Taiwan Earthquake : महाशक्तिशाली भूकंपाने तैवान हादरलं; इमारती कोसळल्या, नागरिकांची पळापळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज बुधवारी सकासकाळीच तैवानमध्ये भूकंपाचे (Taiwan Earthquake) जोरदार धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.4 इतकी होती. इतका महाप्रचंड असा भूकंप होता कि अनेक इमारती गदागदा हळू लागल्या आणि कोसळल्या. या महाशक्तीकाळी भूकंपाचा केंद्र बिंदू हुआलिन शहरापासून जवळपास 18 किलोमीटर दक्षिणेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाच्या जोरदार धक्क्यांमुळे आतापर्यंत एकाचा मृत्यू झाला असून 50 हून अधिक जण जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे.

व्होल्कॅनो डिस्कवरीच्या अहवालानुसार स्थानिक वेळेनुसार सकाळी ९ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची खोली 35 किमी होती आणि देशाच्या मोठ्या भागात हा धक्का जाणवला. तैवान मधील या महाभयंकर भूकंपामुळे अनेक ठिकाणी नुकसान झालेल्या गाड्या आणि कोसळलेल्या इमारती पाहायला मिळत आहेत. तैवानच्या भूकंप (Taiwan Earthquake) निरीक्षण संस्थेने या भूकंपाची तीव्रता 7.2 तीव्रता ठेवली, तर अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणाने ती 7.4 ठेवली.

इमारती कोसळल्या – Taiwan Earthquake

तैवानच्या भूकंप मॉनिटरिंग ब्युरोचे प्रमुख वू चिएन-फू यांनी सांगितले की, चीनच्या किनारपट्टीवरील तैवान-नियंत्रित किनमेन बेटापर्यंत या भूकंपाचा प्रभाव जाणवला. हा भूकंप इतका जोरदार होता की हुआलियनमधील पाच मजली इमारतीचा पहिला मजला पूर्णपणे कोसळला आणि बाकीचा मजला 45 अंशांच्या कोनात झुकला होता. मागच्या 25 वर्षातील तैवानमधील हा शक्तीशाली भूकंप (Taiwan Earthquake) आहे. तैवानच्या सेंट्रल वेदर ॲडमिनिस्ट्रेशनने या भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा दिला आहे. उत्तरेकडील किनारपट्टी भागात सुनामी येऊ शकते असे CWA कडून सांगण्यात आले आहे.