तर मी शिवसेनेची हमी घेतो : रावसाहेब दानवे

औरंगाबाद प्रतिनिधी | आगामी विधानसभा निवडणुकीसोबतच जिल्हा परिषदेच्या निवडणुकाही पार पडणार आहेत. यापार्श्वभूमीवर काँग्रेस-शिवसेना युतीबाबत अविश्वास ठराव आणा, मी शिवसेनेची हमी घेतो, असं आश्वासन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांना दिले. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. यासोबतच जिल्हा परिषदेच्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकाही पार पडणार आहेत. त्याकरिता रावसाहेब दानवे … Read more

पूरग्रस्तांच्या सेवेसाठी शिवसेनेने पाठवले १०० डॉक्टर

ठाणे प्रतिनिधी | २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण करण्याचं वचन देणाऱ्या शिवसेनेन पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. शिवसेनेच्या माध्यमातून पूरग्रस्त सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील बांधवांसाठी सलग ५ दिवस महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाणे येथून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात महाआरोग्य शिबीरासाठी … Read more

भाजपच्या २५० जागा येणार तर मग आम्ही उरलेल्या २८ जागी गोट्या खेळायच्या का : राज ठाकरे

मुंबई प्रतिनिधी |  भाजपचे लोक प्रत्येक निवडणुकीच्या आधी त्यांच्या किती जागा निवडून येणार याबद्दल तंतोतंत अंदाज व्यक्त करतात. विधानसभा निवडणुकी बद्दल देखील कोणी तरी अंदाज व्यक्त केला की, भाजपच्या २५० जागा निवडून येणार म्हणे. जर भाजपच्या २५० जागा निवडून येणार असतील तर मग आम्ही काय २८ जागी गोट्या खेळायच्या का असा सवाल राज ठाकरे यांनी … Read more

सेना भाजप युती रवी राणांच्या विजयाचा ठरणार मुख्य अडथळा

अमरावती प्रतिनिधी|  शिवसेना भाजप युती बडनेरा मतदारसंघाचेआमदार रवी राणा यांच्या मुळावर येणार असल्याचे चित्र सध्या बघायला मिळते आहे. कारण गतवेळी सेना भाजप स्वतंत्र लढल्याने रवी राणांचा विजय झाला. तर आता रवी राणा यांच्या समोर सेना भाजपची युतीच मुख्य अडथळा होत असल्याचे चित्र आहे. रवी राणा यांचा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा स्नेह चांगला आहे. त्यामुळे … Read more

IPS साहेबराव पाटील यांचा भाजप प्रवेश ; मिळू शकते विधानसभेची उमेदवारी

मुंबई प्रतिनिधी |  भाजपचा आज महापक्ष प्रवेश पार पडला यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते IPS साहेबराव पाटील यांना देखील भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. साहेबराव पाटील हे पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून सेवा निवृत्त झाले आहे. ते भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच रंगल्या होत्या. त्या चर्चेला आज मूर्तरूप प्राप्त झाले आहे. भाजप महाप्रवेशानंतर मुख्यमंत्री … Read more

भाजप महाप्रवेशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे युतीबद्दल मोठे वक्तव्य

मुंबई प्रतिनिधी | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज राष्टवादी आणि काँग्रेसच्या आमदारांना आज भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, अकोल्याचे आमदार वैभव पिचड, माजी मंत्री मधुकर पिचड, आमदार संदीप नाईक , आमदार कालीदास कोळंबकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीवर मोठे विधान केले आहे. IPS … Read more

छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशावर उद्धव ठाकरे म्हणतात

नाशिक प्रतिनिधी | सोशल मीडियाच्या माध्यमातून छगन भुजबळ शिवसेनेत जाणारा अशा आशयाचे मॅसेज व्हायरल केले जात होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात पक्षाची भूमिका स्पष्ट केल्याने पक्षांतील कार्यकर्त्यांचा जीव भांडयात पडला आहे. छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांना शिवसेनेत घेण्याचा आपला कसलाच मनोदय नसून त्यांना शिवसेनेत कदापि घेतले जाणार नाही असे उद्धव ठाकरे यांनी … Read more

भाजप शिवसेनेला संपवणार याची उद्धव ठाकरे यांनी नोंद घ्यावी

मुंबई प्रतिनिधी | भाजप हा मित्र पक्षाच्या नावाखाली शिवसेनेला खल्लास करणार आहे याची उद्धवठाकरे यांनी घ्यावी अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये चालेल्या सुक्त युद्धावर जयंत पाटील यांनी बोट ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोडांवर सध्या पक्षांतराचे वारे वाहू लागले आहे . काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाजप संस्थांच्या … Read more

गणपतराव देशमुखांची विधानसभा निवडणुकीतून माघार ; या कारणामुळे निवडणूक लढणार नाहीत

सांगोला प्रतिनिधी | महाराष्ट्र विधानसभेचे सर्वात जेष्ठ आमदार म्हणून ओळखले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील सांगोलचे आमदार गणपतराव देशमुख यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. गणपतराव देशमुख हे महाराष्ट्र ११ वेळा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यांच्या निवडणूक नलढण्याच्या निर्णयामुळे सांगोल्याच्या त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. वाढत्या वयामुळे आणि प्रकृतीच्या कारणामुळे आपण आगामी विधानसभा निवडणूक लढणार नाही असे … Read more

पाथरी विधानसभा ; आयात उमेदवारांना नो एंट्री ; भूमिपुत्रांची होणार चलती

परभणी प्रतिनिधी | गजानन घुमरे,  ऑक्टोबरमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पाथरी विधानसभा मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात दोन वेळा सुरुंग लावण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष  यशस्वी झाला आहे. तर एक वेळ अपक्ष उमेदवाराने देखील बाजी मारली आहे. 1990 पासून सलग तीन वेळा शिवसेनेने माजी आमदार हरिभाऊ लहाने यांच्या रूपाने हॅट्रिक केली होती. … Read more