मोठी बातमी : ‘या’ तारखेला बँकांचा देशव्यापी संप; सलग तीन दिवस बँका बंद, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : पगारावरील वाटाघाटी अयशस्वी झाल्यानंतर बँक युनियनने पुन्हा संप पुकारला आहे. इंडियन बँक असोसिएशनने (आयबीए) या महिन्यात सऱ्यांदा संप पुकारला आहे. 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी या दिवशी बँका बंद राहतील. यापूर्वी याच महिन्यात 8 बँक कर्मचारी संघटना 8 जानेवारीच्या भारत बंदमध्येही सहभागी झाल्या होत्या. त्यादिवशी बहुतेक बँका बंद ठेवल्या गेल्या आणि त्याचा … Read more

भारत बंदचा देवस्थानांवरही परिणाम; विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील गर्दी रोडावली

आज देशभर भारत बंदची हाक वेगवेगळ्या कामगार संघटना आणि शेतकरी संघटनांनी दिली होती. शेतकरी, कामगारांसोबत शासकीय कर्मचारी सुद्धा या संपात सहभागी झाल्याचं पहायला मिळालं. या संपाचा बाजारपेठेवर आणि देवस्थानांवरही परिणाम झाल्याचं पहायला मिळालं. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातही आज शुकशुकाट पहायला मिळाला.

देशभरातील २५ कोटी कर्मचाऱ्यांनी दिली उद्या भारत बंदची हाक

मोदी सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ बुधवारी ८ जानेवारी रोजी देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. देशभरातील कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीने देशव्यापी उद्या भारत बंदची हाक दिली आहे. या आंदोलनामध्ये २५ कोटी भारतीय सहभागी होतील असं समितीने सोमवारी स्पष्ट केलं आहे.

सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ बुधवारी देशव्यापी संप

केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ बुधवारी देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. यामध्ये जिल्ह्यातील पन्नास हजार कर्मचारी सहभागी होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर समन्वय समितीच्यावतीने देण्यात आली.

धुळे : प्रवासी मुलभूत सुविधांच्या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा तीव्र आंदोलनाचा इशारा

धुळे बस स्थानकात प्रवासी सुविधा उपलब्ध होण्याकरीता पाच मागणीचे लेखी निवेदन विभाग नियंञकांना भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने देण्यात आले.

धुळे : तलाठी संघटनेच्या वतीने बेमुदत लेखणी बंद आंदोलन

पांझरा नदी किनारील वार गावात वाळु उपसा करणाऱ्यांवर ग्रामिण तहसिलदार आणि त्यांच्या सह गेलेल्या पथकावर गावगुंडांनी भ्याड हल्ला केला . तसेच त्यांना मारहाण केली . त्याचे निषेधार्थ महाराष्ट्र राज्य तलाठी संघ वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकञ येत जोरदार घोषणा बाजी करण्यात आली. या भ्याड हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई व अटक होत नाही , तो पर्यत काळी फिती लावून लेखणी बंदचा पविञा जिल्ह्यातील तलाठी संघटनेने घेतला आहे .

महाराष्ट्रातील बँकांकडून देशव्यापी बंदची हाक

महाराष्ट्रातील व्यापारी बँका मंगळवारी देखील बंदच राहणार आहेत. राज्यातील बँका सलग तिसऱ्या दिवशी बंद राहणार असल्याने खातेदार, ठेवीदार, ग्राहकांचे हाल कायम आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या विलिनीकरण विरोधात कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या संघटनांनी मंगळवारच्या, २२ ऑक्टोबर रोजीच्या एक दिवसीय देशव्यापी संपाची हाक दिली असून व्यापारी बँकांच्या घसरत्या ठेवी दरांविरोधातही तीव्र मत प्रदर्शित केले जाणार आहे.

पुण्यात महसूल कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर

पुणे प्रतिनिधी | विविध मागण्यासाठी महसूल कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला असून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु केले आहे. सहा वर्षाचा कालावधी उलटूनही शासनान महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नसल्याने त्यांनी गुरुवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. शासनान ६ वर्षांचा कालावधी उलटूनही महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. त्याचबरोबर ज्या मागण्या तत्वत: मान्य केल्या होत्या त्यासंदर्भात … Read more

शिक्षकांनी चक्क महायज्ञाला अर्पण केली ‘पदवी’

लातूर प्रतिनिधी | लातूरच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयापुढे महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित कृती समितीच्या शिक्षकांनी एका अनोख्या महायज्ञाचे आयोजन करून आंदोलन केले. महाराष्ट्रातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता. हे सर्व शिक्षक विनाअनुदानित शाळेत गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आले आहेत. मात्र या विनाअनुदानित शाळांना अनुदान नसल्यामुळे आम्ही विनावेतन नोकरी करीत आहेत.त्यामुळे … Read more