स्वाभिमानीचा उद्या राज्यभर चक्काजाम : वीज तोडणी विरोधात जिल्ह्यात 4 ठिकाणी आंदोलन

Swabhimani Shetkari

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उद्या राज्यभर चक्का जाम आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात विज वितरण कार्यालयाने शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवावी, यासाठी राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनाला निवेदन देण्यात आल्याची माहिती संघटनेच्यावतीने दिली आहे. बारावीच्या परिक्षामुळे दुपारी 12 वाजता आंदोलन करण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यात कराड, … Read more

शिवजयंती एक, महाआरती दोन : छत्रपती घराण्यातील संघर्ष कायम

Shivaji Maharaj Maha Aarti

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात व धुमधडाक्यात साजरी करण्यात आली. साताऱ्यात दोन्ही घरातील संघर्ष सर्वश्रूत असून तो राज्यभरात माहिती आहे. शिवजयंतीला पोवई नाक्यावर असलेल्या शिवतीर्थावर महाआरती दोनवेळा पार पडली. त्यामुळे आगामी पालिकेच्या निवडणुकीसाठी शक्तिप्रदर्शनही दिसून आले. साताऱ्यात छत्रपती खा. उदयनराजे भोसले आणि छत्रपती आ. शिवेंद्रराजे भोसले यांचा संघर्ष गेले … Read more

सर्वात मोठ्या मटका बुकीवर एलसीबीचा छापा : जिल्ह्यातील 20 जणांवर गुन्हा दाखल

Satara Police

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके सातारा पोलिसांनी जिल्ह्यातील सर्वात मोठा मटका बुकी समीर कच्छी याच्या मटका अड्ड्यावर छापा टाकला. यात 16 लाख 26 हजार 70 रूपयांचे जुगार साहित्य व रोख रक्कम जप्त करत 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. सातारा गुन्हे अन्वषेण विभागाने एकाच दिवसात ही मोठी कारवाई केली. या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा … Read more

उद्धव ठाकरेंच्या एका सहीने निवडणुक आयोग बरखास्त होईल : शंभूराज देसाई

Shamburaj Desai and Thackeray

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके उद्धव ठाकरे यांनी निवडणुक आयोग बरखास्त करा असं वक्तव्य केल्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. उद्धव ठाकरे मातोश्रीमध्ये बसून एका सहीच्या आदेशानं निवडणुक आयोग बरखास्त करु शकतात, असा खोचक टोला लगावला आहे.  घटनात्मक पद बरखास्त करा, अशी उद्धव ठाकरेंच वक्तव्य लोकशाही प्रणालीला मारक असुन एक पक्ष चालवणा-या … Read more

पाटणला निवडणूक आयोग, मोदी सरकार, शिंदेसेना विरोधात जोरदार घोषणाबाजी

पाटण। निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून सोमवार (दि. 20) रोजी सकाळी कराड -चिपळूण मार्गावर झेंडा चौक पाटण येथे निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात तीव्र निदर्शने करत जोरदार घोषणाबाजी करत जाहीर निषेध करण्यात आला. पालकमंत्री व शिवसेना शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांच्या मतदार संघात ही निदर्शने करण्यात आली. शिवसेना ठाकरे गटाचे … Read more

बेमुदत कामबंद आंदोलन : बारावीच्या परीक्षेवर शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा बहिष्कार

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके सातारा शहरातील व कराड शहरातील अनेक शिक्षण संस्थामधील शिक्षकत्तेर कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरूवात केली आहे. उद्यापासून सुरू होत असलेल्या बारावीच्या परिक्षेच्या तोंडावर या संपामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागू शकतो. या कर्मचाऱ्यांनी बारावीच्या परिक्षेवर बहिष्कार टाकला असल्याचे सांगितले आहे. साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ … Read more

कारखान्यात ऊसाचा भारा अंगावर पडल्यामुळे एकाचा मृत्यू

Karad Taluka Police Station

कराड | ऊसाचा भारा अंगावर पडल्यामुळे एकाचा मृत्यू झाला. रेठरे बुद्रूक (ता. कराड) येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्यावर ही घटना घडली. याबाबतची नोंद कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे. शंकर रामचंद्र डोईफोडे (वय- 40, रा. रेठरे बुद्रूक, ता. कराड) असे दुर्घटनेत मृत्यू झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेठरे बुद्रूक येथील कृष्णा कारखान्यावर काम करीत … Read more

सातारा शहरात महाआरती तर प्रतापगडावर प्रशासाने केली शिवजयंती उत्साहात

Shivaji Maharaj Maha Aarti

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके जिल्हा प्रशासनाच्या वतीने किल्ले प्रतापगड (ता. महाबळेश्वर) येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. तर राजधानी साताऱ्यात शिवजयंतीचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. पोवई नाक्यावर असणाऱ्या शिवतीर्थावर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मातोश्री राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले यांनी शिवतीर्थ येथे येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. यानंतर … Read more

सुपनेत पै. अमृता चाैगुले, डाॅ. ऐश्वर्या शिंदे यांचा सन्मान

Supane Village

कराड प्रतिनधी| विशाल वामनराव पाटील सुपने येथे डॉ. ऐश्वर्या शशिकांत शिंदे, पै. कु. अमृता सुरेश चौगुले यांनी मिळवलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल ग्रामपंचायतीने शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. छ. शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कुस्ती मैदानात सरपंच विश्रांती पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपसरपंच अजित जाधव, माजी अध्यक्ष महाराष्ट्र मेडिकल असोसिएशन सातारा … Read more

बंगाली कामगार 52 तोळे सोन्याचे दागिने घेवून पळाला : 31 लाख 52 हजाराला गंडवले

Koregaon Police Satara

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके कोरेगाव शहरात सोन्याचे दागिने घडवून देण्याचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीने 51 तोळे 8 ग्रॅम सोने व रोख रक्कम 2 लाख रुपये असा 31 लाख 52 हजार 600 रुपये किमतीचा ऐवज घेऊन पोबारा केला. गोपाल सुबोध सामुई (मूळ- रा. शाम सुंदरपुर घाटाल, जिल्हा- मेदनापूर पश्चिम बंगाल. सध्या रा. कोरेगाव नगरपंचायतीसमोर कोरेगाव) असे … Read more