युती २८८ नव्हे २८७ जागीच : भाजपच्या या उमेदवारा विरोधात शिवसेनेने दिला उमेदवार

मुंबई प्रतिनिधी | भाजप आणि शिवसेनेत टोकाचे मतभेद असताना देखील शिवसेना भाजप युती झाली. युती झाल्यानंतर देखील शिवसेनेचे ज्या कुटुंबा सोबत हाड वैर आहे. अशा राणे कुटुंबातील उमेदवाराच्या विरोधात शिवसेनेने उमेदवार दिला आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात पदाधिकारी असणाऱ्या सतीश सावंत यांनाच शिवसेनेने पक्षात घेत नितेश राणे यांच्या विरोधात निवडणुकीला उतरवले आहे. सतीश सांवत हे नारायण राणे … Read more

भाजपची चौथी यादी जाहीर ; तावडे खडसेंचे तिकीट कापले तर रामराजेंच्या जावयाला कुलाब्याचे तिकीट

मुंबई प्रतिनिधी |भाजपने आपली चौथी यादी जाहीर करत तिकीट वाटपाचा कार्यक्रम आटपला आहे. यामध्ये विनोद तावडे आणि एकनाथ खडसे यांना ब्रेक लावत त्यांचे तिकीट कापले आहे. तर मुक्ताई नगर मतदारसंघात एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर कुलाब्यात विद्यमान आमदाराचे तिकीट कापत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या जावयाला तिकीट देण्यात आले आहे. … Read more

शिवसेनेकडून पालघरमध्ये सोशल इंजिनिअरींग; आदिवासी, वंचित घटकांना प्राधान्य

पालघर प्रतिनिधी। पालघर विधानसभेसाठी शिवसेनेने श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी देऊन सोशल इंजिनिअरिंगचा खेळ खेळला आहे. आदिवासीबहुल पट्टा म्हणून पालघरची ओळख आहे. अशा परिसरात आदिवासी घटकाला उमेदवारी देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः दिलेला शब्द पाळला आहे. आदिवासी समुदायाचा मोठा ताफा सोबत बाळगत वनगा यांनी काल गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज भरला. आदिवासी पारंपरिक नृत्य करत … Read more

भाजपचा कसबा ; शिवसेनेचा सवता सुभा ; काँग्रेसची गटबाजी ; बहुरंगी लढत

पुणे प्रतिनिधी | पुणे शहरातील मध्य वस्तीत असणारा कसबा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघात भाजपने लोकमान्य टिळकांचे पणतू शैलेश टिळक यांच्या पत्नी मुक्ता टिळक यांना उमेदवारी दिली आहे. मात्र त्यांची लढत सोपी नाही. कारण त्यांच्या विरोधात उभा राहिलेले सर्वच उमेदवार तगडे आहेत. तर शिवसेने या मतदारसंघात बंडखोरी देखील केली आहे. पुण्याच्या महापौर असणाऱ्या मुक्ता … Read more

आदित्य ठाकरेंच्या बँकेमध्ये १० कोटी रुपयांच्या ठेवी, प्रतिज्ञापत्रातून समोर आली संपत्तीची आकडेवारी

मुंबई प्रतिनिधी। युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून आज (गुरूवारी) उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या आई रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्या उपस्थितीत आदित्य यांनी अर्ज दाखल केला. या अर्जाबरोबर आदित्य यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये एकूण संपत्ती ११ कोटी ३८ लाख रुपये असल्याचे म्हटले आहे. यामध्ये बँक … Read more

बाळासाहेबांचे उपकार शरद पवार विसरले; आदित्य ठाकरेंविरुद्ध दिला तगडा उमेदवार

ठाकरे कुटुंबीयांना मदतीची गरज असताना पवारांनी डॉ सुरेश माने यांना आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध उमेदवारी देऊन शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न केला आहे.

पंढरपुरात भाजपची धूर्त खेळी; आवताडेंना नाकारून पंतांना मित्रपक्षाकडून उमेदवारी

भाजपने मित्रपक्षाकरवी विधान परिषदेचे सदस्य प्रशांत परिचारक यांचे काका आणि माजी आमदार सुधाकर परिचारक यांना उमेदवारी दिल्याने आवताडे समर्थकातून नाराजी व्यक्त केली जात आहे.

पारनेरमध्ये आजी-माजी शिवसैनिक आमनेसामने; विजय औटी विरुद्ध निलेश लंके सामना रंगणार 

पारनेर तालुका हा दुष्काळी तालुका असून तालुक्यात शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न,शेती मालाला हमीभाव, आरोग्याचे प्रश्न हे मुद्दे घेऊन लोकांसमोर जाणार असल्याचं लंके म्हणाले.

सभेत कुत्रा घुसला अन.. पवारांनी उडवली सेनेची खिल्ली

उस्मानाबाद प्रतिनिधी। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राज्यभर दौरा करत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा शरद पवार हे उस्मानाबाद मध्ये आहेत. या ठिकाणी सुरु असलेल्या सभेत कुत्रा घुसला अन् त्यानंतर पवारांनी जे वक्तव्य केल त्या  वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. उस्मानाबादेत सभा सुरु असताना शरद पवार जेव्हा सभेला संबोधित करत होते. तेव्हा सभेच्या ठिकाणी कुठून … Read more

‘माझी हक्काची जागा मला मिळाली, हे कोणाचे उपकार नाहीत’- विजय शिवतारे

पुणे प्रतिनिधी। ‘महायुतीच्या जागा वाटपामध्ये काही सूत्र ठरले होते. त्यानुसार, माझी हक्काची जागा मला मिळाली. महायुतीमधील पक्षाच्या विद्यमान आमदारांच्या जागा त्याच पक्षाकडे राहतील, हे निश्चित होते. त्यामुळे आज जागा वाटप झाल्यानंतर पुरंदरचा विद्यमान आमदार असल्याने ही माझी हक्काची जागा मला मिळाली. ती देऊन कोणी माझ्यावर उपकार केलेले नाहीत’, असा टोला शिवसेनेचे मंत्री आमदार विजय शिवतारे … Read more