मतदान केंद्रावर ‘आरपीआय’च्या कार्यकर्त्याचा राडा; ईव्हीएमवर शाई फेकत दिल्या घोषणा

राज्यभरात आज विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडले. मात्र मतदान करण्यासाठी अवघा एक तास उरला असताना ठाण्यातील एका मतदान केंद्रामध्ये ईव्हीएमवर शाई फेकण्याची घटना घडली आहे. रिपब्लिकन पक्षाच्या एक कार्यकर्ता मतदानासाठी मतदान केंद्रावर आला असता त्याने निवडणूक कर्मचाऱ्यांजवळील शाईची बाटली हिसकावली आणि ईव्हीएमवर शाई फेकली. यावेळी मतदान केंद्रात एकच गोंधळ उडाला. सुनील खांबे असे या रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याचे नाव आहे. खांबे यांनी शाई फेकल्यानंतर ‘ईव्हीएम मुर्दाबाद’च्या घोषणाही दिल्या. पोलिसांनी सुनील खांबे यांना ताब्यात घेतले.

ठाण्यातील १८ विधानसभा मतदार संघातील ९०० कर्मचार्‍यांवर कारवाईचा बडगा?

वारंवार सुचना, पत्रव्यवहार करुनही विधानसभा निवडणुकीच्या प्रशिक्षण वर्गास गैरहजर राहणार्‍या ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदार संघातील तब्बल ९०० कर्मचाऱ्यांवर आता कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे प्रथम प्रशिक्षण वर्गास हजर राहून दुसऱ्या प्रशिक्षणवर्गास गैरहजर राहणाऱ्या सदर अधिकारी, कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची तयारी सुरु झाली आहे.

वाढीव वीज बिला विरोधात गावकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या इशारा

संपूर्ण ठाण्यातील महावितरणच्या ग्राहकांना वाढीव बिले येत आहेत. अचानक वाढलेल्या या बिलांच्या विरोधात नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत यावर तोडगा काढला गेला नाही, तर आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू असा इशारा दिलाय. या अगोदरही अनेक वेळा या कंपनी विरोधात आंदोलन केली होती.

ठाण्यात बिबटयाचे कातडे विक्री करणारे २ ताब्यात,गुन्हे अन्वेशन विभागाची कारवाई

। जालना व परभणी येथे राहणारे दोन जण उल्हासनगरात बिबटयाचे कातडे विक्री करण्यासाठी आले असताना उल्हासनगर गुन्हे अन्वेशन विभागाच्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याची घटना उल्हासनगरात घडली आहे.

कल्याणमध्ये युती फिस्कटली, शिवसैनिकांचं भाजपशी जमेना

प्रतिनिधी ठाणे | पश्चिम व पूर्व कल्याण विधानसभेच्या दोन्ही जागांवर शिवसेनेने दावा केला आहे. या परिस्थितीत दोन्ही जागा शिवसेनेला न सोडल्यास भाजपविरोधात उमेदवार देणार असल्याचं सेनेच्या विश्वनाथ भोईर यांनी सांगितलं आहे. शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात यावेळी कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवारीसाठी मुलाखत दिलेले इच्छुक उमेदवार विश्वनाथ भोईर,राजेंद्र देवळेकर,रवी पाटील,श्रेयस समेळ, अरविंद मोरे, साईनाथ तारे, मयूर पाटील … Read more

‘माफ करा साहेब, पहिल्यांदाच तुमचं ऐकणार नाही’ – जितेंद्र आव्हाड

मुंबई प्रतिनिधी। आज दुपारी दोनच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार हे मुंबईतील ईडीच्या कार्यालयात येणार आहेत. त्यामुळे ईडीसमोरच मोठा पेच निर्माण झाला आहे. तसंच “मी शुक्रवारी दुपारी २ वाजता ‘ईडी’ कार्यालयात उपस्थित राहणार आहे. मात्र, पक्ष कार्यकर्ते आणि समर्थकांनी या कार्यालयाबाहेर उपस्थित राहू नये. राज्यघटना आणि संस्थांचा आदर करण्याची आपली परंपरा कायम राखत … Read more

डोंबिवलीत भाजपच्या पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला

ठाणे प्रतिनिधी| डोंबिवलीत आर्थिक व्यवहारातून झालेल्या वादात बिल्डर आणि त्याच्या साथीदारांनी मिळून केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात भाजपचा पदाधिकारी जबर जखमी झाला. तर या धुमश्चक्रीत नगरसेवकाचा भाऊ थोडक्यात बचावला. योगेश तळेकर असे जखमी पदाधिकाऱ्याच नाव आहे. जखमी तळेकर हे आजदे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आहेत. तळेकर यांचा दिनेश राणे या बिल्डरबरोबर यापूर्वी 27 लाखांचा व्यवहार झाला होता. बिल्डर … Read more

एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला

Women Rape

ठाणे | कॉलेजला चाललेल्या तरुणीवर धारधार शस्त्राने जीवघेणा हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार ठाणे येथे घडला आहे. यामधे २२ वर्षीय तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. हाती आलेल्या माहीतीनुसार, निळ्या रंगाचा शर्ट परिधान केलेला एक मुलगा त्या तरुणीच्या गाडी जवळ आला. त्याने अचानक तरुणीवर वार करण्यास सुरुवात केली. तिच्या शरीरातून तीव्र … Read more