सोळागाव पाणीपुरवठा योजनेचा नवा आराखडा लवकरात लवकर मंजूर करून घेणार – छगन भुजबळ

chhagan bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। नाशिकच्या लासलगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सोळागाव पाणीपुरवठा योजनेचा नवा आराखडा लवकरात लवकर मंजूर करण्यासाठी पाणीपुरवठा मंत्री आणि वित्तमंत्री यांच्यासोबत चर्चा करून मंजुरीसाठी प्रयत्न करणार आहोत असे सांगत सद्यस्थितीत या योजनेतून होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा असा आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला … Read more

अबब ! इतका मोठा ट्रक… 1700 किमीचा प्रवास करण्यास लागला एक वर्ष, कारण जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एक मोठा ट्रक आणि एका वर्षाचा प्रवास ! या ट्रकने किती किलोमीटरचा प्रवास केला असेल याचा अंदाज लावू शकाल ? जर आपल्याला हे सांगितले की फक्त 1700 किलोमीटर, तर आपल्यालाही ते पचवणे थोडे अवघड जाईल, मात्र ते खरे आहे. बरोबर एका वर्षापूर्वी एरोस्पेस ऑटोकॅलेव्ह नावाच्या मोठ्या मशीनने भरलेला एक ट्रक नाशिकहून … Read more

१ लाख गुंतवून कमवू शकता ६० लाख रु, सुरु करा ‘या’ झाडाची शेती 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। नीती आयोगाने राज्यांना सांगितले आहे की आयोगाच्या मॉडेलच्या आधारावर  राज्यांनी चंदन आणि बांबूची झाडे लावावीत. सोबतच राज्यातील शेतकऱ्यांनाही अशा व्यावसायिक वृक्षारोपणास प्रोत्साहित करावे. जर तुमच्याकडे जमीन आहे आणि शेती करायची आहे तर तुम्ही चंदनाची शेती करू शकता. यात १ लाख रुपये गुंतवून तुम्ही ६० लाखपर्यंतचा नफा मिळवू शकता. पांढरे चंदन हे सदाबहार … Read more

वडील ST मध्ये कामाला; मुलगा २४ व्या वर्षी झाला नायब तहसीलदार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक आईवडील आपली अर्धवट राहिलेली स्वप्ने आपल्या मुलांकडून पूर्ण व्हायची ईच्छा बाळगून असतात. पण बऱ्याचदा मुलांना त्यामध्ये रस नसतो किंवा त्यांच्या आवडी वेगळ्या असतात. नाशिकच्या शुभम मदाने याचे मात्र थोडेसे वेगळे आहे. त्याच्या वडिलांनी कधी स्वतःची स्वप्ने त्याच्यावर लादली नाहीत. मात्र त्याने लहानपणापासूनच वडिलांनी पाहिलेले उच्चशिक्षणचे स्वप्न पाहायला सुरुवात केली. आणि … Read more

राज्यात दिवसभरात सापडले सर्वाधिक ३ हजार ८९० कोरोनाग्रस्त; २०८ जणांचा मृत्यू

मुंबई | महाराष्ट्रामध्ये मागच्या २४ तासात सर्वाधिक म्हणजेच ३,८९० कोरोनाग्रस्त सापडले आहेत. तर २०८ जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यातले ७२ मृत्यू हे मागच्या ४८ तासातील आहेत, तर उरलेले १३६ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. राज्यातला सध्याचा मृत्यूदर हा ४.७२ टक्के एवढा आहे. मागच्या २४ तासांमध्ये ४,१६१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ७३,७९२ … Read more

‘निसर्ग’ चक्रीवादळाची रायगड किनारपट्टीकडे वेगवान कूच 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अरबी समुद्रातील निसर्ग हे चक्रीवादळ आता वेगाने पुढे सरकत आहे. या वादळाने त्याचे रौद्र रूप धारण केले असून  खात्याने सॅटेलाईट द्वारे काढलेले छायाचित्र प्रसिद्ध  केले आहे. हे वादळ हवामान खात्याने अंदाज दर्शविल्याप्रमाणे ताशी ११० ते १२० किमी वेगाने रायगड च्या किनारपट्टीवर दुपारी १ ते ४ च्या दरम्यान धडकण्याची शक्यता आहे.  भूपृष्ठावर आल्यानंतर … Read more

नाशिक शहरातील मद्य विक्रीची दुकाने बंदच; आदेशाचे उल्लंघन केल्यास परवाना रद्द

नाशिक प्रतिनिधी । सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये मद्य विक्रीस शासनाने परिपत्रकाद्वारे 3 मे 2020 रोजी परवानगी दिली. नाशिक शहर रेड झोनमध्ये असूनही मद्यविक्री दुकाने सुरू करण्यात आली. परंतु बऱ्याच मद्य विक्री दुकानांवर सुरक्षित वावराच्या नियमांना पायदळी तुडवत मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन पोलिसांना मनुष्यबळाचा … Read more

नाशिकमध्ये विद्यार्थ्यांनी मानवी साखळीद्वारे केले नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन

विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून जिल्हा निवडणूक यंत्रणा मोठ्या प्रमाणात जनजागृती करीत आहे. जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरु आहे. यामध्ये आपलाही खारीचा वाटा असावा. यासाठी मालेगाव येथील नाना मुंदडा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करुन लोकांना मतदान करण्याच आवाहन केले. यावेळी सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

नाशिकमध्ये भुजबळ पिता-पुत्रांना लक्ष्य करण्यासाठी शिवसेनेने आखली मोठी ‘रणनीती’  

नाशिक प्रतिनिधी। जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांपैकी शिवसेनेने सर्वाधिक ९ जागांवर निवडणूक लढवत असून, या ९ जागांवरील प्रचाराचे नियोजन शिवसेनेकडून पूर्ण झाले आहे. शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी, १२ ऑक्टोबर रोजी दिंडोरी, नांदगाव आणि येवला मतदारसंघांत जाहीर सभा घेणार आहेत. नांदगाव आणि येवल्यात सभा ठेवून प्रचाराच्या पहिल्याच टप्प्यात शिवसेनेने भुजबळ पिता-पुत्रासमोर दंड थोपटले आहे. … Read more

नाशिक शहरात जोरदार पाऊस, रेल्वे सेवा ठप्प

नाशिक प्रतिनिधी। नाशिक जिल्ह्यात जोरदार व मुसळधार पाऊस पडत असल्यान नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या आस्वली गावाजवळील रेल्वे पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळ सर्व गाड्या इगतपुरी ते आसनगाव व वाशिंद स्थानकात थांबवण्यात आल्यात. त्यामुळं इगतपुरी ते नाशिक रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. शहर व परिसरात जोरदार पाऊस झाला. दुपारी तीन वाजेनंतर शहरासह उपनगरीय भागांमध्ये ढग दाटून आल्याने … Read more