महाराष्ट्रात शत्रुघ्न सिन्हा करणार विरोधकांना ‘खामोश’

एकेकाळी भाजपची स्टार शॉटगन असणारे शत्रुघ्न सिन्हा आता काँग्रेसच्या बाजूने विरोधकांना खामोश करण्यासाठी सज्ज झाले आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुक प्रचाराच्या राजकीय शिमग्यात विरोधाकांना प्रचारात नामोहरम करण्यासाठी शत्रुघ्न सिन्हांच्या रूपाने काँग्रेसला त्याच्यासाठी नवा चेहरा मिळाला आहे.

पुण्यात दसऱ्यानंतर धडाडणार ‘ठाकरी’ तोफा; उद्धव, राज यांच्या एकाच दिवशी सभा

राज ठाकरे यांची ९ ऑक्टोबरला पुण्यात टिळक चौकात (अलका चौक) तर त्याच वेळी उद्धव ठाकरे यांची पिंपरीत संध्याकाळी ७ वाजता सभा होणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचं वातावरण तापलं असताना हे दोन ठाकरे बंधू आपल्या सभांमधून कुणाला लक्ष्य करणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

प्रणिती शिंदे यांचे ‘रुपाभवानी’च्या चरणी विजयासाठी साकडे

सोलापूर प्रतिनिधी । राज्यात सध्या नवरात्रीचा उत्सव सुरु आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने देवीची उपासना करत आहे. काँग्रेसच्या सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार प्रणिती शिंदे यांनी तब्बल ५ किलोमीटर चालत जाऊन रुपभावानी मातेचे दर्शन घेतलं. रविवारी पहाटे पाच वाजताच आमदार प्रणिती शिंदे आपल्या सातरस्ता येथील निवासस्थानापासून तुळजापूर रस्त्यावरील रुपभवानी मंदिरात जाण्यासाठी कार्यकर्त्यांसह बाहेर पडल्या. … Read more

राजकीय पक्ष, मग सत्ताधारी असो किंवा विरोधी – कुणाला घाबरतात माहितेय का?

राजकारणी लोकांवर लक्ष ठेवणारी सामान्य माणसं पण संघटनात्मक पातळीवर चांगलीच दहशत निर्माण करतात.

अकोल्यात दिव्यांगांची अनोखी मतदार जनजागृती रॅली

अकोला येथे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दिव्यांग मतदार जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं.

फुलंब्रीमध्ये मुस्लिम मतांचं सेटिंग, काँग्रेसला मदत केल्याचा इम्तियाज जलीलांवर गंभीर आरोप

फुलंब्री मतदारसंघात एमआयएमकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या दिलावर बेग यांनी इम्तियाज जलील यांच्यावर फसवणुकीचा गंभीर आरोप केला आहे.

देवेंद्र फडणवीस निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर ?? प्रतिज्ञापत्रात सापडली ‘ही’ गंभीर चूक 

निवडणुकीसाठी भरण्यात येणाऱ्या प्रतिज्ञापत्रांची तपासणी सुरु असताना राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यातील सर्वाधिक महत्वाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिज्ञापत्रात त्रुटी आढळल्याने एकच गोंधळ उडाला आहे.

एन्काउंटर स्पेशालिस्ट अडचणीत? शिवसेना उमेदवार प्रदीप शर्मांच्या एन्काउंटर्सची चौकशी व्हावी; हितेंद्र ठाकूरांची मागणी  

पालघर प्रतिनिधी । नालासोपारा विधानसभा मतदार संघामधून शिवसेनेने एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. पोलीस दलात आपल्या एन्काऊंटर कामगिरीमुळे ते प्रसिद्ध होते. मात्र, आता त्यांच्या या एन्काऊंटर प्रसिद्धीमुळे त्यांच्यावर निवडणूक विरोधकांकडून टीका होत आहे. नालासोपारा मतदारसंघात शर्मा यांच्या विरोधात उभे असलेले बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी शर्मा यांच्या एन्काऊंटर’र्सची चौकशीची मागणी केली आहे. पालघरमध्ये पत्रकारांशी बोलताना ठाकूर यांनी ही मागणी केली आहे.

शर्मा यांच्यावर सडकून टीका करत ठाकूर म्हणाले की,’प्रदीप शर्मा यांनी केलेले सर्व एन्काऊंटर हे फेक आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या एन्काऊंटरची कसून चौकशी व्हावी अशी मागणी आपण सरकारकडे करणार आहोत.’ दरम्यान, प्रदीप शर्मा यांनी पोलीस दलात सेवा बजावतांना 117 एन्काऊंटर’र्स केल्याचे बोलले जात आहे.

आज पालघरमध्ये पत्रकारांशी बोलताना ठाकूर यांनी शर्मा यांच्यावर एन्काऊंटर’र्स चा मुद्द्दा उचलत आरोप केले. सोबतच, पालघर मध्ये विधानसभांच्या जागेवर ‘सेना-भाजपा’ कडून आयात उमेदवारांना संधी दिल्या’ची टीका ही यावेळी हितेंद्र ठाकूर यांनी केली. त्यामुळे ठाकूर यांच्या आरोपाचा शर्मा यांना निवडणूक प्रचारात फटका बसतो का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि विधानसभेच्या बातम्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्त्वाच्या बातम्या  – 

 

 

प्रदीप शर्मांचे सर्व एन्काउंटर फेक?

चंद्रकांत पाटलांच्या विरोधात संभाजी ब्रिगेडचा शड्डू; जिजाऊची ‘ही’ लेक लढणार कोथरुडमधून

मेधा कुलकर्णींना तिकीट नाकारलं जाणं हा महिला वर्गाचा अपमान समजून संभाजी ब्रिगेडने सोनाली ससाणे यांना चंद्रकांत पाटील यांच्यसरोधात उमेदवारी दिली आहे.

‘वणी विधानसभा’ क्षेत्रात सप्तरंगी लढत; दिगग्ज नेते ‘अपक्ष’ म्हणून निवडणूक रिंगणात

यवतमाळ प्रतिनिधी। उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवार हा शेवटचा दिवस होता. वणी विधानसभा जागेकरिता दिग्गजांसोबत बंडखोरांनी देखील मोठे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे आता वणी विधानसभा मतदार संघात सप्तरंगी लढत पाहायला मिळणार आहे. या मतदारसंघातील एकूणच चित्र पाहत, उमेदवारी न मिळाल्याने दुखावलेल्या काही राजकीय नेत्यांनी अपक्ष का होईना पण आपला हट्ट … Read more