कोरोनामुळं ठप्प झालेली अर्थव्यवस्था रुळावर आणणं हेच मोठं आव्हान- अजित पवार

मुंबई । आजच्या घडीला कोरोनाच्या संकटावर मात आणि लॉकडाऊननं ठप्प झालेली अर्थव्यवस्था रुळावर आणणं ही दोनचं राज्यासमोरची प्रमुख आव्हानं आहेत. नागरिकांनी आणखी काही दिवस घरातच थांबून कोरोनाचा प्रसार रोखला तर या आव्हानांवर आपण लवकरात लवकर मात करु शकू, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. या आव्हानांवर लवकरात लवकर मात करण्यासाठी नागरिकांनी … Read more

Breaking | १४ एप्रिलनंतरही जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहणार

मुंबई । पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेला २१ दिवसांचा लॉकडाउन येत्या १४ एप्रिलला संपणार आहे. मात्र, देशातील कोरोनाबाधितांची वाढणारी संख्या पाहता १४ एप्रिलनंतरही जिल्ह्याच्या सीमा बंद ठेवण्याचा विचार सुरु आहे. आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सचिवांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे देशातील महत्वाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. देशांतल्या सर्व प्रशासकीय यंत्रणेला ह्या सूचना देण्यात आल्या आहेत. लॉकडाऊन नंतरही कोरोना संक्रमित … Read more

कोरोनाच्या संकटात मोदींनी माजी राष्ट्रपती, माजी पंतप्रधानांसोबत साधला संवाद

नवी दिल्ली। देशावर कोरोनाचं संकट आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, प्रतिभाताई पाटील, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, एच.डी देवगौडा यांच्याशी फोनवर संवाद साधला. तसेच पंतप्रधान मोदींनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी बरोबर विरोधी पक्षातील इतर नेत्यांशी सुद्धा फोनवर संवाद साधला. देशावर कोरोनाचं सावट आणखी दाट होत आहे. देशातील सर्व व्यवहार बंद … Read more

मराठवाड्यात कोरोनाचा पहिला बळी

औरंगाबाद । औरंगाबाद शहरात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. आज रविवारी एका ५८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सातारा परिसरातील रहिवाशी असलेल्या या व्यक्तीला काही दिवसांपूर्वी करोनासदृश्य लक्षणं दिसून आली होती. त्यानंतर या व्यक्तीला औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रविवारी उपचारदरम्यान मृत्यू झाला. बीड बायपास लगत असलेल्या सातारा परिसरातील मुबईहून … Read more

६ एप्रिल भाजपाचा स्थापना दिन, म्हणून दिवे लावायचं आवाहन केलं का?- कुमारस्वामी

वृत्तसंस्था । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवे लावण्याच्या कल्पनेवर समाजवादी जनता दलाचे नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी शंका उपस्थित केली आहे. कुमारस्वामी यांनी ट्विट करून काही प्रश्नही मोदींना विचारले आहेत. ”पंतप्रधानांनी धूर्तपणे देशाला भाजपाच्या स्थापना दिनाच्या पूर्वसंध्येला मेणबत्ती पेटवण्याचं आवाहन केलं आहे का? ६ एप्रिल भाजपाचा स्थापना दिन आहे, त्यामुळे … Read more

ध्यानात घ्या! दिवे लावताना काय करायचं? आणि काय नाही?

पुणे । गेल्या शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधत लॉकडाउनच्या काळामध्ये भारतीय दाखवत असलेल्या संयमाचे कौतुक केलं होतं. तसेच एकत्र येऊन करोनाला हरवूयात, असं आवाहन देशातील जनतेला केलं होतं. यावेळेस बोलताना मोदींनी भारतीयांना त्यांची ९ मिनटं मागितली होती. येत्या ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता एक गोष्ट करण्याचं आवाहन केलं होतं. यामध्ये त्यांनी … Read more

कोरोनावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मोदी घेणार सर्वपक्षीय बैठक

नवी दिल्ली । देशात करोनाचं संकट दिवसागणिक आणखी गहिरं होत चाललं आहे. केंद्र सरकार असो देशातील राज्य सरकारे करोनाला रोखण्यासाठी शर्थीचे प्रयन्त करत आहे. करोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी उपाययोजना म्हणून संपूर्ण देशात लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. देशातील सर्व आर्थिक, सामाजिक व्यवहार बंद आहेत. अशा सर्व बिकट परिस्थितीत चर्चा आणि मार्ग काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र … Read more

पुण्याचे टेन्शन वाढलं! करोना रुग्णांची संख्या १०० पार

पुणे प्रतिनिधी । मुंबई पाठोपाठ पुण्यातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये २१ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहे. यात पुणे शहरात १७ तर पिंपरी-चिंचवडमध्ये ४ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. या रुग्णामुळं पुणेकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. पुणे पिंपरी -चिंचवडमध्ये करोनाग्रस्तांचा आकडा आता १०३ वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत पुण्यात … Read more

पुण्यात करोनाने घेतला दोघांचा बळी; राज्यातील मृतांचा आकडा वाढला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यात करोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूचा आकडा वाढत चालला आहे. पुण्यात करोनामुळे बळींची संख्या ४ वर पोहोचली आहे. करोनासदृश्य लक्षणं आढळून आल्यानंतर ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या एका वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच ससूनमध्येच एका ४८ वर्षीय करोनाबाधित पुरुषाचा देखील मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हॉस्पिटल प्रशासनानं ही माहिती दिली. कोरोना … Read more

हुश्श.. सुटली बया एकदाची! कनिका कपूरचा सहावा करोना रिपोर्ट निगेटिव्ह

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। करोनाची लागण झालेली गायिका कनिका कपूरचा सहावा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’ने याबाबत वृत्त दिलं. दर ४८ तासांनी करोनाबाधित रुग्णाची चाचणी करण्यात येते. याआधी 5 वेळा तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. दरम्यान, आज तिचा सहावा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मात्र कनिकाला अजूनही रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला नाही. कनिकाची … Read more