कमीत कमी जागेत शरद पवारांनी चमत्कार घडवला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पुणे : शरद पवार जसे कमीतकमी जागेत शेतकऱ्यांना उत्पादन घ्यायला शिकवतात तसेच त्यांनी कमीतकमी जागेत सरकार स्थापन करण्याचा चमत्कार घडवला, असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. पुण्यातील मांजरी येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या ४३ व्या वार्षिक सभेत ते बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण झाले. या कार्यक्रमाला इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शरद पवार, … Read more

स्थानिक स्वराज्य संस्थेत सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेसची धडप; मोर्चेबांधणीला सुरुवात

राज्यात नव्या आघाडीमुळे अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर सत्ता समीकरणे बदलायला सुरुवात झाली. शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तेत सहभागी होण्यासाठी काँग्रेसकडून रणनीती आखण्यात येत आहे.

महाराष्ट्राप्रमाणे झारखंडमध्येही मुख्यमंत्री ‘धनुष्यबाणाचा’च

झारखंड | झारखंड विधानसभेचा निकाल आज लागला. येथे झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाने आघाडी घेतली आहे. झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन झारखंडचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. हेमंत सोरेन यांनी लालूप्रसाद यादव आणि कॉंग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांचे आभार मानले आहेत. तसेच, झारखंडच्या आदिवासी गरीब जनतेने भाजपला नाकरल्याची प्रतिक्रिया सोरेन यांनी दिली आहे. 2019 मध्ये भाजपने … Read more

…म्हणून मी संघ सोडून शिवसैनिक झालो : शरद पोंक्षे

कल्याण | राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सोडून बाळासाहेबांचा शिवसैनिक होण्याचे कारण सांगताना अभिनेते शरद पोंक्षे म्हणाले, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघात दंड चालवायला शिकवतात. पण मारायची वेळ आली की बौद्धिक घेतात. म्हणून आपल्याला ते पटत नाही. कल्याणमध्ये अखिल भारतीय स्वातंत्र्यवीर सावरकर संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. हिंदुत्वाविषयी बोलताना पोंक्षे म्हणाले, “मराठी ही सर्वश्रेष्ठ भाषा आहे, असे म्हटल्याने … Read more

मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीचं पारड जड; शिवसेनेकडील गृह खाते राष्ट्रवादीकडे?

गृह खाते आपल्याकडेच राहावे यासाठी शिवसेना आग्रही असल्याचेही बोलले जात आहे. परंतु बार्गेनिंगमध्ये शिवसेना आणि काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस वरचढ होताना दिसत आहे. मुख्यमंत्री पद जरी शिवसेनेकडे असलं तरी उपमुख्यामंत्री पदासह महत्वाची खाती राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार आहेत.

महाविकासआघाडीचा हनिमून पिरीयड संपू द्या, मग बघू – राज ठाकरे

पुणे प्रतिनिधी | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी महाविकासआघाडीला धारेवर धरले. अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या सत्ता नात्यानंतर राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता स्थापन केली. यावर राज ठाकरे यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. आघाडीचा हनिमून पिरीयड संपूद्या असं म्हणत खोचक टोला लगावला. यावेळी राज ठाकरे यांनी महाविकासआघाडी फार काळ टिकणार नसल्याचंही सुतोवाच … Read more

लाली अन पावडर लावून बसलेल्यांनी खिडकी बंद करावी; सामनातून भाजपवर बोचरी टीका

शिवसेनेने भाजपचे ओझे फेकून दिल्याची घोषणाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यामुळे ओठास लाली व तोंडास पावडर लावून खिडकीत बसलेल्यांनी खिडकीही बंद करून घ्यावी. तसेच शिवसेनेने भाजपचं स्वतःच्या खांद्यावरीलच नव्हे तर राज्यावर असलेलं ओझं उतरवलं, अशी बोचरी टीका ‘सामना’ने केली आहे.

आपलं अस्तीत्व टिकवण्यासाठी राणेंची केविलवाणी धडपड; भास्कर जाधवांची टीका

ठाकरे सरकार न म्हणता राज्यसरकार म्हणावं असा आक्षेप राणेंनी घेतला  होता. त्यावरून जाधव यांनी राणेंचा चांगलाच  समाचार घेतला आहे

फडणवीस सरकारच्या काळात ६५ हजार कोटींचा घोळ; ‘कॅग’च्या अहवालातील माहिती

आमचं सरकार हे काही चौकशी  सरकार नाहीं. परंतु जे कॅग ने म्हटले आहे त्याची दखल घ्यावीच लागणार आहे. कारण जे रेकॉर्डवर दिसत आहे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

आमचं स्थगिती सरकार नसून प्रगती सरकार आहे;मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांवर पलटवार

उद्धव ठाकरेंनी राज्यपालांनी मराठीत केलेल्या भाषणाचा दाखल देत, राज्यपालांनाही सत्ताबदलाचे वारे समजू लागले असल्याचा चिमटा काढला आहे.