अमित शाह भगवान ‘हनुमान’ आहेत- शिवराजसिंह चौहान

जगातील कोणतीही शक्ती देशात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची अंमलबजावणी रोखू शकत नाही तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सिंह असून ते कोणालाही घाबरत नाही. असं विधान मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी बुधवारी केलं. एएनआय या वृत्तसंस्थेला भोपाळ येथे दिलेल्या मुलाखतीत चौहान यांनी हे विधान केलं.

मोदी आणि शाह श्वास घेण्यावरही बंदी घालतील; कुणाल कामरावरील कारवाईने कन्हैय्या कुमार भडकला

कुणाल कामरावर कारवाई करुन सरकारने दोन संदेश दिले आहेत. जर तुम्ही शाह आणि शहेनशहा यांची तळी उचलणार असाल तर तुम्हाला कोणत्याही गुन्ह्यातून सरकार सहज वाचवेल. पण, जर तुम्ही त्यांच्या कारभाराचं सत्य जगासमोर आणत असाल तर कायदा धाब्यावर बसवून, सर्व नियम पायदळी तुडवून तुमच्यावर विमान प्रवासाचीच काय श्वास घेण्याचीही बंदी घातली जाईल” अशा आशयाची टीका कन्हैय्याने ट्विटरद्वारे केली आहे.

‘तुकडे-तुकडे गँग’ आम्हाला माहितीचं नाही; आरटीआय अर्जाला गृहमंत्रालयाचे उत्तर

२०१६ साली जवाहरलाल नेहरु विद्यापिठामध्ये देशविरोधी नारे लावण्याचा कथित व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजप नेत्यांनी तेथील विद्यार्थ्यांचा तुकडे-तुकडे गॅंग असा उल्लेख करायला सुरुवात केली. भाजपच्या प्रत्येक प्रचारसभेत जेएनयुतील त्या कथित घटनेचा उल्लेख करत येथील विद्यार्थ्यांची तुकडे-तुकडे गँग कशी देशविरोधी हे ठसवण्याचा प्रयन्त भाजपचे शीर्ष नेते नेहमीच करताना दिसतात. मात्र, याच तुकडे-तुकडे गॅंगच्या अस्तित्वाबद्दल सरकारने घुमजाव केला केला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडे देशातील ‘तुकडे-तुकडे गँग’बद्दल कोणतीही माहिती नाही, असं स्पष्टीकरण आरटीआय अर्जाला उत्तर देताना सरकारने दिले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते संकेत गोखले यांनी सोमवारी यासंदर्भातील माहिती दिली.

मोदी, शहांची खरडपट्टी करणाऱ्या इतिहासकार इरफान हबीब यांना अलिगढ कोर्टाकडून नोटीस

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टिप्पणी केल्याबद्दल अलिगढ न्यायालयातील वकील संदीप कुमार गुप्ता यांनी हबीब यांना नोटीस पाठवली आहे.

मोदी-शहांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी जखमी झालेत, पोलिसांची हाणामारी संपेना, आंतरराष्ट्रीय पातळीवर टीका होतेय…तरीसुद्धा..

या आंदोलनाची तीव्रता उत्तर प्रदेशमधील अलिगढ युनिव्हर्सिटी, दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया युनिव्हर्सिटी या ठिकाणी वाढली असून या ठिकाणी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांकडून लक्ष्य करण्यात येत आहे.

परदेशी आईचा मुलगा राष्ट्रभक्त होऊ शकत नाही; भाजप खासदाराची राहुल गांधींवर टीका

राहुल गांधींनी केलेल्या विधानाचा जेवढा निषेध करावा तेवढा कमीच आहे. ज्या पक्षाच्या अध्यक्ष स्वतः महिला आहेत, त्यांच्या मुलानं असं विधान करणं त्यापेक्षा दुर्दैवं ते काय?. तसेच राहुल गांधींच्या विधानानं मी दुःखी असल्याचंही राजनाथ सिंह यांनी सांगितलं आहे

हिंदू मुस्लिमांमध्ये फूट पडण्याचा प्रयत्न करू नका; राऊतांचा भाजपवर निशाणा

व्होट बँक राजकारणाला आमचा विरोध आहे. व्होट बँकेचे राजकारण होऊ नये, हे अयोग्य आहे. पुन्हा हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करु नका.