Tajmahal : ताजमहाल पाहण्यासाठी द्यावे लागणार जादा पैसे ? कधी लागू होणार दरवाढ ? जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Tajmahal : जगातील आठ आश्चर्य पैकी एक असलेल्या ताजमहाल ला पाहण्यासाठी दररोज हजारो पर्यटक येत असतात. यामध्ये केवळ भारतीयच नव्हेतर परदेशी पर्यटकांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. मात्र आता ताज पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या खिशाला कात्री लागणार असून थोड़े जादा पैसे ताज चे सौंदर्य पाहण्यासाठी द्यावे लागणार आहेत. ताजामहाल म्हणजे वास्तुकलेचा अप्रतिम नमुना आहे. 17 व्या शतकात मुघल सम्राट शाहजहानने त्याची पत्नी मुमताजच्या स्मरणार्थ बांधलेला ताजमहाल अद्यापही पर्यटकांच्या आकर्षणाचा (Tajmahal) केंद्रबिंदू आहे.

किती द्यावे लागतील पैसे ?

आग्रा डेव्हलपमेंट अथॉरिटी (ADA) च्या प्रस्तावानुसार, ताजमहाल पाहण्यासाठी भारतीय पर्यटकांच्या तिकिटाच्या दरात 30 रुपयांनी तर परदेशी पर्यटकांसाठी 100 रुपयांनी वाढ होणार आहे. जर सरकारने ADA प्रस्ताव मंजूर केला, तर तुम्हाला ताजमहालच्या तिकिटासाठी वाढीव किंमत मोजावी लागेल. भारतीय पर्यटकांसाठी 80 रुपये, तर परदेशी पर्यटकांसाठी 1200 रुपये तिकीट असेल. सध्याच्या (Tajmahal) किमतीवर नजर टाकल्यास, ताजमहालच्या प्रवेश तिकीटाची किंमत एका भारतीय पर्यटकासाठी 50 रुपये आहे. तर विदेशी पर्यटकांना 1100 रुपये मोजावे लागतात.

कधी लागू होणार दरवाढ ? (Tajmahal)

टोल टॅक्स वाढीचा प्रस्ताव तयार करून तो शासनाकडे पाठवावा, अशा सूचना एडीए बोर्डाच्या अध्यक्षा तथा विभागीय आयुक्त रितू माहेश्वरी यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यावर एडीएच्या उपाध्यक्षा अनिता यादव यांनी टोल टॅक्स वाढविण्याचा प्रस्ताव नगररचना विभागाच्या प्रधान सचिवांकडे पाठवला आहे. सरकारने मान्यता दिल्यानंतर ताजमहालमध्ये नवीन तिकीट प्रणाली लागू (Tajmahal) केली जाईल.