सातबारा देण्यासाठी 4 हजाराची लाच घेताना तलाठी रंगेहात सापडला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
माण तालुक्यातील कुळकजाई येथील तलाठी लाच घेताना रंगेहात सापडला आहे. नोंदणीकृत कुलमुखत्यार पत्र व साठे खताचे दस्ताची नोंद करून तसा सातबारा उतारा देण्यासाठी पैशाची मागणी केली होती. तलाठी यांच्या विरोधात 59 वर्षीय व्यक्तीने तक्रार केली आहे.

कुळकजाई येथील तलाठी युवराज एकनाथ बोराटे (वय- 55 वर्ष, रा. धनवडेवाडी ता. माण) यांनी 4 हजार रूपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर लाच स्विकारताना तलाठ्यास रंगेहात पकडण्यात आले. तक्रारदार यांचेकडे कलेल्या पैशाची मागणी करून ती लाच रक्कम स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेण्यात आले.

उपविभागीय अधिकारी (प्रांत), माण खटाव उपविभाग दहिवडी कारवाईवेळी समक्ष उपस्थित होते. पुण्याचे लाप्रवि पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, पोलीस उपअधीक्षक सुजय घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विक्रम पवार, पो. ना. विशाल खरात, पो. कॉ. तुषार भोसले यांनी सापळा रचून कारवाई केली.