संगीतकार अशोक पत्की यांचा जन्मदिवस

ashok patki

विशेष | अमित येवले

जाहिरातींचे जिंगल सम्राट म्हणून ओळख असलेल्या अशोक पत्की यांचा जन्म २५ ऑगस्ट १९४१ रोजी झाला. मराठी चित्रपटांतील अनेक गाण्यांसाठी त्यांनी संगीतकार म्हणून काम केलं आहे. तुकाराम, आईशप्पथ, भेट, आनंदाचं झाड, शुभमंगल सावधान, मी सिंधुताई सपकाळ, गलगले निघाले, बिनधास्त या चित्रपटांसाठी त्यांनी संगीतकार म्हणून काम केलं आहे. सर्वश्रेष्ठ संगीत दिग्दर्शनासाठीचा राष्ट्रीय पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. सप्तसूर माझे हे त्यांचं आत्मचरित्रही खूप लोकप्रिय आहे.

त्यांच्या जन्मदिवसानिमित्त हॅलो महाराष्ट्र परिवाराकडून मनःपूर्वक सदिच्छा