हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| थंडी पडायला सुरुवात झाली की त्वचा उलण्यास देखील सुरुवात होते. त्याचबरोबर टाचा फुटणे आणि ओठ फुटणे असे त्रास देखील जाणवू लागतात. यात ओठ जास्त नाजूक असल्यामुळे त्याचा आपल्याला जास्त त्रास होतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशा काही घरगुती टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुमचे ओठ फुटण्यापासून वाचतील.
रोज रात्री ओठांना तूप लावा – तुम्हाला जर तुमचे ओठ मुलायम हवे असतील तर रोज रात्री झोपताना ओठांना तूप लावून झोपा. ज्यामुळे तुमचे ओठ उलणार नाहीत. तसेच ते कायम मुलायम राहतील.
ओठांना दुधावरची साई लावा – घरामध्ये दूध असेल तर ते गरम करा आणि त्यावर आलेली साई आपल्या ओठांना लावा. यामुळे देखील तुमचे ओठ कोरडे पडणार नाहीत. तसेच त्यांचा रंग देखील काळपट होणार नाही.
थंडीत लिपस्टिक वापरू नका – लिपस्टिक वापरल्यामुळे ओढ आणखीन कोरडे पडतात तसेच काळपट रंग देखील येत जातो. त्यामुळे खास करून थंडीच्या दिवसांमध्ये लिपस्टिक वापरणे टाळावे. गरज असल्यास लीप बाम वापर करावा.
बदामाचे तेल लावा – बदामचे तेल ओठांना लावल्यास ओठ फुटण्यापासून वाचतील. तसेच ते कायम मुलायम राहतील.