दुर्दैवी … ! युवा क्रिकेटपटू मिथुन देबवर्माचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू , खेळ विश्वात शोककळा

क्रिकेट म्हणजे भारतीयांसाठी सर्वात आवडता खेळ … गल्ली क्रिकेट पासून दिल्ली क्रिकेट म्हणजे जणू एक सणचं झाला आहे . क्रिकेट प्लेयरन्सना तर अनेक जण देव मानतात . अत्यंत शाररिक मेहेनतीचा आणि तेवढाच चातुर्याचा हा खेळ आहे . पण या खेळणे अनेकांचे या ना त्या कारणाने जीव देखील घेतला आहे . मंगळवारी क्रिकेटच्या मैदानावर एका क्रिकेट खेळाडूने आपला जीन गमावला . सांगायला खूप वाईट वाटते कि खेळ

इंग्लंडचे गोलंदाज बाॅब विलीस काळाच्या पडद्याआड

टीम, HELLO महाराष्ट्र। इंग्लंडचे माजी कसोटी कर्णधार व फलंदाजांच्या मनात धडकी भरविणारे वेगवान गोलंदाज बाॅब विलीस यांचे बुधवारी वयाच्या ७० व्या वर्षी निधन झाले. निवृत्तीनंतर ते समालोचक म्हणून ओळखले जात होते. Cricket has lost a dear friend. — England and Wales Cricket Board (@ECB_cricket) December 4, 2019 १९८२ ते १९८४ या काळात ते इंग्लंडचे कर्णधार होते. … Read more

सौरव गांगुलीच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळ वाढणार!

मुंबई प्रतिनिधी | भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ने देशातील क्रिकेटच्या प्रशासनासाठी मंडळाला सर्वोच्च न्यायालय नियुक्त लोढा समितीने लागू केलेल्या शिफारशी बाजूला सारण्यास सुरूवात केली आहे. बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रविवारी पदाधिकाºयांच्या कार्यकाळाबाबत घेतलेल्या निर्णयांमुळे ही बाब स्पष्ट झाली, त्यासोबत बीसीसीआयचे नवनियुक्त अध्यक्ष, माजी कर्णधार सौरव गांगुली यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. … Read more

दिपक चहरची बहीण आहे माॅडेल, इन्स्टाग्रामवर आहे ‘इतके’ फाॅलोअर्स

मुंबई | 27 वर्षीय दिपक चहर टी -20 क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा पहिला भारतीय पुरुष क्रिकेटपटू बनला आहे. चहर याचे संपूर्ण देशात कौतुक केले जात आहे. अशात चहर याची बहिण मालती चहर हिने देखील इंन्स्टाग्रामवर वर व्हिडिओ पोस्ट करत आपल्या भावाचे कौतुक केले आहे. मॉडेल आणि अभिनेत्री मालती चाहरला तिचा भाऊ दीपकच्या अभिनयाचा अभिमान वाटतो. सोशल … Read more

‘आरसीबी’च्या तिजोरीमध्ये खडखडाट ! लिलावामध्ये मोठा झटका बसण्याची शक्यता

HELLO महाराष्ट्र| ‘इंडियन प्रिमीअर लीग’ म्हणजेच ‘आयपीएल’ची प्रसिध्दी सर्वसामन्यांपासून कधीच लपून राहिलेली नाही. आयपीएलचा प्रत्येक हंगाम हा नवीन रोमांचांनी भरलेला असतो. आगामी आयपीएल च्या पार्श्वभूमीवर आता डिसेंबरमध्ये खेळाडूंचा लिलाव करण्यात येणार आहे. आयपीएलच्या तेराव्या हंगामचा लिलाव 19 डिसेंबर रोजी कोलकाता येथे पार पडणार आहे. या लिलावामध्ये आयपीएल मधील सर्व संघ सहभागी होणार आहेत. मात्र भारतीय … Read more

‘गुगल’वर धोनी बद्दल सर्च करा पण जरा जपून!

तुम्ही जर क्रिकेटप्रेमी असाल, किंवा क्रिकेटपटू महेंद्र सिंग धोनी याचे चाहते असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. जगभरात कोट्यावधी लोक महेंद्र सिंग धोनी उर्फ ‘माही’चे चाहते आहेत. आपला आवडता क्रिकेटपटू धोनी याच्या बद्दलची माहिती मिळवण्यासाठी ते गुगलवर की वर्ड सर्च करत असतात. धोनीची इंत्यभूत माहिती गुगलवर सर्च करून मिळवणं सोप्पं असलं तरी ते आता अनेकांना महागात पडू शकतं. गुगलवर धोनी सर्च करणे त्याच्या चाहत्यांना महागात पडू शकते, असा इशारा एका अहवालातून देण्यात आला आहे. एका अँटीव्हायरस बनविणाऱ्या कंपनीने यासंबंधी एक रिपोर्ट नुकताच प्रसिद्ध केला आहे. यात याविषयीची माहिती दिली आहे.

प्रचारानंतर राहुल गांधी उतरले थेट क्रिकेटच्या मैदानात, केली तुफान फटकेबाजी!

राहुल गांधी यांनी हरयाणातील रेवाडी या ठिकाणी तिथल्या मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. राहुल गांधी सध्या हरयाणा येथे प्रचार करत आहेत. प्रचारासाठी जात असताना राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लॅन्डिग करावं लागलं. केएलपी कॉलेज या ठिकाणी हेलिकॉप्टर तातडीने उतरवण्यात आलं. त्यामुळे राहुल गांधी यांनी तिथल्या मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला.

रांची कसोटीत पुन्हा गुंजणार ‘धोनी… धोनी’ चा नारा

आपल्या घरच्या मैदानावर होणाऱ्या कसोटी सामन्यात महेंद्रसिंह धोनीही हजेरी लावणार आहे. धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली आहे. झारखंड क्रिकेट असोसिएशनने धोनीला सामन्यासाठी हजर राहण्याची विनंती केली होती, ज्याला धोनीने आपला होकार कळवला आहे. ज्यामुळे कसोटी सामन्यात प्रेक्षकांची संख्या अधिक वाढेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

शहीदांच्या मुलांना सेहवाग देतोय ‘क्रिकेटचे धडे’

समाजातील अनेक लोकांनी या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या मुलांची जबाबदारी घेतली आहे. भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागनेही आपली जबाबदारी पूर्ण करत, पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या मुलांना आपल्या शाळेत क्रिकेटचे धडे देतो आहे. सेहवागने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर या मुलांचे शाळेत खेळतानाचे फोटो शेअर केले आहेत.

‘क्रिकेट वर्ल्ड कप’ दर ३ वर्षांनी? बीसीसीआय-आयसीसी मध्ये वादाची ठिणगी!

आयसीसी च्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा कालावधी ठरलेला असतो. त्यानुसार एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा दर चार वर्षांनी तर टी २० स्पर्धा दर दोन वर्षांनी खेळवली जाते. आता मात्र टी २० विश्वचषक स्पर्धा दरवर्षी आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा दर ३ वर्षांनी आयोजित करण्याचा विचार आयसीसी करत आहे. दरम्यान, याच मुद्द्यावरून आयसीसी आणि बीसीसीआय यांच्यात मतभेद होताना दिसून येत आहेत.