कोल्हापूरात होम क्वारंटाईनचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार फौजदारी कारवाई

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोराना या विषाणूचा संसर्ग व प्रादूर्भाव टाळण्याकरिता होम क्वारंटाईन सांगितले आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करून त्यांना सक्तीने संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले आहेत. मागील काही दिवसात आपण परदेश प्रवास करून आला आहात किंवा परदेश प्रवास करून आलेल्या व्यक्तींच्या संपर्कात आला आहात. आपणास … Read more

कोरोना क्‍वारंटाईन पेशंट बाहेर फिरताना दिसला तर उचलून नेणार- गृहराज्यमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील प्रमुख चेक पोस्ट नाक्यांवर वाहनातील प्रवाशांची तपासणी करण्यासाठी तपासणी केंद्र उभारण्यात येणार आहे. तसेच क्‍वारंटाईन नागरिकांनी दक्षता म्हणून किमान चौदा दिवस घरातून बाहेर पडू नये. असे आढळल्यास त्यांना सक्‍तीने आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये ठेवले जाईल, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात … Read more

व्हिडिओ: ऐका हो! करोना पोवाडा..कोल्हापूरच्या शाहिराचा अनोखा जनजागृती पोवाडा

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर करोना आजाराबाबत जनजागृती व्हावी म्हणून कोल्हापूरचे प्रसिद्ध शाहीर विशारद डॉ. आझाद नायकवडी यांनी एक पोवाडा सादर केला आहे. सध्या जगभरात करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयन्त होत आहेत. त्यात आपलंही योगदान म्हणून शाहीर आझाद नायकवडी यांनी लोकांमध्ये करोनाविषयी जनगृती करण्यासाठी खास कोल्हापुरी स्टाईलचा पोवाडा लिहीला आहे. तर पाहुयात हा कोल्हापुरी स्टाइलचा … Read more

धक्कादायक! कोल्हापूर महापालिकेसमोर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयन्त

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोल्हापूरातील कसबा बावडा येथील आनंदा करपे या शेतकऱ्याने आज महापालिकेच्या गेटवरच आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी समयसूचकता दाखवत महापालिका कर्मचाऱ्यांनी तत्काळ शेतकऱ्याला वाचवत ताब्यात घेतलं. टीडीआर स्वरूपातील मोबदला मिळण्यात दिरंगाई होत असल्याच्या निषेधार्थ या शेतकऱ्याने हे पाऊल उचलले. यासंदर्भात त्यांनी वारंवार महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. तसेच महापालिका आयुक्तांना निवेदन तसेच … Read more

कौतुकास्पद! करोनाचा धोका लक्षात घेत कोल्हापूरात अवघ्या २० लोकांच्या उपस्थितीत उरकलं लग्न

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्रातही कोरोनो व्हायरस सदृश रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील वाघवे इथल्या ऋतुजा शेलार आणि गारगोटी इथल्या किरण शिंदे यांचा विवाहसोहळा अवघ्या 20 लोकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. हा सोहळा म्हणजे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शिंदे आणि शेलार कुटूंबियांनी सर्व समाजाला … Read more

करोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी सर्व विभाग प्रमुखांनी जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी – जिल्हाधिकारी कोल्हापूर

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर करोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी नेमून दिलेली जबाबदारी सर्व विभाग प्रमुखांनी सक्षमपणे पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज सभागृहात विविध विभाग प्रमुखांची जिल्हाधिकारी देसाई यांनी बैठक घेवून नेमून दिलेल्या जबाबदारीच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. याबैठकीला महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. … Read more

कोल्हापूरात रेल्वेचे तिकीट आरक्षण ५० टक्क्यांनी घटले; रेल्वे प्लॅटफॉर्मवर शुकशुकाट

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नागरिक प्रवास करणे टाळत आहेत. त्याचा फटका कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराज टर्मिनसला (रेल्वे स्थानक) बसला आहे. गेल्या पाच दिवसांमध्ये तिकीट आरक्षण ५० टक्क्यांनी कमी झाले असून, प्रवाशांची संख्या १५ टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे स्थानक परिसरात शुकशुकाट पसरला आहे. दक्षता म्हणून विविध रेल्वेच्या डब्यांची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण रोज … Read more

धसका करोनाचा! कोल्हापूरात केवळ शिंकल्यामुळं एकाला बेदम मारहाण

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर एकीकडे जीवघेण्या करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनापासून ते नागरिकांपर्यंत सर्वांनी कंबर कसली आहे. तर दुसरीकडे करोनाची दहशत लोकांमध्ये पसरली असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, कोल्हापूरात करोनाच्या धसक्यातून एका व्यक्तीला भर रस्त्यात बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. काल शहरातील गुजरी गल्लीत बाईक वरुन जाणाऱ्या दोघांमध्ये केवळ अंगावर शिंकल्याच्या कारणावरुन वाद झाला. … Read more

आंबोली घाटात बर्निंग कारचा थरार; चालत्या गाडीला आग लागून एका महिलेचा मृत्यू

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोडणाऱ्या आंबोली घाटामध्ये ‘बर्निंग कार’चा थरार पाहण्यास मिळाला. या दुर्दैवी घटनेत कारचालकाच्या पत्नीचा जळून मृत्यू झाला आहे. तर पती थोडक्यात बचावला असून त्याच्यावर सावंतवाडी इथं उपचार सुरू आहे. दुंडाप्पा पद्मनावर असं या कारचालकाचे नाव आहे. हा बेळगावच्या पिरनवाडीचा रहिवासी आहे. गाडी संरक्षक कठड्याला धडकल्यानंतर पूर्णपणे जळून … Read more

करोना इफेक्ट: टोपचा आठवडी बाजार, बिरदेव यात्रा आणि इतर कार्यक्रमही रद्द

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या आवाहनानुसार दर गुरुवारी होणारा आठवडी बाजार आणि खाटीक व धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेले श्री बिरदेव यात्रा हि दरवर्षी गुढीपाडव्यापासुन पाच दिवस चालते हीदेखील शासनाच्या आदेशाने रद्द करण्यात आली आल्याची माहिती टोपच्या लोकनियुक्त सरपंच रुपाली तावडे, उपसरपंच शिवाजीराव पाटील, ग्रामविकास अधिकारी डी. आ र. देवकाते … Read more