शरद पवारांची कोरोनाशी तुलना करणे पडळकरांना पडणार महागात; होणार ‘ही’ कारवाई

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी माजी केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची करोना विषाणूशी तुलना केल्याने भाजपचे आमदार व धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, सरकारनेही हे विधान गंभीरपणे घेत पडळकर यांच्यावर पोलीस कारवाईचे संकेत दिले आहेत. गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या विधानाची … Read more

पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्याने ‘पीर बाबा’ बनून कापले महिलांचे केस, पहा व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी ‘पीर बाबा’ चा वेश धारण केला आणि तरुण महिलांचे केस कापले. त्याने मुलतानमधील आपल्या घरातील तरूणींचे केस कापले. त्या बदल्यात त्यांनी स्त्रियांकडून सोने-चांदी घेतली. पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्याचा महिलांचे केस कापण्याचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये परराष्ट्रमंत्री कुरेशी … Read more

ऑगस्ट २०२१ मध्ये भारत सुरक्षा परिषदेचा अध्यक्ष असेल – संयुक्त राष्ट्र 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य म्हणून निवडला गेलेला भारत ऑगस्ट २०२१ ला १५ शक्तीशाली देशांच्या संयुक्त राष्ट्र संघाच्या समितीच्या अध्यक्षपदी काम करेल अशी माहिती समोर आली आहे. परिषदेचे अध्यक्षपद हे सभासद देशांच्या अद्याक्षरावरून असते. अध्यक्षपद दर महिन्याला नव्या राष्ट्राला दिले जाते. संयुक्त राष्ट्राच्या प्रवक्त्यांनी ही माहिती दिली असून पुढच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात भारताचा … Read more

भविष्यात शिवसैनिकाला पंतप्रधान बनवणार – उद्धव ठाकरे

मुंबई । आज शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा साधेपणाने साजरा करण्यात आला. भविष्यातील देशाचा पंतप्रधान शिवसैनिक असेल असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमा ठाकरे बोलत होते. मुख्यमंत्री ठाकरे यांनी वर्धापन दिनानिमित्त पदाधिकाऱ्यांच्या व्हिडीओ कॉन्फेरंसिंगमध्ये शिवसैनिकांना आज मार्गदर्शन केले. यावेळी आपली वाटचाल योग्य दिशेने सुरु असून एक दिवस या … Read more

रोहित पवारांनी प्रथमच शेयर केला वडिलांचा फोटो; दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचे वडील तसेच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे पुतणे राजेंद्र पवार यांचा आज वाढदिवस आहे. कृषी, शैक्षणिक, औद्योगिक, सामाजिक अशा सर्वच क्षेत्रात नवनव्या संकल्पना त्यांनी राबविलेल्या आजपर्यंत दिसून आल्या आहेत. राजकारणात नसले तरी त्यांची अशी एक वेगळी ओळख आहे. राजेंद्र पवार यांचा एक वेगळा चाहतावर्ग देखील आहे. … Read more

काँग्रेस कार्यकर्त्याचे सोनिया गांधींना पत्र; जाकिर पठाण यांची विधानपरिषदेची मागणी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मुस्लिम समाजाकडून राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेवर संधी मिळावी. म्हणून माझ्या नावाची शिफारस कॉग्रेस पक्षाच्या पदाधिकार्यांकडे करण्यात आली आहे. राज्यपाल निवडीसाठी जे नियम आहेत, त्या सहकार क्षेत्रात मी गेली 10 वर्ष काम करत आहे. त्यामुळे माझ्या नावाचा विचार व्हावा अशी मागणी सातारा जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष जाकिर पठाण यांनी केली आहे. जाकिर पठाण … Read more

मोदींमुळेच भारतात कोरोना आला – अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील कोरोना स्थितीला पूर्णतः पंतप्रधान नरेंद्र मोदीच जबाबदार आहेत असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्षअ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटले आहे. त्यांनी देशात योग्य वेळी परदेशी पाहुण्यांना बंदी केली असती किंवा त्यांची चाचणी करून त्यांना प्रवेश दिला असता तर भारतात एवढ्या प्रमाणात करोना पसरलाच नसता. भारतात करोना येण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीच जबाबदार आहेत, असा … Read more

भारत चीन यांच्यात तणाव वाढल्याने रुपयाची किंमत घसरली; सर्वसामान्यांवर होणार ‘हा’ परिणाम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लडाखच्या सीमेवर भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये बराच काळापासून तणाव निर्माण झालेला आहे. हा सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये वाटाघाटीही सुरू आहेत. मात्र यादरम्यानच, सोमवारी रात्री पश्चिम लडाखमधील गॅल्वान व्हॅलीमध्ये झालेल्या हिंसक चकमकीत भारतीय लष्कराचा एक अधिकारी आणि दोन सैनिक ठार झाले. सीमेवर सुरू असलेल्या या तणावाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी भारतीय रुपया … Read more

भारतीय सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडली; गोळीबार केला नाही – भारत सरकार 

नवी दिल्ली । भारत चीन सीमेवर मे महिन्याच्या सुरुवातीपासून तणाव निर्माण झाला आहे. भारताने लडाख सीमेवर रस्तेबांधणी सुरु केल्यावर चीनने त्यांचे सीमेवरील सैन्य वाढविले होते. त्यामुळे भारताने देखील आपले सैन्य वाढविले. गेले दीड महिने सातत्याने हा तणाव मिटविण्यासाठी दोन्ही देशाच्या सैन्यातील अधिकाऱ्यांच्या बैठकी झाल्या आहेत. भारताने काही अटी चीनसमोर मांडल्या होत्या. आज भारतीय सैन्याने एलएसी … Read more

खाटेचं कुरकुरणं ऐकून तर घ्यावं; बाळासाहेब थोरातांचा संजय राऊतांना सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या काँग्रेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बैठकीसाठी मागणी करत आहे. यासंदर्भात सामना मध्ये एक अग्रलेख छापून आला आहे. या अग्रलेखात काँग्रेसला उद्देशून खाट का कुरकुरते आहे? सत्ता स्थापन होत असताना शिवसेनेने देखील त्याग केला आहे. असे लिहण्यात आले आहे. यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी हा अग्रलेख अपूर्ण … Read more