आई बनल्यानंतर तब्बल २ वर्षांनंतर सेरेनाने जेतेपद पटकावले
सेरेना विल्यम्सने सप्टेंबर २०१७ मध्ये मुलगी ‘ऑलिम्पिया’ला जन्म दिला.
अमेरिकेची दिग्गज टेनिसपटू सेरेना विल्यम्स हिने आई झाल्यानंतर २ वर्षानंतर पहिले विजेतेपद जिंकले. रविवारी तिने विजेतेपदाच्या सामन्यात मायदेशातल्याच जेसिका पेग्युलाचा ६-३ ६-६ असा पराभव केला आणि डब्ल्यूटीए ऑकलंड क्लासिक विजेतेपदाला गवसणी घातली. हे तिचे ७३वे डब्ल्यूटीए जेतेपद आहे. सामना जिंकल्यानंतर तिने सामाजिक भान जपत ऑस्ट्रेलियाच्या जंगलांमध्ये लागलेल्या आगीत पीडितांना तिने ६३,००० ऑस्ट्रेलियन डॉलर्स (सुमारे ३० लाख ५० हजार रुपये) देणगी दिली. सेरेनाने सप्टेंबर २०१७ मध्ये मुलगी अलेक्सिस ऑलिंपिया ओहानियन जूनियरला जन्म दिला.