कोविड -१९ मुळे वंचित शेतकऱ्यांना घेता येणार कर्जमुक्तीचा लाभ 

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची रक्कम वितरीत करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जुलै अखेरपर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार असल्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले आहे. बाळासाहेब पाटील म्हणाले शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती. मात्र संचारबंदीमुळे … Read more

आपल्या बॉलिवूड मधील प्रवासाबद्दल मनोज वाजपेयी म्हणाला ‘मीही त्यावेळी आत्महत्याच करणार होतो, पण…’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बिहारमधून बॉलिवूडमध्ये येण्याचा हा प्रवास अभिनेता मनोज वाजपेयी याच्यासाठी अजिबात सोपा नव्हता. या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये कोणत्याही गॉडफादरशिवाय येऊन मनोज वाजपेयीने आपली स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या संघर्षाच्या काळात आपल्याही मनात एकदा आत्महत्या करण्याचा विचार आला होता, मात्र त्यावेळी त्याच्या मित्रांनी त्याला फार साथ दिली, असे मनोज वाजपेयींच्या … Read more

शेतकर्‍यांसाठी महत्वाचं! असा काढायचा असतो डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातबारा काढायचा म्हणजे लोक नेहमीच वैतागतात कारण एका सातबाऱ्यासाठी तलाठी कार्यालयात बऱ्याच चकरा माराव्या लागतात. आता मात्र सरकारने हा व्याप कमी करत अवघ्या काही वेळातच ऑनलाईन स्वाक्षरीच्या सातबाऱ्याची व्यवस्था केली आहे. तो कसा काढायचा याची माहिती यामध्ये देत आहोत. सर्वप्रथम bhulekh.mahabhumi.gov.in वर जायचे आहे. आपण इथे महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाच्या वेबसाईटवर जातो. … Read more

पेरलेले सोयाबीन उगवले नाही ; शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे खरीप हंगामात शेतात मोठ्या कष्टाने पेरलेले सोयाबिन पीक उगवले नसल्याने आता दुबार पेरणी कशी करावी या प्रश्नाने उद्विग्न झालेल्या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पाथरी तालुक्यातील मर्डसगाव येथे शुक्रवार २६ जून रोजी घडली आहे. तालुक्यातील मर्डसगाव येथील तरुण शेतकरी विष्णु उद्धवराव शिंदे वय ३४ असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव … Read more

सहकारी बँकांशी निगडीत नवीन कायद्याचा तुमच्या खात्यातील पैशांवर काय परिणाम होणार ? घ्या जाणुन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सहकारी बँका अद्यापही आरबीआयच्या थेट देखरेखीखाली नव्हत्या, मात्र 24 जून रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार आता सर्व सहकारी बँका या आरबीआयच्या थेट देखरेखीखाली ठेवल्या जातील. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, … Read more

पती सीमेवर राहून करतो आहे देशाची सेवा, पत्नी झाली तहसिलदार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात गेल्या काही वर्षात स्त्री पुरुष समानता आली असल्याचे म्हंटले जात आहे. मात्र आजही काही ठिकाणी मुली या केवळ चांगला नवरा मिळावा म्हणून शिक्षण घेताना दिसतात. लग्नानंतर अनेक मुलींना शिक्षण सोडावे लागते मग नोकरी तर खूप दूरचा प्रश्न आहे. इंद्रायणी गोमासे यांची कथा थोडीशी वेगळी आहे. लग्नानंतर शिक्षण पूर्ण करून स्पर्धा … Read more

शेतकऱ्यांना कर्ज द्यायला नकार दिला तर होऊ शकतो गुन्हा 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या जगात पर्यायाने देशात आणि राज्यात कोरोनामुळे आर्थिक घसरण सुरु आहे. राज्यातील अनेक शेतकऱ्यांना मोफत कर्जवाटप शिल्लक आहे. राज्याच्या खजिन्यातील बरीचशी रक्कम कोरोना उपाययोजनांसाठी वापरण्यात आली असल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. सध्या शेतकऱ्यांचा पेरणीचा काळ आहे. यासाठी त्यांना पीक कर्जाची आवश्यकता असताना अनेक राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याची बाब … Read more

शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी! ‘या’ योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ जुलै पर्यंत येथे करा नोंदणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आता पावसाळा सुरू झाला आहे. यासह खरीप पिकाच्या पेरणीस देखील सुरुवात झाली आहे. सरकारने ट्विटरद्वारे खरीप पिकांच्या विम्यासंदर्भातली एक अधिसूचना जारी केल्याची माहिती दिली आहे, कृषी विभागाने आपल्या संदेशात म्हटले आहे की नैसर्गिक आपत्तीपासून बचावासाठी शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा काढला पाहिजे. बहुतेक राज्यात खरीप -2020 चा विमा मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली … Read more

पंतप्रधान किसान सन्मान योजनेत बदल; आता २ करोड पेक्षा जास्तशेतकऱ्यांच्या खात्यावर येणार ६ हजार रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही गेल्या वर्षी जाहीर करण्यात आली होती. या योजनेंतर्गत केंद्र सरकार थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करते. या योजनेंतर्गतचा पुढील हप्ता हा १ ऑगस्ट २०२० पासून शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केला जाईल. त्याच वेळी या योजनेत नुकताच एक मोठा बदल केलेला आहे. केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश … Read more

PM Kisan Scheme | KCC च्या सर्व लाभार्थी शेतकर्‍यांना मिळणार ३ लाखांपर्यंत स्वस्त कर्ज; जाणुन घ्या प्रक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील सर्व लाभार्थ्यांना शेतीसाठी स्वस्त कर्ज देण्याची योजना केंद्र सरकारने आखली आहे. पैशाअभावी कोणत्याही शेतकऱ्याने शेती व्यवसाय थांबवू नये म्हणून ही योजना आखण्यात आली आहे. येत्या काही दिवसात अडीच कोटी शेतकऱ्यांना केसीसी किसान कार्ड योजनेच्या माध्यमातून २ लाख कोटी रुपयांचे कर्ज देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी … Read more