कोरोनातून बर्‍या झालेल्या पोलीस कर्मचार्‍याचा अपघातात मृत्यू

अहमदनगर प्रतिनिधी | देशात सर्वत्र कोरोना संकटकाळात अग्रभागी लढणाऱ्या योद्ध्यांमध्ये पोलीस महत्वाची भूमिका बजावत आहेत. महाराष्ट्रात ही पोलीस बांधव मोठ्या प्रमाणात आपले कर्तव्य बजावत आहेत. यामध्ये अनेकांना कोरोना संसर्ग झाल्याचे देखील आढळून आले आहे. यामध्ये काही पोलिसांचा मृत्यूही झाला आहे. मात्र कोरोना संकटातून वाचलेल्या एका पोलिसाचा अपघातात मृत्यू झाल्याची दुःखद घटना समोर आली आहे. मोटारीच्या … Read more

अंडरवर्ल्ड डाॅन छोटा शकीलच्या बहीणीचा कोरोनामुळे मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलची मोठी बहीण हमिदा हिचे नुकतेच निधन झालेले आहे. ती कोरोनाव्हायरसने ग्रस्त होती. ठाण्यातील मुंब्रा येथे तिच्यावर उपचार सुरू होते. १ महिन्याच्या आतच छोटा शकीलच्या दोन्ही बहिणींचा मृत्यू झाला आहे. गेल्या महिन्यातच त्याची धाकटी बहीण फहमिदा शेख हिचे निधन झाले होते. तरुण बहिणीचा मृत्यू झाला छोटा शकील याच्या … Read more

आता आळंदीही कंटेन्मेंट झोन म्हणुन जाहीर; वारकर्‍यांत चिंता

पुणे । संत ज्ञानेश्वर यांचे समाधीस्थळ अर्थात आळंदी हे तीर्थक्षेत्र होय. आळंदी येथे कोरोनाने एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ज्ञानेश्वरांच्या पादुकांच्या प्रस्थान सोहळ्याला आता दोनच दिवस राहिले आहेत. दिनांक १३ जुनला ज्येष्ठ वद्य अष्टमीला हा सोहळा होणार आहे. या पार्श्वभूमीवर आळंदीतही धर्मशाळा, मठ आणि लॉजमध्ये बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना प्रतिबंध करण्यात आला आहे. … Read more

कोरेगाव तालुक्यातील कोरोना बाधित पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यु

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी | रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार सातारा शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल असणाऱ्या कोल्हापूर येथील 39 वर्षीय पुरुषाचा अहवाल कोरोना बाधित आल्याचे खाजगी प्रयोगशाळेने कळविले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे कोरेगाव तालुक्यातील गिघेवाडी येथील 78 वर्षीय कोरोना बाधित … Read more

कोरोनाचे निदान झालेल्या मुंबई महापालिकेच्या उपायुक्तांचे निधन 

मुंबई । मुंबई महापालिकेच्या विशेष अभियांत्रिकी विभागाचे उपायुक्त शिरीष दीक्षित यांचे निधन झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्या माहीम येथील राहत्या घरी मध्यरात्री त्यांचे निधन झाल्याची माहिती मिळाली आहे. महापालिकेने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. शिरीष दीक्षित यांचे कोरोना चाचणीचे अहवाल सकारात्मक आले होते. मात्र त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजले नसून त्यांचा मृतदेह सायन रुग्णलयात … Read more

दिल्लीत ३१ जुलैपर्यंत साडेपाच लाख रुग्ण होतील – मनीष सिसोदिया 

नवी दिल्ली । देशातील कोरोना रुग्णसंख्या दिवसागणिक वाढते आहे. देशाची राजधानी दिल्ली येथील रुग्णसंख्या गेल्या काही दिवसात वाढते आहे. आता उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी येत्या ३१ जुलैपर्यंत दिल्लीत साडेपाच लाख रुग्णसंख्या होण्याची शक्यता वर्तविली आहे. आज माध्यमांशी बोलताना त्यांनी हा आकडा सांगितला. एकूणच या आकड्यावरून दिल्लीतील स्थिती आणखी भयंकर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दिल्लीत … Read more

सातारा जिल्ह्यात आज पुन्हा १० नवीन कोरोनाग्रस्त; दोघांचा मृत्यु पश्चात रिपोर्ट पॉझिटिव्ह

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी | सातारा जिल्हयातील दहा जणांचे रिपोर्ट कोरोनाबाधित आले आहेत. यामध्ये खडाळा तालुक्यातील आसवली येथील 60 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान तर मुंबई येथून प्रवास करुन आलेल्या वाई तालुक्यातील पसरणी येथील 75 वर्षीय पुरुषाचा घरीच मृत्यु झाला आहे. या दोघाचा मृत्यु पश्चात रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. अमोद गडीकर … Read more

सांगली जिल्ह्यात कोरोनाचा पाचवा बळी : मुंबईहून आलेल्या ५८ वर्षीय महिलेचा झाला मृत्यू

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे | जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच आज जिल्ह्यात कोरोनाचा पाचवा बळी गेला. आटपाडी तालुक्यातील झरे येथील ५८ वर्षाची महिला कोरोना बाधित होती. त्यांना मिरजेतील आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आलं होत. त्यांची प्रकृती गेली काही दिवस चिंताजनक होती. मध्य रात्री दोन वाजण्याच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सांगली … Read more

कौतुकास्पद! हिंदू महिलेवर अंत्यसंस्कार करत मुस्लिम बांधवानी जपली सामाजिक बांधिलकी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. सर्व धर्म, जाती, वंश, वेशभूषा, प्रदेश असा कोणताच भेद इथे केला जात नाही अशी महती सर्वत्र भारताची सांगितली जाते. अलीकडे काही घटनांमुळे भारताच्या महतीला गालबोट लागले असले तरी आजही अशा अनेक घटना पाहावयास मिळतात ज्यामुळे देशातील बंधुभावाचे दर्शन घडते. सोलापूर शहरात अशाच एका घटनेचा प्रत्यय … Read more

२४ तासात महाराष्ट्रात कोरोनामुळे सर्वाधिक १२३ मृत्यूंची नोंद 

वृत्तसंस्था । राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहेच पण आज गेल्या २४ तासात राज्यात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यूची नोंदही झाली आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत मात्र तेवढेच रुग्ण बरेही होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र आज राज्यात १२३ हा सर्वाधिक मृत्यूचा आकडा पाहण्यात आला आहे. ही माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने आज जाहीर … Read more