कोरोनाचा धोका कायम; ‘या’ दोन राज्यांनी पुन्हा वाढवला लाॅकडाउन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोना ग्रस्त रुग्णांची संख्या वाढतेच आहे. त्याचप्रमाणे देशातील अर्थव्यवस्था देखील ढासळते आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आता संचारबंदीच्या पाचव्या टप्प्यात नियम शिथिल केले आहेत. कंटेन्मेंट झोन सोडून इतर ठिकाणी आता हळूहळू गोष्टी सुरु केल्या जात आहेत. हे सर्व सुरु करत असताना सामाजिक अलगाव चे नियम मात्र बंधनकारक असणार आहेत. दुसरीकडे … Read more

कराड तालुक्यात १८ कोरोना मुक्त रुग्णांना कृष्णा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी |  कराडच्या कृष्णा हास्पिटलमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण उपचार घेत आहेत. शेणोली स्टेशन येथील 7, म्हासोली येथील 3, वानरवाडी येथील 3, करपेवाडी, तामिनी-पाटण, साकुर्डी, सदुर्पेवाडी आणि गलमेवाडी येथील प्रत्येकी अशा एकूण 18 कोरोनामुक्त रूग्णांना आज कृष्णा हॉस्पिटलमधून टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. याच्याबरोबर आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमधून एकूण 162 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. … Read more

संपूर्ण देश कोरोनामुक्त झाल्याचे घोषित केल्यानंतर न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी चक्क केला डान्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण जगात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. जगातील अनेक देशांत याच्या संसर्गाचा आकडा हा सातत्याने वाढतोच आहे. एकीकडे जगभरात करोनाग्रस्तांची संख्या वाढत असतानाच न्यूझीलंडमधून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. सोमवारपासून न्यूझीलंडने कोरोनाच्या बचावासाठी देशभरात लावलेले सर्व निर्बंध मागे घेतलेले आहेत. कोरोनाचा संसर्ग झालेला शेवटचा रुग्ण बरा झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला … Read more

गुड न्युज! सप्टेंबर पर्यंत बाजारात येणार कोरोना वॅक्सीनचे २ अरब डोस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागतिक स्तरावर कोरोनाचा संसर्ग झालेल्यांचा आकडा हा ७ लाख ८५ हजारांच्या वर गेला आहे. आता शास्त्रज्ञांना आता खात्री पटली आहे की, लस येईपर्यंत या साथीवर नियंत्रण ठेवणे सोपे नाही. यामुळेच जगातील अनेक देश निरंतर या लसीच्या उत्पादनात गुंतले आहेत. दरम्यान, एक चांगली बातमी समोर येते आहे. ब्रिटीश-स्वीडिश फार्मा कंपनी AstraZeneca ही … Read more

आज जागतिक महासागर दिन; ‘शाश्वत महासागरांसाठी नाविन्यता’ ही यंदाची थीम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ८ जून हा दिवस जागतिक महासागर दिन म्हणून जगभर साजरा करण्यात येतो. पृथ्वीवर उपलब्ध असणाऱ्या एकूण पाण्याच्या ९७% पाणी हे महासागरांमध्ये सामावलेलं असल्याची माहिती शालेय शिक्षणातून मिळाली होती. महासागरांचा विचार करत असताना या पाण्यामध्ये अधिवास करणारे जलचर, या पाण्याचं सांडपाणी आणि घातक कचऱ्यापासून करावं लागणारं संरक्षण या गोष्टीही तितक्याच महत्वाच्या ठरतात. … Read more

मिशन बिगिन अगेनचा तिसरा टप्पा आजपासून सुरु; काय चालू होणार, काय बंद राहणार? 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र सरकारने मिशन बिगिन अगेन द्वारे आजपासून राज्यातील काही गोष्टी सुरु करण्यास परवानगी दिली आहे. संचारबंदीच्या शिथिल झालेल्या नियमांनुसार आजपासून खाजगी कार्यालये सुरु केली जाणार आहेत. १०% कर्मचाऱ्यांना कार्यालयात परवानगी असणार आहे. मुंबईमध्ये जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरु केली जाणार आहे. कंटेन्मेंट झोन वगळता राज्यातील अनेक भागात नियम शिथिल केले गेले आहेत. आजपासून … Read more

धक्कादायक! देशात केवळ ५ दिवसात कोरोनाचे ५० हजार रुग्ण वाढले

नवी दिल्ली । एकीकडे संपूर्ण देश अनलॉक होत असताना दुसरेकडे देशातील कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. प्रत्येक नवीन दिवसासह कोरोनाचे आकडे वाढतच आहेत. गेल्या 24 तासात कोरोनाची 9983 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळं देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अडीच लाखाच्या वर गेली आहे. चिंतेची बाब म्हणजे फक्त 5 दिवसात जवळपास 50 हजार नवीन रुग्ण … Read more

अरविंद केजरीवाल आयसोलेशनमध्ये, कोरोना चाचणी होणार

नवी दिल्ली | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना कालपासून बारीक ताप आणि घशात खवखव होतेय. यामुळे त्यांची करोना चाचणी करण्यात येणार आहे. त्यांनी बोलावलेल्या सर्व सर्व बैठका काल दुपारपासूनच रद्द करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कालच दिल्लीकरांसाठी मोठा निर्णय घेतला. दिल्लीतील रुग्णालयांमध्ये फक्त दिल्लीकरांवर उपचार होतील. मग ती हॉस्पिटल्स … Read more

सातारा जिल्ह्यात आज पुन्हा १० नवीन कोरोनाग्रस्त; दोघांचा मृत्यु पश्चात रिपोर्ट पॉझिटिव्ह

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी | सातारा जिल्हयातील दहा जणांचे रिपोर्ट कोरोनाबाधित आले आहेत. यामध्ये खडाळा तालुक्यातील आसवली येथील 60 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान तर मुंबई येथून प्रवास करुन आलेल्या वाई तालुक्यातील पसरणी येथील 75 वर्षीय पुरुषाचा घरीच मृत्यु झाला आहे. या दोघाचा मृत्यु पश्चात रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. अमोद गडीकर … Read more

धक्कादायक! हर्सूल कारागृहात एकाच दिवशी सापडले कोरोनाचे 29 रुग्ण

औरंगाबाद प्रतिनिधी | हर्सूल कारागृहात एकाच दिवशी 29 जणांचे स्वाब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व धार्मिक स्थळावर बंदी असताना हर्सूलमध्ये शारीरिक अंतर न पाळता ईदच्या दिवशी सामूहिक नमाज पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आता इथे कोरोनाने शिरकाव केल्याने प्रशासनाचा निष्काळजीपणा भोवल्याची चर्चा सुरू आहे. आज सकाळी 90 जणांचे … Read more