सातारा जिल्ह्यात सापडले 42 नवीन कोरोनाग्रस्त; ग्रामीण भागात रुग्ण वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीती

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी काल रात्री उशीरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटर मध्ये येथे उपचार घेत असलेल्यामध्ये निकट सहवासित 34, प्रवास करुन आलेले 3, सारी 4, आरोग्य सेवक 1 असे एकूण 42 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आले असून यामध्ये 24 पुरुष व 18 महिलांचा समावेश आहे. जावली तालुक्यातील रामवाडी येथील … Read more

माझ्या देहावर करा कोरोनालसीची चाचणी; सातारकर तरुणाचे मुख्यमंत्री ठाकरेंना निवेदन

मेढा प्रतिनिधी । सध्या जगभरात कोरोनाचे थैमान सुरु आहे. जगभरात कोरोनावर औषध शोधण्याची प्रक्रिया सुरु आहे. कोरोनाची लस शोधण्यासाठी शास्त्रज्ञ दिवस-रात्र झटत आहेत. कोरोना विषाणूच्या लसीची मानवी चाचणी माझ्या देहावर करावी अशी मागणी  जावली तालुक्यांतील मेढा गावातील नागरीकाने केली आहे. सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना  याबाबतचे निवेदन त्यांनी दिले आहे. ही मागणी करणाऱ्या नागरिकाचे नाव किसन … Read more

दुरावलेले उदयनराजे पुन्हा सक्रिय; जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मांडले कोरोनाबाबतचे ‘हे’ मुद्दे

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी गेल्या काही दिवसांपासून उदयनराजे भोसले हे सातारा जिल्ह्यातील घडामोडींपासून चार हात लांब होते. त्यामुळे त्यांच्या या दुराव्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. मात्र आता या चर्चाना पूर्णविराम मिळाला असून मागील दोन-चार दिवसांपासून ते पुन्हा सक्रिय झाल्याचे चित्र दिसून येते आहे. आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली तसेच विविध … Read more

कोरोना व्हायरस आपोआप गायब होईल – डोनाल्ड ट्रम्प 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या विधानांनी नेहमी चर्चेत असणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता त्यांच्या कोरोना विषाणूसंदर्भातील विधानामुळे चर्चेत आले आहेत. सध्या अमेरिका कोरोना बाधित रुग्णसंख्येत प्रथम क्रमांकावर आहे. बुधवारी अमेरिकेत कोरोनाचे ५२ हजार रुग्ण आढळले आहेत. स्थिती इतकी गंभीर असतानाही तरूप यांनी कोरोना आपोआप गायब होईल असे म्हण्टल्याने ते पुन्हा प्रकाशझोतात आले आहेत. सध्या … Read more

मनपा आयुक्तांची कोविड रुग्णालयास अचानक भेट; रुग्णांना मिळणाऱ्या सुविधांची केली चौकशी

औरंगाबाद प्रतिनिधी | एमआयडीसी’तर्फे चिकलठाण्यातील मेल्ट्रॉन कंपनीत उभारण्यात आलेल्या कोविड रुग्णालयात मनपा आयुक्त अास्तिककुमार पांडेय यांनी आज अचानकच भेट दिली. कोविड रुग्णालयात रुग्णांना सर्व सुविधा योग्य पद्धतीने मिळत आहेत कि नाही हे पाहण्यासाठी आयुक्तांनी याठिकाणी पूर्वकल्पना न देता भेट दिली. यावेळी पांडे यांनी येथील कोविड रुग्णांची त्यांनी आपुलकीने चौकशी केली. त्यावेळी रुग्णांच्या चेहऱ्यावर समाधान पाहावयास … Read more

लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नवरदेवाचा मृत्यू, १०० हून अधिक लोकांना कोरोना 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बिहारची राजधानी असणाऱ्या पटणा जिल्ह्यात लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नवरदेवाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याच लग्नात उपस्थित असणाऱ्या १०० हुन अधिक लोकांना कोरोना झाल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे. या घटनेमुळे नागरिकांसोबत आरोग्य यंत्रणेतही खळबळ उडाली आहे. या धक्कादायक घटनेची देशात सर्वत्र चर्चा सुरु आहे. संबंधित नवरा मुलगा हा सॉफ्टवेअर … Read more

कराड शहरात पुन्हा कोरोनाचा शिरकाव; सातारा जिल्ह्यात नवे 48 कोरोनाग्रस्त

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी काल रात्री उशीरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटर मध्ये येथे उपचार घेत असलेल्यामध्ये निकट सहवासित 37, प्रवास करुन आलेले 5, सारी 5, आय.एल.आय (ILI) 1 असे एकूण 48 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. यामध्ये कराड तालुक्यातील महारुगडेवाडी … Read more

सातारा जिल्ह्यात 14 नवीन कोरोनाग्रस्त; एकुण रुग्णसंख्या 1055 वर

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे उपचार घेत असलेल्या 14 नागरिकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. यामध्ये पाटण तालुक्यातील शेंडेवाडी (कुंभारगाव) येथील 18 वर्षीय युवक, 45 व 20 वर्षीय महिला, 42 वर्षीय पुरुष, कुसरुंड येथील 40 वर्षीय पुरुष, चोपडी येथील 60 वर्षीय … Read more

कोरोना विषाणूचे जागतिक स्तरावरील नवीन रेकॉर्ड 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण जगात धुमाकूळ घातलेल्या कोरोना विषाणूचे काही नवीन रेकॉर्ड समोर आले आहेत. यातील पहिले रेकॉर्ड म्हणजे जगभरात या विषाणूला बळी पडून मरणाऱ्यांची संख्या ५ लाख पार करून केली आहे तर दुसरे रेकॉर्ड म्हणजे जगभरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या आता १ कोटी पार करून गेली आहे. त्याचबरोबर एकाच दिवसात सर्वाधिक रुग्ण सापडण्याचे … Read more

जगातील कोरोना मृतांची संख्या ५ लाखांच्यावर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या महामारीचे संपूर्ण जगावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहेत. अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स यूनिवर्सिटी च्या आकडेवारीनुसार संपूर्ण जगात या विषाणूने ५,०२,५१७ लोकांचा बळी घेतला आहे. आणि एकूण रुग्णसंख्यादेखील वाढली असून ती १०,१७३,७२२ इतकी झाली आहे. संपूर्ण जगात सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत आढळून आले आहेत. एकाच दिवशी ४० हजारपेक्षा अधिक रुग्ण अमेरिकेत आढळून … Read more