सरकारी कार्यालयांमध्ये अभ्यंगताना भेटण्याची मनमानी वेळ ठरवणाऱ्या कार्यालयांवर कारवाई करा; छत्रपती शिवाजी महाराज सेनेची मागणी

0
159
time
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – शहरातील सर्वच सरकारी कार्यालयांमध्ये अभ्यंगताना भेटण्याची वेळ ठरविणाऱ्या कार्यालयांवर तात्काळ कठोर कारवाई करा अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराज सेनेच्या वतीने औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे एका निवेदनादवरे करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन छत्रपती शिवाजी महाराज सेनेचे औरंगाबाद जिलाध्यक्ष सुरेश फुलारे यांनी विभागीय आयुक्तांना दिले आहे.

या निवेदनात नमूद करण्यात आले आहे कि, सरकारी कार्यालये जसे ज़िल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय आदी सरकारी कार्यालयांमध्ये अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी ४ ते ५ वेळ आहे. अशा प्रकारच्या पाट्या लावण्यात आल्या आहेत. परंतु या वेळेतही काही अधिकारी ऑनलाईन बैठकांमध्ये व्यस्त असतात. त्यामुळे अधिकारी सामान्य जनतेला भेटत नाही व भेटण्यासाठी सामान्य जनतेला वारंवार चकरा मारायला लागतात. यामुळे सामान्य जनतेमध्ये अधिकाऱ्यांमध्ये असंतोष पसरत आहे. यामुळे आपल्या देशातही अफगाणिस्तानसारखे बेबंदशाहीचे राज्य सुरु होते. त्यामुळे शासनकर्त्यांनी जनतेच्या समस्या ऐकून त्या तात्काळ सोडवल्या पाहिजेत. परंतु सध्या सगळीकडे मनमानी कारभार सुरु आहे. हा भयंकर प्रकार तात्काळ न थांबल्यास हा प्रकार शासनाच्या व जनतेच्या निर्दशनास आणून देण्यासाठी विभागीय कार्यालयासमोर मुंडन आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

“कॅबीनेट मिटिंग वगळता मंञालयात मंञ्यांना भेटायला हि काहि वेळा ठरलेल्या नाहि व गरज असल्यास मंञ्याना कधिहि भेटता येते मग सरकारी अधिकाऱ्यांना वेगळा नियम कसा काय हा नियम कोणी बनवला , कायदे बनवायचा अधिकार फक्त विधानसभा आणि लोकसभेला आहे , परंतु येथे तर आधिकार्यांची मनमानी चालु आहे कोणी काहि वेळा ठरवतो व या वेळेतहि परत साहेब मिटिंग मध्ये आहे म्हणून जनतेला बाहेर थांबवतात व वेळ संपली उद्या या म्हणून सांगतात या मुळे जनतेचा मनस्थाप होतो हा प्रकार गंभीर आहे व लोकशाहिला काळीमा फासनारा आहे , ज्याच्या हाती शिकार तो शिकारी हि पद्धत थांबली पाहिजे व आधिकारी कितीहि मोठा असला तरी तो जनतेचा सेवक आहे हि जानीव त्या आधिकार्याला कायम पाहिजे.” – सुरेश फुलारे, जिल्हा अध्यक्ष छञपती शिवाजी महाराज सेना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here