कोयना धरणातून सिंचनासाठी नदीपात्रात 1500 क्युसेक्स सोडले पाणी

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कोयना धरणाची महाराष्ट्राची भाग्यरेषा अशी ओळख आहे. या धरणाच्या पायथा वीज गृहातील दोन्ही युनिट मधून आज दुपारी एक वाजता 1 हजार 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. कृष्णा व कोयना नदीकाठावरील परिसरातून उन्हाची तीव्रता वाढली असल्यामुळे सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे पिकांना … Read more

… तर मरणाची परवानगी द्या; कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे राष्ट्रपतींना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. कांद्याला दर मिळत नसल्याने राज्यसरकारकडे कांदा खरेदीची मागणी करू लागला आहे. नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याचं करायच काय? हा प्रश्न पडला आहे. अशा अवस्थेत हतबल झालेल्या चांदवडच्या शेतकऱ्यांनी जर शेती करून काही मिळणारच नसेल तर मरणाची तरी परवानगी द्या अशी मागणीचे पत्र राष्ट्रपतींना … Read more

याला म्हणतात प्रेम! शेतकऱ्यानं केला लाडक्या बैलाचा धुमधडाक्यात वाढदिवस

Birthday Of Tukya Bull

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी हौसेला मोल नसतं असं म्हणतात. होय खरंच हौसेला मोल नसतं हे करून दाखवलं आहे कराड तालुक्यातील गोवारे येथील शेतकरी सर्जेराव यादव बुवा यांनी. या शेतकऱ्याने आपला तुक्या खोंडचा पहिला वाढदिवस अगदी धुमधडाक्यात फटाक्यांची आतिषबाजी करत केक कापून साजरा केला आहे. सर्जेराव यादव यांच्याकडे असलेल्या हिंदकेसरी पक्षा या बैलाचा तुकाराम हा … Read more

सांगलीच्या शेतकऱ्यानं ऊसात पिकवला तब्बल पाऊण किलो वजनाचा कांदा

onion palus farmer Hanumant Shirgave

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या कांद्याला दर मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. नाशिक येथे तर शेतकऱयांनी आक्रमक पावित्रा घेत बाजार समितीचे लिलावात बंद पाडले. कांदा उत्पादकांचा प्रश्न विधिमंडळाच्या अधिवेशनातही चांगला गाजत आहे. अशात कांद्याला कवडीमोल दर मिळत असतानाच सांगलीतील एका कांदा उत्पादक शेतकऱ्याने चांगलीच कमाल करून दाखवली आहे. त्याने ऊसात कांद्याचे … Read more

राज्य सरकारने तात्काळ शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करावा; सभागृहात अजित पवारांनी केली मागणी

Onion Cotton Ajit Pawar Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून पायऱ्यांवर उतरत जोरदार आंदोलन केले. सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होताच विरोधी पक्षनेते अजित पवारांनी आक्रमक पावित्रा घेतला. “शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारने आज चर्चा घ्यावी. राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारने तात्काळ सोडवावे. सरकारने शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करावा,” अशी मागणी अजित … Read more

शेतकऱ्यांनी थेट कांदा लिलावच पाडला बंद; लासलगाव बाजार समितीत बेमुदत आंदाेलन

Lalasgaon Onion Market Committee farmer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : दिवसेंदिवस कांद्याच्या दरात मोठी घसरण होत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कमी दरामुळे त्यांनी घातलेला खर्च देखील निघत नाही. अशात नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत सकाळी लिलाव प्रक्रिया सुरु होताच कांद्याला कमी दर मिळाला. त्यामुळे आक्रमक झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन करत थेट लिलावच बंद पाडले. नाशिकच्या लासलगाव … Read more

ऊसतोड मजुराचा विक्रम : पठ्ठ्यानं 12 तासात तब्बल 17 टन 300 किलो तोडला ऊस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या ऊसतोडणी सुरु असल्यामुळे ग्रामीण भागात उसाच्या फडात तोडकऱ्यांच्या कोयत्यांचे आवाज येऊ लागले आहेत. ऊसतोडीसोबत जास्तीत जास्त ऊस कशाप्रकारे तोडला जाईल, याकडे तोडकरी लक्ष देत आहेत. ऊस तोड करत असताना कहाणी तोडकरी मजुरांकडून विक्रमही केले जात आहेत. असाच एक विक्रम जत तालुक्यातील खैराव येथील राहणारे ऊसतोड मजूर ईश्वर सांगोलकर यांनी केला … Read more

डोंगरावर म्हशी चारून केला अभ्यास; UPSC परीक्षा देऊन झाली कलेक्टर !

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दरवर्षी हजारो तरुण-तरुणी IAS परीक्षेसाठी दिवसरात्र मेहनत घेत असतात. काहीही झाले तरी अभ्यास करून यंदाच्यावर्षी आपण परीक्षेत यश मिळवायचेच अशी जिद्द करतात. आपल्या स्वप्नांना पूर्ण करणे हेच या विद्यार्थ्यांचे एकमेव लक्ष असते. अनेक विद्यार्थी अत्यंत गरीब परिस्थितीतून परीक्षा देत उत्तीर्ण होऊन अधिकारी होतात. अशीच यशोगाथा आहे एका गरीब कुटुंबातील शेतकऱ्याच्या लेकीची. … Read more

पेरू विकून MBA पास तरुणाने कमवले 1 कोटी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तम प्रकारची शेती करायची असेल आणि त्यातून चांगले उत्पन्न काढायचे असेल तर अनुभव आणि उत्तम ज्ञान असावे लागते. हे MBA शिक्षण घेतलेल्या नैनिताल येथील राजीव भास्कर या तरुण शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. त्याने आपल्या ज्ञानाचा उपयोग करून 25 एकर क्षेत्रात पेरूची शेती करून त्यातून उत्तम उत्पन्न घेत स्वतःच विक्री करून तब्बल … Read more

लाल मुळ्याच्या शेतीतून 8 वी पास शेतकरी झाला मालामाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेती करताना कमी वेळेत जास्त उत्पादन कसे मिळेल. अशी पिके शेतीत घेत आहेत. कमी गुंतवणूक करून शेतीतून भरघोस उत्पादन घेत आपली आर्थिक सुधारणा करत आहेत. शेती करण्यासाठी जास्त शिक्षण असावे लागत नाही त्यासाठी डोक्यात असावी लागते फक्त कल्पना हे मथनिया, जोधपूर येथील आठवी पास शेतकरी मदनलाल यांनी दाखवून दिले आहे. त्यांनी … Read more