पुणे जिल्ह्यातील ‘हि’ गावे कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर; पहा यादी

पुणे । पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढते आहे. त्यामुळे पुण्यातील वातावरण चिंतादायक झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने महत्वाचे काही निर्णय घेतले आहेत. ज्यामध्ये बाहेरून येणाऱ्या प्रत्येकास विलगीकरणात ठेवणे, सामाजिक अलगाव च्या नियमांचे पालन करणे इत्यादींचा समावेश आहे. वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन प्रशासनाने जिल्ह्यातील ११ तालुक्यातील काही गावे कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केली आहेत. … Read more

वडिलांना सायकल वरून बिहार घेऊन जाणारी ज्योती देणार महासंघाची ट्रायल; देशाला मिळणार नवीन खेळाडू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सुरु असलेल्या लॉकडाउनच्या काळात विविध रंजक कथा ऐकायला मिळत आहेत. विविध राज्यांमध्ये अडकलेले स्थलांतरित मजूर बरेच त्रास सहन करत आपापल्या गावाकडे परत जात आहेत. अशीच एक ज्योती आहे जी तिच्या जखमी बापाला सायकलवर घेऊन गुरुग्रामहून थेट दरभंगाला पोहोचली. इतका लांबचा प्रवास केलेल्या या ज्योतीसाठी अखिलेश यादव यांनी लगेच १ लाखांची … Read more

पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या ४ हजार पार 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे जिल्हयात आज एकूण १७३३ स्वॅब संकलित करण्यात आले होते. यापैकी २०८ रुग्णांचे अहवाल सकारात्मक आले आहेत आणि याबरोबरच पुण्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ४१०७ इतकी झाली आहे. पैकी १६९८ प्रकरणे सध्या कार्यान्वित आहेत. यापैकी ४४ रुग्ण हे व्हेंटिलेटर वर आहेत तर १२५ रुग्ण आयसीयू मध्ये आहेत. आज पुण्यातील १५९ रुग्ण बरे … Read more

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नवीन, त्यांच्याकडे प्रशासकीय अनुभव नाही – देवेंद्र फडणवीस 

वृत्तसंस्था । राजकारणात वाद-प्रतिवाद होत असतात. महाराष्ट्राच्या राजकारणात तर ते सातत्याने होत राहतात. आपल्या विरोधकांच्या चुका शोधणे, त्या सातत्याने लोकांसमोर विविध माध्यमातून मांडत राहणे हे महाराष्ट्राला नवीन नाही. मग कोरोना संकटकाळात तर अशी संधी कोण कशी सोडेल? महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोरोना सुरु झाल्यापासून सध्याच्या सरकारच्या चुकांचा पाढाच वाचत आहेत. त्यातच … Read more

भारतीय लष्करही म्हणतंय संपूर्ण जगाला पोलिसांचा अभिमान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोणतीही आपत्ती आली की सुरक्षेसाठी सर्वप्रथम उभा राहणारा घटक म्हणजे पोलीस होय. कोणत्याही सार्वजानिक उत्सवाच्या वेळी, राष्ट्रीय सणाच्या वेळी आपले कुटुंब, आपला आनंद सारे काही बाजूला ठेवून ते बंदोबस्तात उभे असतात. नागरिकांच्या सेवेसाठी सतत तत्पर असणारा सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीदवाक्य  पाळणारा हा वर्ग Covid -१९ च्या लढाईत सुरुवातीपासून ढाल बनून उभा आहे. तेलंगणाचे आयपीएस महेश … Read more

लक्ष्मी रोडवर वर्दळ सुरु झाली आता तुळशीबाग केव्हा उघडणार ? 

पुणे । पुणे शहर म्हंटल्यावर डोळ्यासमोर काही ठिकाणे येतात. सारसबाग, लक्ष्मी रोड आणि तुळशीबाग ही सर्वप्रथम नजरेसमोर येणारी ठिकाणे आहेत. कुठूनही आलेला मनुष्य एकदातरी या ठिकाणांना भेट देतोच. ही ठिकाणे प्रसिद्ध आहेतच पण नेहमीच वर्दळीखाली असणारी आहेत. मात्र संचारबंदीमुळे ही गर्दीची ठिकाणे शांत झाली होती. नेहमी लोकांनी गजबजलेले हे रस्ते सुमसान भासत होते. मात्र दोन … Read more

पुण्याचा गणेशोत्सव यावर्षी पारंपरिक आणि साध्या पद्धतीने साजरा होणार

पुणे । गणेशोत्सव तसा महाराष्ट्रात सर्वत्र उत्साहाने साजरा होणारा उत्सव आहे. पुण्याचा गणेशोत्सव पाहण्यासाठी देशभरातून भाविक येत असतात. गणेशोत्सवातील पुण्याचा झगमगाट न्याराच असतो. मात्र यंदा कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे देशभरात प्रसिद्ध असणारा पुण्याचा ऐतिहासिक गणेशोत्सव पारंपरिक आणि साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सव मंडळांची ऑनलाईन बैठक घेण्यात आली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात … Read more

आईला भेटण्यासाठी १४०० किमी ड्राइव्ह करत मुंबईहून दिल्लीला पोहोचली ‘हि’ बॉलिवूड अभिनेत्री

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूमुळे देशात बर्‍याच दिवसांपासून लॉकडाउन सुरु आहे. अशा परिस्थितीत एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाणे हे एका आव्हानापेक्षा काही कमी नाही. पण हे असे असूनही अभिनेत्री स्वरा भास्करने या सुरु असलेल्या लॉकडाउन दरम्यान १४०० किमीचे अंतर कापले आहे, तेही रस्त्याने. या अभिनेत्रीने नुकताच मुंबई ते दिल्ली हा प्रवास केला आहे. स्वराने … Read more

पुण्यातील ‘हि’ महाविद्यालये १ जून पासूनच होणार सुरु

पुणे प्रतिनिधी । कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी २ महिन्यापासून संचारबंदी सुरु आहे. विषाणूचा वाढत संसर्ग पाहता यंदा शैक्षणिक वर्षाची सुरुवात १ ऑगस्ट पासून करण्याचे नियोजन होते. मात्र डेक्कन एज्युकेशन सोसायटीने त्यांच्या संस्थेची सर्व महाविद्यालये १ जून पासून सुरु करण्याचे ठरविले आहे. महाविद्यालये ऑनलाईन पद्धतीने सुरु करणार असून नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयाची सुरुवात बुधवारपासून झाली असल्याची  माहिती सोसायटीचे अध्यक्ष शरद कुंटे यांनी … Read more

लॉकडाऊनमध्ये अनुष्का शर्माच्या घरात घुसला डायनोसॉर; पहा व्हिडीओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जगभरात लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊनच्या काळात बहुतेक लोक आपापल्या घरातच कैद झालेले आहेत. या अशा लॉकडाऊनच्या काळात मात्र बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माच्या घरात ‘डायनासोर’ शिरला. या अभिनेत्रीने डायनासोरचा हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तो व्हिडिओ तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला. आता आपण विचार करत असाल की हे असे … Read more