NZ vs PAK: न्यूझीलंड संघाला आहे तालिबान आणि कोरोनाची भीती, पाकिस्तानला होऊ शकते मोठे नुकसान

new zealand

नवी दिल्ली । तालिबानने पाकिस्तानचा शेजारील देश अफगाणिस्तानचा ताबा घेतला आहे. तेथील स्थिती अत्यंत वाईट असल्याचे सांगितले जात आहे आणि लोकं देशाबाहेर पळून जात आहेत. दरम्यान, न्यूझीलंड संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यापूर्वी काही खेळाडूंनी अफगाणिस्तानवर तालिबानचा ताबा घेतल्यानंतर सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. आता न्यूझीलंड क्रिकेटचे (NZC) अधिकारी पुढील महिन्याच्या पाकिस्तान दौऱ्यात संघाची … Read more

तालिबानने सांगितले की,” त्यांचे पुढील धोरण काय आहे आणि त्यांना भारताकडून काय हवे आहे?”

काबूल । अफगाणिस्तानमध्ये तालिबानने पूर्ण नियंत्रण मिळवले आहे. कंदहारपासून काबूलपर्यंत आता तालिबान लढाऊंनी आपला झेंडा फडकवला आहे. यानंतर जगातील अनेक देशांसमोर राजनैतिक संकट उभे राहिले आहे. या देशांच्या यादीत भारताचाही समावेश आहे. भारताने अफगाणिस्तानात कोट्यवधींची गुंतवणूक केली आहे. अशा परिस्थितीत, तालिबानची सत्ता असेल तर भारताच्या या गुंतवणुकीचे आता काय होईल हा मोठा प्रश्न उपस्थित झाला … Read more

भारताची अफगाणिस्तानबाबत वेट अँड वॉच भूमिका, पाकिस्तानवरील विश्वास अमेरिकेला चांगलाच महागात पडला: अनिल त्रिगुण्यत

नवी दिल्ली । अफगाणिस्तानमधील परिस्थिती आता बदलली आहे. काबूलवर तालिबानचे राज्य आहे आणि भारतासह सर्व देश आपल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात व्यस्त आहेत. अशा परिस्थितीत, आता भारताची पुढील रणनीती काय असेल, याबद्दल माजी राजनायक आणि अफगाणिस्तान प्रकरणातील तज्ज्ञ अनिल त्रिगुण्यत म्हणाले की,” भारत सरकार अजूनही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. भारताने नेहमीच अफगाणिस्तानला मदत केली … Read more

1.5 अब्जाहूनही जास्त आहे तालिबानचे वार्षिक उत्पन्न, शस्त्रास्त्र आणि दारूगोळ्यासाठी अशाप्रकारे जमा करतात पैसे

काबूल । अफगाणिस्तानात तालिबानचे युग परत आले आहे. अल्पावधीतच या दहशतवादी संघटनेने संपूर्ण अफगाणिस्तान ताब्यात घेतला आहे. अशा परिस्थितीत, प्रश्न असा उपस्थित होतो आहे की, तालिबानला दहशतवादी योजना राबवण्यासाठी कोण फंडिंग कोण देते? तालिबान किती कमावते? ही संस्था शस्त्रे कोठून खरेदी करते? चला तर मग या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात … संयुक्त राष्ट्रांच्या जून 2021 … Read more

अफगाणिस्तान संकट: तालिबानने घनी सरकारशी शांततेच्या चर्चेसाठी ‘या’ कडक अटी मांडल्या

काबूल । अफगाणिस्तानात तालिबानचा गोंधळ सुरूच आहे. तालिबानने शुक्रवारी आणखी चार प्रांतांच्या राजधान्या ताब्यात घेतल्या. आता तालिबानने देशाच्या संपूर्ण दक्षिण भागाचा ताबा घेतला आहे. यासह, तो आता हळूहळू काबूलच्या दिशेने जात आहे. दरम्यान, काही संघटना आणि देशांनी तालिबान आणि अफगाणिस्तान यांच्यात शांतता चर्चेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. विशेषत: जगातील अनेक देश यासाठी इस्लामाबादवर दबाव टाकत … Read more

पडल्या गेलेल्या मंदिरात पुन्हा पूजा सुरू, हिंदू कुटुंबे भीतीने परिसर सोडून गेली

इस्लामाबाद । पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात तोडलेले मंदिर दुरुस्तीनंतर हिंदू समाजाला देण्यात आले. बुधवारपासून मंदिरात पुन्हा पूजा सुरू झाली. दरम्यान, या भागात राहणाऱ्या हिंदू कुटुंबांनी तिथून स्थलांतर करण्यास सुरुवात केल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र, पोलीस आणि रेंजर्स अजूनही परिसरात तैनात आहेत. खरं तर, पंजाब प्रांतातील रहीम जिल्ह्यातील भोंग शरीफमध्ये गेल्या बुधवारी सिद्धीविनायक मंदिरावर हल्लेखोरांनी हल्ला केला … Read more

अफगाणिस्तानला भेट म्हणून दिलेले भारताचे हेलिकॉप्टर तालिबानच्या ताब्यात, कंदहार तुरुंग तोडून केली कैद्यांची सुटका

काबूल । अफगाणिस्तानमध्ये तालिबान आपले वर्चस्व वाढवत आहे. एक एक करून तालिबान प्रांतीय राजधानी आणि सरकारी मालमत्ता काबीज करत आहेत. बुधवारी तालिबान्यांनी भारताने भेट म्हणून दिलेले MI-24 हेलिकॉप्टर देखील ताब्यात घेतले आहे. तालिबानने कुंदुज विमानतळावर उभे असलेले MI-24 हेलिकॉप्टर ताब्यात घेतले आहे. त्याचवेळी तालिबानने कंदहार जेलवरही हल्ला केला आणि तेथील राजकीय कैद्यांना पळवून नेले. भारताने … Read more

पाकिस्तान अफगाणिस्तानसोबत लढत आहे प्रॉक्सी वॉर, जिहादींना तालिबानच्या मदतीसाठी पाठवले

imran khan

इस्लामाबाद/काबूल । अफगाणिस्तानात (Afghanistan) तालिबानची क्रूरता सुरूच आहे. पाकिस्तानही तालिबानला खुलेपणाने पाठिंबा देत आहे. तालिबानला मदत करण्यासाठी पाकिस्तानने 20,000 जिहादी पाठवल्याच्या बातम्या येत आहेत. जिहादी पाठवून प्रॉक्सी वॉर लढणाऱ्या पाकिस्तानविरुद्ध अफगाण लोकांनी आवाज उठवला आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारतासह जगातील अनेक देशांमध्ये #SanctionPakistan हा हॅशटॅग सोमवारपासून ट्विटरवर ट्रेंड करत आहे. हा हॅश टॅग वापरून लोकं … Read more

काश्मीरच्या बांदीपोरामध्ये शस्त्रसाठा जप्त, मोठा दहशतवादी कट फसला

श्रीनगर । काश्मीरच्या बांदीपोरामध्ये भारतीय सुरक्षा दलांना पाकिस्तानच्या सीमेवर शस्त्रास्त्रांचा मोठा साठा सापडला आहे. ही शस्त्रे आणि दारूगोळा पाहिल्यानंतर अंदाज लावला जाऊ शकतो की, दहशतवादी काही मोठे कारस्थान रचण्याच्या तयारीत होते. या प्रकरणाचे गांभीर्य पाहता लष्कराने या भागात शोधमोहीम सुरू केली असून स्थानिक पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे. भारतीय सुरक्षा दलांना अशी माहिती … Read more

भारताने बांधलेला महामार्ग तालिबानच्या ताब्यात, पाकिस्तानने मदतीसाठी पाठवले सैनिक

काबूल । अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याने माघार घेतल्यानंतर तालिबानची क्रूरता वाढत आहे. तालिबानने एकापाठोपाठ एक क्षेत्रांवर अतिशय वेगाने ताबा मिळवला आहे. TOLO न्यूजनुसार, तालिबान्यांनी भारताने अफगाणिस्तानात बांधलेल्या देलाराम-जरांज महामार्गावरही ताबा मिळवला आहे. इराण सीमेजवळील जरांजचा ताबा तालिबानसाठी मोठा धोरणात्मक विजय आहे. इराणकडून 217 किलोमीटर लांबीच्या देलाराम-जरांज महामार्गाद्वारे अफगाणिस्तानचा व्यापार होतो. काबूलमधील एका ज्येष्ठ पत्रकाराच्या मते, यावर … Read more