युती फिस्कटणार ?? शिवसेनेचे २८८ इच्छुक उमेदवार मुंबईत दाखल
युती फिस्कटणार ?? शिवसेनेचे २८८ इच्छुक उमेदवार मुंबईत दाखल
युती फिस्कटणार ?? शिवसेनेचे २८८ इच्छुक उमेदवार मुंबईत दाखल
मुंबई प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय पक्षांच्या बैठकांचा सपाटा सुरू आहे. त्यातच गुरुवारी (२६ सप्टेंबर) दिल्लीत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांवर देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात युतीची सत्ता आली तर शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद देण्याची तयारी भाजपने दर्शविली आहे. त्यामुळे युती झाल्यास युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे पुढच्या … Read more
मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर राज्य सहकारी बँकेच्या २५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप ठेवून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या संदर्भात माहिती देण्यासाठी आपण ईडीच्या कार्यालयात जाणार आहे असे शरद पवार स्वतः म्हणाले होते. त्यानंतर ते आज जाणार देखील होते. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नामुळे त्यांनी ईडीच्या कार्यालयात जाणे टाळले त्यानंतर … Read more
मुंबई प्रतिनिधी | भाजप आणि शिवसेना युतीच्या बैठक युद्ध पातळीवर होत असून भाजप आणि शिवसेना युती कोणत्याही परिस्थितीत करायचीच असा निर्धारच दोन्ही पक्षांनी केला आहे. शिवसेना देखील वाटाघाटीच्या मुद्द्यांवर नरमली असून आता फक्त सहा जागांवर भाजप शिवसेनेचा युतीचा तोडगा बाकी असल्याची चर्चा आहे. औसा – लातूर जिल्हा, वडाळा- मुंबई, एरोली – ठाणे, बेलापूर – ठाणे, … Read more
मुंबई प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले असले तरी शिवसेना भाजप युतीचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झालेला नाही. भाजपने शिवसेनेला ११५ जागांचा प्रस्ताव दिलेला आहे परंतू शिवसेना १२५ च्या मागणीवर ठाम असल्याची माहिती आहे. त्यामुळे १० ते १२ जागांवरून भाजप शिवसेनेत संघर्ष सुरू असल्याचे समजते. त्यामुळेच युतीची अधिकृत घोषणा होण्यासही विलंब लागत आहे. मागील विधानसभा निवडणुकीत गेल्या … Read more
मुंबई प्रतिनिधी | शिवसेना-भाजप युतीची चर्चा अंतिम टप्प्यात असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी निरर्थक वक्तव्य करू नये. युतीसंदर्भातील बोलणी दोन्ही पक्षांत अंतिम टप्प्यात असून लवकरच याबाबतची घोषणा करण्यात येणार आहे. २०१४ ला विरोधात बसलो असतो तर आज परिस्थिती वेगळी असती, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. आता याविषयी चर्चा करण्यात काही अर्थ नाही … Read more
मुंबई प्रतिनिधी| नारायण राणे भाजपमध्ये सामील होणार अशा चर्चा मागील काही दिवसापासून सतत सुरु आहेत. त्यांच्या भाजप प्रवेशाला शिवसेना विरोध करेल असे बोलले जाते आहे. मात्र शिवसेना मवाळ भूमिकेत असल्याने राणेंचा भाजप प्रवेश होईल असे बोलले जाते आहे. याच संदर्भात चंद्रकांत पाटील यांना विचारले असता त्यांनी त्यावर मत व्यक्त केले आहे. नारायण राणे यांना भाजपमध्ये … Read more
मुंबई प्रतिनिधी| सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा आज अखेर निवडणूक आयोगाने केली आहे. घोषणेनंतर शिवसेनेची भूमिका नेमकी काय राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण एप्रिलमध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीला ही जागा शिवसेनेने लढवली होती. मात्र शिवसेनेने या संदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे. साताऱ्याची लोकसभा पोटनिवडणूक विधानसभेसोबत घोषित झाल्याने राष्ट्रवादी आणि भाजपची निवडणुकीच्या संदर्भाने लगबग सुरु … Read more
मुंबई प्रतिनिधी | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून काल निवडणूक आयोगाने याची घोषणा केली आहे. २१ ऑक्टोंबर रोजी मतदान पार पडून २४ ऑक्टोंबरला विधानसभेचा निकाल लागणार आहे. मात्र निवडणुकीच्या कामकाजाला सुरुवात होण्याआधीच एका मराठी वृत्तवाहिनीने निवडणुकीचा निकाल कसा असेल याचा सर्व्हे प्रदर्शित केला आहे. गटबाजी चव्हाट्यावर : शरद पवारांची सभा संपताच राष्ट्रवादीच्या दोन गटात तुफान … Read more
कोल्हापूर प्रतिनिधी | कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप चे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवायचं पक्क केल्याची कोल्हापुरात चर्चा आहे. शिवसेनेशी युती झाल्यास ते ‘कोल्हापूर उत्तर’मधून जनतेचा कौल आजमावतील आणि युती न झाल्यास राधानगरी-भुदरगड मतदारसंघाला त्यांची पसंती राहील, असे बोलले जात आहे. ही ‘आचार संहिता’ मजी काय असतंय रं लका? भाजप शिवसेना युतीचा जागावाटपाचा … Read more