आर्थिक संकटात आहात? तुम्हाला मिळू शकेल covid-१९ पर्सनल लोन 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटात संचारबंदीमुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे बरेचजण आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा नागरिकांसाठी आता काही बँकांनी covid-१९ पर्सनल लोनची सोय उपलब्ध केली आहे. अत्यंत कमी व्याजदरात हे लोन मिळू शकणार आहे. एसबीआय, बँक ऑफ बडोदा, इंडियन बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक आणि बँक ऑफ इंडिया … Read more

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री? भाजी आणि फळांनंतर आता ‘या’ कारणामुळे महागणार खायचे तेल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरस या सतीच्या रोगाने ग्रस्त असलेल्या लोकांना आता महागाईचा सामना करावा लागू शकतो. त्याचा परिणाम हा आगामी काळात आपल्या स्वयंपाकघरात दिसून येईल, यामुळे आपले महिन्याचे बजेटही खराब होऊ शकते. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार भारत सरकार आता खाद्य तेलावरील आयात शुल्क वाढविण्यावर विचार करीत आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि कॅन्टीन उघडल्यानंतर फळ तसेच भाज्यांचे … Read more

मोठी बातमी! २१ ऑक्टोबर आधीच होणार एमपीएससी ची परीक्षा? 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या संचारबंदीमुळे एमपीएससी ची नियोजित परीक्षा रद्द करण्यात आली होती. मात्र परीक्षांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका तयार होत्या. या तयार असणाऱ्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका ज्या प्रत्येक जिल्ह्यातील कोषागार कार्यालयात आहेत. त्या आता सुरक्षा कक्षात ठेवण्याची विनंती करीत २१ ऑक्टोबर पर्यंत त्या सुरक्षित ठेवण्यासाठीची मुदतवाढ एमपीएससीच्या सहसचिवांनी संबंधित जिल्ह्याच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे  आहे. त्यामुळे आता राज्यातील … Read more

बाहेर पडा काम करा, महाराष्ट्राला स्ट्राँग करा – पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेले अडीच तीन महिने देशात कोरोनामुळे सर्वत्र संचारबंदी आहे. देशातील रुग्णसंख्या वाढते आहे. देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राने ८८ हजारचा आकडा पार केला आहे. मात्र संचारबंदीमुळे सर्वत्र अर्थव्यवस्था ही  कोलमडली आहे. अशा परिस्थितीत आता अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी काम करावे लागणार आहे. मात्र अद्याप नागरिकांच्या मनात कोरोनाची भीती आहे. त्यामुळे आपल्याला कोरोना … Read more

कोरोनामुळे यंदाचा योगा दिवसही होणार ऑनलाईन; जिंकू शकता ‘ही’ मोठी बक्षिसे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरातील सर्व देशात पसरलेल्या कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर यंदाचा आंतरराष्ट्रीय योगा दिवस हा डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मवर साजरा केला जाईल. या संदर्भात सरकारने सांगितले की, यावर्षी योगा दिनावर कोणताही सामूहिक सोहळा किंवा कार्यक्रम होणार नाही. दरवर्षी योग दिन हा एका विशिष्ट थीमवर साजरा केला जातो. यंदाची थीम ‘योगासहित घर आणि योगासहित कुटूंब’ … Read more

लक्षणे नसलेल्या लोकांकडून कोरोनाचा संसर्ग नाहीच; जागतिक आरोग्य संघटनेचं स्पष्टीकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागतिक आरोग्य संघटनेच्या कोरोना विषाणूच्या प्रतिक्रियांसाठीच्या तांत्रिक प्रमुख आणि उदयोन्मुख रोग (इमर्जिंग डिसीज) च्या प्रमुख Maria Van kerkhove यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की कोणतीही लक्षणे नसणाऱ्या लोकांकडून कोरोना विषाणूचे संक्रमण झाल्याच्या घटना दुर्मिळ आहेत. विविध देशांच्या सतत संपर्कात राहून आम्ही ही माहिती मिळविली असल्याचे त्यांनी सांगितले. असे काही देश आहेत जे अगदी तपशिलात जाऊन काम करत आहेत. त्यांच्याकडून … Read more

मुंबईतील लाॅकडाउन नियमावलीत बदल; BMC ने जारी केले ‘हे’ नवे निर्देश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रातील मुंबई शहरात झालेला आहे. येथे कोरोना-संक्रमित रुग्णांची संख्या ही ५० हजारांच्या जवळपास पोहोचली आहे. त्याचबरोबर मृतांचा आकडा ही १७०० वर पोहोचला आहे. या व्हायरसला रोखण्यासाठी इथे लॉकडाऊन नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिकेने लॉकडाऊनशी संबंधित काही सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ज्यामध्ये … Read more

औरंगाबादेत आणखी एका कोरोनाग्रस्ताचे रुग्णालयातून पलायन; ४८ तासांतील दुसरी घटना

औरंगाबाद प्रतिनिधी | हर्सूल कारागृहातील दोन कोरोनाबधित आरोपी किलेंअर्क येथील कोविड सेंटर मधून खिडकीचे गज कापून पसार झाल्याच्या घटनेला अवघे 48 तासही उलटत नाही तोच शासकीय घाटी रुग्णालयातील मेडिसिन विभागात आयसीयू मध्ये उपचार घेणाऱ्या 38 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाने आज सकाळी 6.45 च्या सुमारास रुग्णालयातून पळ काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे घाटी प्रशासनाचा हलगर्जीपणा … Read more

खुलासा! ऑगस्टमध्येच पसरला होता कोरोनाचा संसर्ग; डिसेंबरपर्यंत चीनने लपविली माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिका आणि विशेषत: अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे चीनवर कोरोनाव्हायरस वुहानच्या प्रयोगशाळेत तयार केला गेला असून चीनने जाणूनबुजून हा संसर्ग इतर देशात पसरु दिल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे. तसेच त्याच्याविषयी कुठलाही गांभीर्याचा इशारा देखिल चीनने दिला नाही. आता हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की,’ ऑगस्ट महिन्यातच चीनमध्ये हा … Read more