‘मला लायकी नसलेल्या माणसाबद्दल बोलायची इच्छा नाही’; हितेंद्र ठाकुरांची विलास तारेंवर जहरी टीका

बहुजन विकास आघाडीचे बोईसर विधानसभेचे उमेदवार राजेश पाटील यांचा प्रचार सुरू झाला आहे. याच निमित्ताने मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील शिरसाडफाटा येथे बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर उपस्थित होते. यावेळी बोलतांना ठाकूर यांनी निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी मिळवलेले आमदार विलास तारेंवर निशाणा साधत टीकास्त्र सोडले.

१५ वर्षात पवारांनी महाराष्ट्राला काय दिले? – अमित शहा

‘पंधरा वर्षात केंद्रात आणि राज्यात ‘आघाडी’ची सत्ता असताना त्यांनी महाराष्ट्राला काय दिले?’ असा सवाल गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार आणि राहुल गांधी यांना कोल्हापूरातील सभेत विचारला आहे. ”चार लाख करोड रुपयांची मदत केवळ पाच वर्षात भाजप सरकारने महाराष्ट्रला दिल्या”चे त्यांनी यावेळी नमूद केलं.

‘मनसे’ अध्यक्ष राज ठाकरे आज विदर्भात

मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे हे सोमवारी विदर्भात प्रचाराला येत आहेत. सोमवारी, सकाळी ७.३० वाजता ते खासगी विमानाने नागपूर विमानतळावर येतील. विमानतळावर मनसे कार्यकर्त्यांकडून स्वागताचा स्वीकार करून ते वणी येथे रवाना होतील.

‘मतदान करा, भरघोस सूट मिळवा’ !! त्वरा करा!

मतदारांनी मतदान करावं यासाठी वेगवेगळ्या युक्त्या प्रशासन आणि सामाजिक संस्थांकडून लढवल्या जातात. नागपूर प्रशासनान विधानसभेसाठी असाच एक अभिनव उपक्रम केला आहे. मतदान करा आणि पेंच व्याघ्र प्रकल्प असलेल्या परिक्षेत्रातील रिसॉर्ट आणि हॉटेलमध्ये भरघोष सूट मिळवा. अशी युक्ती लढवली आहे.

‘अन्यथा भाजपाकडे काम घेऊन येऊ नका’, चंद्रकांत पाटील यांचा खा.संजय मंडलिकांना दम

”आम्हाला शहाणपणा शिकवण्यापेक्षा युतीधर्म पाळा. अन्यथा भारतीय जनता पार्टीकडे काम घेऊन येऊ नका” असा सज्जड दम पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांना दिला आहे. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील भाजप उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ आयोजित बूथ प्रमुख मेळाव्यात ते बोलत होते.

…तो पर्यंत फेटा बांधणार नाही; पंकजा मुंडेनी बांधली खूणगाठ

‘जोपर्यंत बीडमधील सर्व उमेदवारांना गुलाल लागणार नाही. तो पर्यंत मी फेटा बांधणार नाही’, अशी खूणगाठ भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेत बांधली. त्या आष्टी मतदार संघातील भाजपचे उमेदवार भीमराव धोंडे यांच्या प्रचारसभेत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री आमदार सुरेश धस आमदार भीमराव धोंडे, यांची उपस्थिती होती. पंकजा मुंडे यांनी यावेळी राष्ट्रवादीवर सडकून टीका केली

कहर!! आचारसंहिता भंगाच्या १ हजार १९२ तक्रारी

सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात निवडणुकांची आचारसंहिता लागू आहे. आदर्श आचारसंहितेचा पालन व्हावं यासाठी आचारसंहिता भंगासंदर्भातील तक्रारी सह्जरित्या करण्यासाठी ‘सी व्हिजील’ हे अँप निवडणूक आयोगामार्फत तयार करण्यात आलं आहे. या अँपवर गुरुवारपर्यंत विविध प्रकारच्या १ हजार १९२ तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

‘टेंभूची पुर्ती यामुळे माझा विजय नक्की’ – आमदार अनिल बाबर

 ‘विरोधक तसेच त्यांच्या हस्तकांनी टीका करताना किमान एकमताने तरी करावी. गेल्या पाच वर्षांत मी केलेली विकासकामे, सोबतच टेंभूची पुर्ती यामुळे माझा विजय नक्की आहे हे माहित असल्यामुळेच विरोधक आणि त्यांचे हस्तक एकाच मुद्दयावर वेगवेगळी मते मांडत आहेत.’ असे सांगत शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी टेंभू योजनेचे श्रेय घेत विरोधकांवर सडकून टीका केली. बाबर हिंगणगादे येथे आयोजित प्रचारसभेमध्ये ते बोलत होते.

‘घरात आलबेल आहे सांगण्याची पाळी का येते?’, सुरेश धस यांचे शरद पवार यांच्यावर शरसंधान

धस हे ‘महायुती’चे उमेदवार माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रचार सभेत बीड मतदार संघातील रायमोहा येथे आयोजित सभेत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पंकजा मुंडे, जयदत्त क्षिरसागर रमेश पोकळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

उत्तर नागपूरच्या आ. मिलिंद मानेंना नागरिकांनी घेतले फैलावर

आज प्रचारादरम्यान मानेंना जनतेच्या विरोधाचा चांगलाच सामना करावा लागला. उत्तर नागपूर परिसरात भाजपाचे उमेदवार असलेले माने प्रचारासाठी गेले असता लोक त्यांच्यावर चांगलेच भडकले. यावेळी परिसरातील महिलांनी त्यांना चांगलेच फैलावर घेतले. त्यांच्यावर पाण्याच्या प्रश्नाबाबत जाब विचारत प्रश्नांचा मारा करत ”मागील पाच वर्षे कोठे होता?” असा सवाल करण्यात आला. यामुळे माने चांगलेच भांबावल्याचे पहायला मिळाले. यावेळी परिसरातील नागरिकांना कार्यकर्त्यांनी शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसल्याचे दिसून आले.